-->
मेलडीचा बादशहा

मेलडीचा बादशहा

25 मेच्या अंकासाठीअग्रलेख मेलडीचा बादशहा एकेकाळी ज्यांनी मराठी, हिंदी, भोजपुरी सिनेसृष्टीतील संगीताने आपले नावअजरामर केले ते राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ९० च्यादशकात त्यांनी आपल्या संगीताच्या ठसक्याने सिनेसृष्टीवर आपली छाप उमटविली होती. विविधकरमणुकीच्या कार्यक्रमात वाद्ये वाजविण्यापासून सुरुवात केलेले विजय पाटील हे मराठीव हिंदी सिनेसृष्टीतील संगीतात उच्च स्थानावर पोहोचले ही त्यांची यशोगाथावाखाणण्यासारखी होती. असे सर्वसाधारणपणे समजले जाते की जे ऑर्केस्ट्रात गातातकिंवा वाद्ये वाजवतात ते सिनेसृष्टीत गाजत नाहीत. त्यामागे काही ठोस कारण नाहीपरंतु असे अपवादात्मक स्थितीत घडले व तो अपवाद म्हणजे विजय पाटील हे होते. ज्यावेळीसंगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी बर्मन, भप्पी लहरी हे महान संगीतकार ऐनभरात होते त्यावेळी राम लक्ष्मण यांनी जबरदस्त स्पर्धात्मक असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतआपले स्थान निर्माण केले. अर्थात ही बाब सोपी नव्हती. परंतु एका मराठी कलाकारानेते साध्य करुन दाखविले. मुळचे नागपूरचे असलेले विजय पाटील हे गेली काही वर्षेआजारपणामुळे आपल्या जन्मगावी येऊन दाखल झाले होते व आपल्याला मरणही याच ठिकाणीयावे अशी त्यांची इच्छा होती. नागपूरमध्ये तरुणपणात एक हरहुन्नरी कलाकार म्हणूनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमापासून ते विविध कार्यक्रमात तेसंगीताचे कार्यक्रम करीत. त्यांचे बालपणही फार संघर्षात गेले. त्यांच्या शेजारी राहातअसलेल्या रामटेके यांच्याकडे असलेल्या पेटीवर त्यांचा हात सर्वात प्रथम फिरला.त्याकाळी त्यांच्याकडे वाद्य खरेदीसाठी पैसेही नव्हता. परंतु संगिताशी असेलेलेनाते ते तोडू शकत नव्हते. काही काळाने ते ऑर्केस्ट्रात सामिल झाले. त्यांच्या यासंगीत प्रवासाची सुरुवात कादर ऑर्केस्ट्रापासून झाली. यात ते अकॉर्डियन वाजवत असत.आपला स्वत:चाऑर्केस्ट्रा असावा अशी त्यांची इच्छा होती. आपले संगीत सेवेचे स्वप्न पूर्णकरावयाचे असेल तर नागपूर सोडून मुंबईला जायला हवे हे त्यांना लवकरच उमगले वत्यातून त्यांनी नागपूर सोडले व स्वप्ननगरी मुंबपुरी गाठली. मुंबईत गेल्यावरत्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली व लवकरच अमर विजयऑर्केस्ट्राची स्थापना केली. हा ऑर्केस्ट्रा अल्पावधीत चांगलाच लोकप्रिय झाला.त्यांचा ऑर्केस्ट्रा दादा कोंडकेंनी पाहिला व त्यांना आपल्या चित्रपटातीलगाण्यासाठी हाच संगीतकार असावा असे ठाम ठरविले. सर्वात महत्वाचे म्हणजेऑर्केस्ट्रात ते हिंदी चित्रपटातील गाणी गात असताना स्वत:रचलेली गाणी म्हणून दाखवित. त्यांची रचलेली ही गाणी ऐकून दादा कोंडकेंनी त्यांनाआपल्या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी आमंत्रित केले. दादांनी त्यांच्यातलाठसकेबाज संगीतकार बरोबर ओळखला होता. त्यातूनच पांडू हवालदार या चित्रपटासाठीत्यांनी संगीत दिले, मात्र त्यांच्या सोबत सुरेंद्र हेंद्रे हे देखील होते. हेंद्रेंव पाटील यांच्या जोडगोळीला राम-लक्ष्मण हे टोपणनाव दादांनीच दिले. परंतु हाचित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हेंद्रे यांचे निधन झाले. मात्र आपल्या या साथीदाराचीआठवण कायम रहावी यासाठी त्यांनी हे नाव कायम आपल्यासोबत जोडले. त्यामुळे विजयपाटील यांना त्यांच्या नावापेक्षा राम-लक्ष्मण याच टोपणनावाने ओळखले गेले. दादाकोंडके व राम लक्ष्मण ही जोडी कायमचीच ठरली व मराठी सिनेसृष्टीत हिट ठरली. दादांनापाहिजे तसा ठसकेबाज गाणी देणारा संगीतकार त्यांच्या रुपाने सापडला होता. ही जोडी दादाअसेपर्यंत कायमची टिकली. दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाणी हिट झाल्यावरत्यांच्याकडे हिंदी सिनेसृष्टीची नजर वळली. त्यांची आणि राजश्री प्रॉडक्शनची तारजुळली. एजंट विनोद या राजश्रीच्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत जबरदस्त हिटठरले. त्यानंतर मैने प्यार किया हा १९८९ मध्ये प्रकाशित झालेला चित्रपट केवळगाण्यांमुळे हिट ठरला. हम आपके है कौन या चित्रपटातील सर्व गाणी हिट करण्याचाविक्रम राम लक्ष्मण यांनी केला. हिंदीसृष्टीतही या निमित्ताने राम लक्ष्मण यांनीकेवळ नाव कमविले नाही तर ते हिंदी सृष्टतील एका आघाडीचे संगीतकार म्हणून ओळखलेगेले. त्यांच्या दृष्टीने त्यांचा हा काळ लोकप्रियतेचा सर्वोच्च होता. राजश्रीप्रॉडक्शन्सचे बडजात्या कुटुंबिय त्यांच्यावर एवढे फिदा झाले होते की, त्यांनाआपल्या कार्यालयातच एक खास खोली दिली होती. त्यानंतर त्यांना विविध चित्रपटांसाठीऑफर्स येऊ लागल्या. त्यांच्या चाली व त्यांची गाणी ही ९० च्या दशकात सर्वांच्या तोंडावररुळत होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांच्या जोडीने भोजपुरी चित्रपटांनाही संगीतदिले. राम लक्ष्मण व उषा मंगेशकर यांची ठसकेबाज गाणी असे काही सुत्रच त्यावेळीतयार झाले होते. दादांच्या चित्रपटांसाठी त्यांनी उषा मंगेशकर व महेंद्र कपूरयांना घेऊन एक से एक जबरदस्त लोकप्रिय गाणी रसिकांना दिली. मराठी व त्यापाठोपाठहिंदी चित्रपटसृष्टी राम लक्ष्मण यांनी गाजवली, ९०च्या दशकातील अनेक त्यांनी रचलेलीगाणी आजही रसिकांच्या तोंडावर रुळत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ७५ हून जास्तचित्रपटांना संगीत दिले. एका महान चित्रपट सिने संगीतकाराला आपण आता मुकलो आहोत.आज आपल्यात राम लक्ष्मण नसले तरीही त्यांच्या गाण्याच्या रुपाने ते अजरामर झालेआहेत.

Related Posts

0 Response to "मेलडीचा बादशहा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel