-->
मनसेच्या इंजिनाचा ट्रॅक योग्यच

मनसेच्या इंजिनाचा ट्रॅक योग्यच

रविवार दि. 14 एप्रिल 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
मनसेच्या इंजिनाचा ट्रॅक योग्यच
--------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे राज्यातील एक प्रभावी राजकीय वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी बाळासाहेबांची भाषण करण्याची कला हुबेहुब आत्मसाद केलेली आहे. भाषण करताना राज ठाकरे हे एखाद्याच्या नकला करुन तसेच राजकीय नेत्याच्या व्यंगावर बरोबर बोट ठेऊन आपले भाषण खुलवीत असतात. त्यामुळे त्यांचे भाषण एैकायला जनता मोठ्या संख्येने उपस्थित असते. त्यांच्या भाषणातील पंच वरुन त्यांच्यातील वंयगचित्रकारही ठळकपणे दिसतो. यावेळी त्यांचे गुढीपाडव्याच्या दिवशी झालेले भाषण हे अत्यंत प्रभावी व मोदींच्या गेल्या पाच वर्षातील थापांचे चिरफाड करणारे होते. यावेळी मनसेने आपल्या ताकदीच्या मर्यादेचे भान ठेवीत लोकसभेसाठी उमेदवार उभे न करता मोदींना विरोध करणार्‍या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. म्हणजेच वेगळ्या भाषेत त्यांनी कॉँग्रे-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जे आजवर दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना जमले नाही, ते राज यांनी नेमके हेरुन आजचा आपला नेमका शत्रू कोण हे शोधून त्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे मनसेच्या इंजिनाचा ट्रॅक योग्यच आहे असे म्हणावे लागेल. 
तसे पाहता मनसेची निवडणुकीच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत अधोगती झाली आहे, पक्षाचे जवळजवळ सर्वच लोकप्रतिनिधी पक्ष सोडून गेले आहेत. ही झालेली पडझड लक्षात घेऊन राज ठाकरे यांचे राजकारण सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना न थकणारे राज ठाकरे आता थेट नरेंद्र मोदी यांना राजकारणातून हद्दपार करण्याची भूमिका घेऊन मैदानात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात राज यांची भूमिका कलाकलाचे बदलत गेली व हा त्यांच्यात झालेला बदल अनुभवावर आधारित असल्याने त्याला वास्तवतेची एक झलक आहे. त्यांच्या सभांचा फायदा साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील सभांना होणारी गर्दी पाहता मोदींचा लोकांना नॉशीया येऊ लागला आहे, लोक त्यांच्या छबीकडे बघून गेल्या पाच वर्षात कंटाळले आहेत. प्रत्यक्षात काम काहीच नाही व केवळ गप्पाच करावयाच्या हे मोदींचे धोरण आता जनतेच्या लक्षात आले आहे. मोदी विरोदाची ही हवा आपल्या शिडात भरण्यासाटी राज ठाकरे सज्ज झाले आहेत. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव पुसून टाकील असा वक्ता भाजप-शिवसेना युतीकडे नाही. देवेंद्र फडणवीस यांचा कसुरु आवाजही आता लोकांना नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे राज यांच्या भाषमांचा निश्‍चित फायदा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो. पाडव्याचे राज यांचे भाषण हे नेहमीच्या शैलीतील असले तरीही त्यांच्या चाहत्यांना हवेहवेसे वाटमारे सर्व काही त्यात टासून भरलेले होते. राज यांनी या संपूर्ण भाषणात विनोद, टवाळी, नकला हे सगळे टाळून भाषणाचे व ते मांडत असलेल्या विषयाचे गांभीर्य त्यांनी वाढवले. त्यांनी आपला मोदी विरोध कशासाठी आहे हे उदाहरणादाखल दाखविल्यामुळे ते प्रभावी झाले. कालपरवापर्यंत मोदींच्या विरोधात बोलणारी शिवसेना लगेचच गळ्यात गळे घालती झाली, त्यामुळे गोधळलेल्या शिवसैनिकांनाही यातून चांगले मार्गदर्शन मिळाले असेल. आज मोदी विरोधकांनी जे केले पाहिजे ते राज यांनी एका सभेतून प्रबावीपणे मांडून लोकांची मने जिंकली. त्यांच्या या फटकेबाजीमुळे संपूर्ण भाजपा-शिवसेना घायाळ होणे स्वाभाविकच आहे. मोदी विरोधाचा हा मसाला सर्वांकडेच उपलब्ध होता, परंतु तो जनतेला पटेल असा मांडणे काही सोपे नव्हते. ते काम राज यांच्या भाषणातून साध्य झाले. विरोधकांनी एकत्र येऊन सर्वच मतदारसंघात भाजपाला एक उमेदवार देऊ शकलेले नाहीत, हेच भाजपाचे मोठे भांडवल ठरले आहे. राहूल गांधींना यासंबंधी कितीही तळमळ असली तरीही मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी व प्रमुख दोन डावे पक्ष यांनी आपल्या वेगळ्या चुली बांधल्या आहेत. त्यामुळे आपला नेमका शत्रू कोण ते ओळखून जर त्याचा पाडाव करायचा असेल तर त्याासठी वेळ पडल्यास इच्छाशक्तींना मुरड घालणे, आपल्या महत्वाकांक्षा बाजुला ठेवणे हे करण्याचे दारिष्ट्य दाखविले पाहिजे होते. या पक्षांनी कॉँग्रेस व भाजपा यांना एकाच पारड्यात टाकल्याने त्यंच्या राजकारणाचा ट्रॅकच बदलला आहे. मात्र या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे व शेकाप यांनी योग्य भूमिका घेतली आहे. खरे तर राज ठाकरे बहुजन आघाडीप्रमाणे अगदी सर्वही जागा लढवू शकले असते. मात्र त्यांनी शत्रू नेमका हेरुन व आपल्या मर्यादीत ताकदीचे भान राखून निर्णय घेतला. राज यांची एकही जागा लोकसभेला येऊ शकत नाही हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. अशा वेळी मतांची विभागमी करुन भाजपाचा फायदा करुन देण्यात काहीच अर्थ नाही, जो फायदा वंचित आघाडी करुन देणार आहे. त्यामुळेच राज यांचे मनसेचे इंजिन सध्या योग्य ट्रॅकवर आहे असेच म्हणावे लागेल. काँग्रेस भ्रष्ट आहे, त्याासाठीच जनतेने त्यांना सत्ताभ्रष्ट केले. परंतु मोदी-शहांचा भाजप क्रिमिनल आहे, जातियवादी, धर्मांध आहे. अशा कॉँग्रेस किंवा भाजपा या दोन्हीपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. अशा स्थितीत कॉँग्रेसच्या बाजूने कल देणेे केव्हाही जनहिताच्या बाजूने आहे. सगळ्या घटनात्मक संस्था मोडीत काढणारे मोदी-शहा हे लोकशाहीपुढचा धोका आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची संधी यावेळी दवडली तर भविष्यात देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. हे वास्तव खरे तर सर्वच विरोधी पक्षांनी स्वीकारण्याची हीच वेळ होती. मनसे विधानसभा निवडणुकीत नक्की उतरेल. त्यासाठीची बांधणी म्हणून लोकसभा प्रचाराकडे पाहावे लागेल. राज यांचा हा फॉर्मुला चांगल्या प्रकारे क्लिक झाला तर महाआघाडीत मनसेची जागा नक्की होणार आहे. कॉँग्रेसला कितीही झाले तरी हे वास्तव भविष्यात स्वीकारावेे लागेल. राज ठाकरे यांची सध्या संघटना अस्थाव्यस्थ आहे हे कुणीच नाकारु शकत नाही. सध्या राज हेच पक्षाचे एक खांबी तंबू आहेत. असे असले तरीही त्यांच्या भाषणाला जी गर्दी जमा होते ते पाहता ते राज्यात चांगले संघटन नव्याने उभारु शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर बरेच राजकारण बदलणार आहे, असो. मनसेचा सध्याचा ट्रॅक तरी योग्य आहे, एवढेच.
----------------------------------------------------

0 Response to "मनसेच्या इंजिनाचा ट्रॅक योग्यच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel