मोबाइल झाले आता चलन!
मोबाइल झाले आता चलन!
| ||
प्रसाद केरकर । मुंबई
| ||
मोबाईलव्दारे विविध प्रकारच्या बिलांचा भरणा करण्याची सुविधा देशात सर्वात प्रथम 'मनी ऑन मोबाइल'ने उपलब्ध केली होती.सध्या या सेवेद्वारे दररोज सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल होते, अशी माहिती जोशी यांनी दिली. कंपनीने देशभरात सुमारे 300 शहरांमध्ये सुमारे 82 हजार रिटेल विक्रेते नियुक्त केले आहोत. या रिटेलर्सच्या नेटवर्कद्वारे पाच लाख ग्राहकांचा पाया कंपनीने उभारला आहे. तसेच दररोज ग्राहकांचा हा पाया झपाट्याने वाढत चालला आहे. कंपनीच्या या सेवेमुळे पैसे रोखीने देणे, धनादेश, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याची आता गरज भासत नाही. तर थेट आपल्या मोबाइलमध्ये रिटेलर्सच्या माध्यमातून 'मोबाइल व्हॅलेट' तयार करून गरजेनुसार याद्वारे बिलांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. |
0 Response to "मोबाइल झाले आता चलन!"
टिप्पणी पोस्ट करा