-->
जागतिक संकट

जागतिक संकट

जागतिक संकट
शुक्रवारी दिवसभरात मुंबई शेअर बाजारात निर्देशांकाची साडे पाच हजारांनी चढउतार झाली. यात बाजाराची सुरुवातील चार हजारांनी घसरण झाली व नंतर ही घसरण भरुन काढून निर्देशांक तेराशे अंशांनी अखेर वधारला. शेअर बाजाराची एवढी वध-घट एकाच दिवसात होण्याची इतिहासातील पहिलीच घटना आहे. कोरोनामुळे जगातील सर्व आर्थिक स्थिती बिघडली आहे. आपणही त्याला अपवाद नाही. देशातील ही जी स्थिती शेअर बाजारांची झाली आहे तीच जागतिक पातळीवर बाजारात मोठी घसरण नोंदविली गेली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 74.49 वर पोहोचला आहे. 60 रुपयांवर अलिकडे पर्यंत असलेल्या रुपयाची घसरण डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच 74 च्या वर झाली आहे. शुक्रवारी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 25 हजार कोटी रुपये चलन बाजार ओतले. त्यामुळे रुपयाची घसरण थोडीफार रोखता आली. परंतु अशा प्रकारची कृञीमपणे घसरण रोखणे फार काळ करता येणार नाही हे ही तेवढेच खरे आहे. पुणे, मुंबईसारख्या लोकांची गर्दी असलेल्या महानगरात कोरोनाने प्रवेश केल्याने महानगरात राज्य सरकारने सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने लोकांना नाराज करणारे पाऊल उचलले असले तरी सध्याच्या स्थितीत त्याची गरज आहे. मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या सरकारने घेतलेला महत्वाचा निर्णय आहे. अजूनही मुंबई, पुण्यातील स्थिती नियंञणात असून त्यात झपाट्याने वाढ होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे होते. त्यादृष्टीने राज्य सरकारने उचललेली पावले स्वागतार्ह आहेत. सध्याच्या स्थितीत कोणताही धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. कोरोनाविषयी घबराट नको असली तरी खबरदारीचे सर्व उपाय योजणे शहाणपणाचे ठरणार आहे. सध्या कोरोनाविषयी मुख्य केंद्र युरोप झाले आहे. चीनमधील साथ बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचा दावा चीनने केला आहे. याव्दारे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले असून नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. अर्थात याचा अर्थ चीनमध्ये ही लागण आटोक्यात आली असे नव्हे, परंतु आटोक्यात येणाच्या दृष्टीने आता चीनने वाटचाल केली आहे हे माञ नक्की. त्यामुळे चीनमधील हा कल कायम राहिल्यास येत्या पंधरवड्यात चीन या रोगाच्या प्रसारावर मात करेल असे चिञ आहे. माञ युरोपातील परिस्थिती काही अद्याप सुधारलेली नाही. इटली या सर्वाधिक फटका बसलेल्या देशात 24 तासात 250 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता चीनकडून सर्वांचे लक्ष युरोपात केंद्रीत झाले आहे. स्पेन, ब्रिटन, कझाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स या देशात कोरोनाचे रुग्ण आहेत. माञ त्यापैकी इटली, फ्रान्समधील स्थिती चिंताजनक आहे. ब्रिटनमधील स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकेतही कोरोना पोहोचला असल्याने सरकार आरोग्याची आणीबाणी जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहे. न्यूयॉर्क, वटशिंग्टन ही गजबजलेली शहरे पूर्णपणे ओस पडली आहेत. डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडिओ यांनी आपले शटर डाऊन केले आहेत. 12 एप्रिलपर्यंत म्हणजे महिनाभर हे सर्व बंद राहातील असा अंदाज आहे. ऑस्ट्लियाच्या गृहमंञ्यांनाच कोरोनाने गाठले आहे. अनेक उद्योग पार ठप्प होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. यातील सर्वाधिक फटका बसला आहे तो पर्यटन उद्योगाला. याच पर्यटन उद्याच्या माध्यमातूनच या रोगाचा प्रसार झाला आहे. जागतिक पातळीवरील अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे प्रवासी नसल्याने रद्द केली आहेत. एअर इंडियाने इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, साऊथ कोरिया, श्रीलंकेला, कुवैतला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. जागतिक पातळीवरील मंदीमुळे फटका बसलेल्या या पर्यटन उद्योगास कोरोनाच्या या साथीचा जोरदार फटका बसला आहे. आन्तरराष्टीय पातळीवर जशी विमारे रद्द झाली आहेत तशीच देशांतर्गत विमानसेवाही डबघाईला आली आहे. इंडिगो ही देशातील लो कॉस्ट एअर लाईन दर आठवड्याला 15 लाख तिकिटे विकते. माञ त्यांच्या तिकिटांची विक्री 30 टक्यांनी घसरली आहे. स्पाईस जेट या कंपनीचीही अशीच स्थिती आहे. सध्या मंदीचा जोरदार फटका या उद्योगाला बसलेला होताच, त्यातून आता कोरोनाची भर पडली आहे. इंडिगो व स्पाईस जेट या दोन्ही विमान कंपन्यांनी सवलतीच्या दरात तिकिटांची विक्री सुरु केली आहे. तरी देखील त्यांच्याकडे गिऱ्हाईक नाही. पर्यटन उद्योगाच्या खालोखाल रियल इस्टेट उद्योगाचे नुकसान या रोगामुळे झाले आहे. येत्या महिन्याभरात गुढी पाडवा, अक्षय तृतीया हे घरखरेदीचे मुहूर्त येत असून त्यासाठी बुकिंग कितपत होतील अशी शंका आहे. अनेक बिल्डर या दोन मुहूर्ताला आपले नवीन गृह बांधणीचे प्रकल्प सुरु करतात, परंतु यावेळी त्यांना काय करायचे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरु करण्याएेवजी सध्या रिकामे असलेले फ्लँट विकण्याकडे बिल्डरांचा कल आहे. आय.टी. उद्योगातील बहुतांश कंपन्यांनी वर्क फॉम होम सुरु केले आहे. मुंबईसारख्या महानगरात त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली आहे. कोरोनाने जागतिक पातळीवर सर्वांसाठी मोठे संकट, अरिष्ट उभे ठाकले आहे. याचा मुकाबला सर्वांनी मिळून केला तरच आपण हे जागतिक आव्हान पेलू शकतो.
-----------------------------------------------

0 Response to "जागतिक संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel