चीनचा चमत्कार
रविवार दि. 09 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी चिंतन -
-----------------------------------------------
चीनचा चमत्कार
-----------------------------------
चीनमध्ये करोना विषाणूच्या उद्रेकाने हाहाकार माजवला असून 360 हून अधिक बळी गेले आहेत. हा विषाणू केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात पोहोचल्याने जगाला धसका बसला आहे. या विषाणूची बाधा झालेले प्रवासी इतर देशांमध्येही आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्ससारख्या गंभीर आजारांसाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील वुहान शहरात आढळलेला करोना विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. वटवाघुळाचे मटन खाल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि त्याचा प्रसार झाला असा अंदाज आहे. चीनमधील अनेक शहरे खाली झाली असून सर्वत्रच हाहाकार पसरला आहे. बिजींगसारख्या मोठ्या शहरातील रस्तेही ओस पडल्याची छायाचित्रे प्रसिध्द होत आहेत. परंतु या उद्दभवलेल्या स्थितीवर चीनने अजिबात खचून न जाता ज्या प्रकारे नियोजन करुन नागरिकांवर उपचार सुरु केले ते सर्व वाखाणण्याजोगेच आहे. संपूर्ण देश या रोगाच्या निर्मुलनासाठी झटतो आहे. त्यासंबंधी ज्या बातम्या जागतिक पातळीवरील वृत्तपत्रातून प्रसिध्द होत आहेत ते पाहता संपूर्ण जगाने त्यापासून धडा घेतला पाहिजे असेच वाटते. ज्या प्रातांत म्हणजे हुआनमध्ये या रोगाची सर्वात प्रथम लागण झाली तेथे केवळ दहा दिवसात एक हजार खाटांचे अद्यायावत रुग्णालय उभारण्याचा चमत्कार चीनी सरकारने केला आहे. खरे तर एवढ्या अल्प वेळेत ऐवढे मोठे हॉस्पिटल उभारण्याचा जो विक्रम केला आहे त्याची नोंद ग्रीनीज बुकात व्हावयास पाहिजे. हे रुग्णालय सुरु होण्याच्या काही दिवसातच दुसरे 1600 खाटांचे अद्ययावत रुग्णालय सुरु करण्यात आले. म्हणजे केवळ पंधरवड्यात 2600 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात आले. 23 जानेवारीला या रोगावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी चीनने रुग्णालय उभारण्यची घोषणा केली त्या क्षणापासून याच्या उभारणीच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात झाली. सहा एकर जागेवर बांधकाम करणारी 100 अत्याधुनिक यंत्रे आली व 7000 मजूर यासाठी कामाला लागले. हा हा म्हणता केवळ दहा दिवसात हे रुग्णालय उभे राहिले. यापूर्वी 2003 साली आलेल्या सार्स या रोगाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी देखील असेच एक हजार खाटांचे रुग्णालय केवळ आठवड्यात उभे करण्यात आले होते. हे रोग संसर्गजन्य असल्यामुळे येथील रुग्णालयात अत्याधिुनक यंत्रणा बसविण्यात आली आहे. रुग्णांचा औषधे व त्यांच्या तपासण्या करण्यासाठी रोबो तयार करण्यात आले आहेत. गरज असेल तिकडेच डॉक्टरही या रुग्णांच्या थेट संपर्कात येतात. एवढी दक्षता घेऊनही रुग्णावर उपचार करणार्या चीनमधील काही डॉक्टरांना या रोगाची लागण झालीच आहे. या रोग्यांना शक्यतो अलग ठेवले जाते. त्यामुळे अन्य लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. एवढी खबरदारी घेऊनही हा रोग सुरुवातीच्या काळात झपाट्याने पसरलाच. मात्र आता चीन यासाठी युध्दपातळीवर लढत देत आहे, त्यामुळे हा आटोक्यात येईल असा त्यांना विश्वास वाटतो. चीनी सरकारने हे अत्याधुनिक रुग्णालय एवढ्या कमी काळात उभारणे हा एक मोठा चमत्कारच आहे तसेच चीनी माणूस, प्रशासन कोणत्या थराला जाऊन जिद्दीने काम करु शकतात हे त्यावरुन समजते. आपल्याकडे राष्ट्रप्रेमाच्या केवळ गप्पाच केल्या जातात. मात्र अशा प्रकारे झपाट्याने काम करण्याचे आपल्याकडे एकही उदाहरण नाही, हे दुर्दैव आहे. आपल्याकडे कोणताही प्रकल्प असो त्याला पहिला विरोध आणि नंतर कोर्टबाजी. त्यातून समाजाच्या उपयोग पडणारे विविध विकासाचे प्रकल्प वर्षानुवर्षे लांबले आहेत. केवळ हे रुग्णालयच नव्हे तर चीनमधील कोणताही प्रकल्प असो तो विक्रमी वेळेत तयार केला जातो. त्याउलट आपल्याकडे काय स्थिती आहे? त्यासंबंधी न बोललेलेच बरे. आपल्याकडे राष्ट्रप्रेम हे अशा प्रकारे विकास कामे वेळेत करुन किंवा ही कामे भ्रष्टाचरमुक्त करुन व्यक्त होत नाही तर आपल्याकडे राष्ट्रगीत म्हटले की राष्ट्रप्रेम व्यक्त झाले अशी सर्वसाधारण सर्वांची समजूत झालेली आहे. चीनकडून आपण खरोखरीच यासंबंधी शिकले पाहिजे असे वाटते. सध्या चीनमधील वुहान शहरात 40 हजारांहून अधिक जणांना याची बाधा झाली असून यातील जवळपास 2.3 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींचा अधिकतर समावेश आहे. ज्येष्ठ व्यक्ती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या व्यक्ती यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना बाधा होण्याची शक्यता असते. करोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या तरी औषध उपलब्ध नाही. रुग्णांना त्यांच्या लक्षणानुसार औषधे दिली जात आहेत. रोगप्रतिकारकशक्ती अधिक चांगल्या रीतीने कार्यरत असल्यास अन्य इन्फ्लुएन्झाप्रमाणे या विषाणूशी शरीर योग्य रीतीने सामना करते आणि रुग्ण बरा होतो. केरळमध्ये या विषाणूची बाधा झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून ती सुधारत आहे. आपल्याकडे काही निवडक शहरात या रोगाचे रुग्ण आढळले आहेत. परंतु ते रुग्ण बरे होतील असे दिसते. मुंबईसह अनेक मोठ्या शहरात या रोगासाठी लढण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कोणत्याही विषाणूच्या विरोधात मुंबई लढली आहे. त्यात एचवन एनवनची भीती दर पावसाळ्यानंतर ठरलेली असते. त्यामुळे मुंबईला कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाई ही नवीन नाही. सुदैवाने महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही नाही. तसेच जे दाखल झाले ते कोरोना व्हायरस संशयितांच्या वर्गवारीतही मोडत नाहीत. कोरोनावरून सध्या गोंधळलेली मनोवस्था आहे. मात्र, घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी सर्वसामान्यांनी गांभीर्याने घेणे गरजेच आहे. याला कारण कुमकुवत आरोग्य यंत्रणा असलेल्या देशांसाठी कोरोना विषाणू त्रासदायक ठरू शकतो, असा इशारा देत, जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आणीबाणी जाहीर केली आहे. डब्लूएचओकडून अशी आणीबाणी फार क्वचितच घोषित केली जाते. चीनमधील वुहांन शहरातील प्रसारानंतर कोरोना व्हायरस जगभरातील 18 देशांमध्ये पोहचला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात अमेरिकेसह भारतही आहे. मात्र, अशा गंभीर स्थितीत त्या त्या राष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग कोणत्या प्रकारे परिस्थिती हाताळते त्यावर तेथील संभाव्य विषाणू प्रसार प्रतिरोध अवलंबून आहे. या विषाणूला घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत. यातून मुंबईसह महाराष्ट्रही सुटला नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील चीनहून परतलेले सर्व प्रवासी कडक निरीक्षणाखाली आहेत. चीनमध्ये जाणे आवश्यक असल्यासच जा, अन्यथा चीनचा प्रवास टाळा अशाही सूचना वैद्यकीय तज्ञ देत आहेत. त्याचवेळी चीनमधून भारतात येण्यासाठी देण्यात येणा़र्या ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. चिनी प्रवाशांना जगभरात काही काळासाठी मज्जाव करण्यात येत आहे. चीनने युद्दपातळीवर जे काम सुरु केले आहे त्यापासून आपल्याला शिकावे लागेल.
------------------------------------------------------

0 Response to "चीनचा चमत्कार"
टिप्पणी पोस्ट करा