करोना: वस्तुस्थिती आणि अफवा
सोमवार दि. 10 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
करोना: वस्तुस्थिती आणि अफवा
चीनमध्ये करोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यापेक्षाही जास्त थैमान हे व्हॉटसअॅपवर अफवांनी घातले आहे. सोशल मिडिया हा कशा प्रकारे हानीकारक ठरु शकतो हे या अफवा पाहता दिसते. करोनाचा व्हायरस चिकनमधून फैलावत असल्याची अफवा पसरली आणि पोल्ट्री उद्योगाचा खप घसरला. त्याविषयी वास्तव जनतेपुढे आले परंतु झालेले नुकसान कोण भरुन देणार असा प्रश्न कायम राहतो. तसेच या व्हायरसमुळे नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबतही अफवा पसरल्या होत्या. चीनमध्ये जवळपास 24 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. या बातमीमुळे जगभरात खळबळ माजली आहे. चीन सरकारने करोनामुळे 563 जणांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले आहे. परंतु मृतांचा खरा आकडा लपवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. टेन्सेन्ट या कंपनीच्या दाव्यानुसार सरकारी आकडेवारीपेक्षा दहापट अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे टेन्सेन्टचा डेटा लीक झाला असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, काहीच्या दाव्यानुसार, जगभरात करोना व्हायरसने चीनमध्ये घातलेल्या थैमानाची माहिती व्हावी, यासाठीच हा डेटा मुद्दाम लीक केला आहे अशी चर्चा आहे. मात्र या वृत्ताला देखील अधिकृत दुजोरा नाही. त्यामुळे ही अफवाच ठरली आहे. अशा प्रकारच्या अफवांमुळे या रोगाविषयी अवास्तव गैरसमज निर्माण होतात व त्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागतात, हे दुर्दैवी आहे. करोनामुळे शेकडो जणांचा बळी घेणार्या या व्हायरसचा धोका जगाला आहे असे सर्वात अगोदर सांगणार्या डॉक्टरचा ली वेनलियांग याचा या व्हायरसमुळेच अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. 34 वर्षीय डॉ. ली वेनलियांग आणि इतर आठ जणांनी सर्वात आधी करोना सारखा भयानक विषाणू चीननमध्ये आला असून हा आजार जीवघेणा असल्याचे जाहीर केले होते. 30 डिसेंबर 2019मध्ये वुहान येथे करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. त्यांच्यामध्ये सार्ससारख्या आजाराची लक्षण आढळली होती. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचे सुक्ष्म विश्लेषण केल्यानंतर हा करोना व्हायरस असल्याचे त्यांना आढळले होते. हा सर्वात मोठा व्हायरस असून त्याचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचेही त्यांनी अहवालात म्हटले होते. त्यांनी व्हिचॅटच्या ग्रुपवरून त्यांच्या मेडिकल स्कूलच्या सहकार्यांना ही माहिती दिली होती. यावेळी त्यांनी या आजारापासून आपआपल्या नातेवाईकांना सावध करण्याच्या सूचनाही मित्रांना दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर अफवा पसरविल्याचा आरोप ठेवला होता. अखेर त्यांनी व्यक्त केलेला अंदाज करा ठरला आहे. आजवर 600च्या वर मृत्यू झाले आहेत व 431 करोनाग्रस्त रुग्ण गंभीर असून, उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 892 झाली आहे. संशयीत रुग्णांची संख्या एक लाख 85 हजार आहे. अशा या जगाला हादरुन सोडणार्या रोगावर लस शोधून काढल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय असलेल्या शास्त्रज्ञाने आपण करोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या एका हाय सिक्युरिटी प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात येत असून इथे संशोधनासाठी सर्व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून या विषाणूचा नमून्यापासून हा विषाणू आयसोलेट करण्यात ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी गेल्याच आठवड्यात यश मिळवले होते. या विषाणूचा विकास पाहता प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी विषाणू मोठ्या संख्येने उपलब्ध व्हायला हवेत असा अनुमान काढण्यात आला आहे. आयसोलेट करण्यात आलेला हा विषाणू आम्हाला दाखवण्यात आल्याचे या संशोधन करणार्या चमूचे प्रमुख प्राध्यापक एस. एस. वासन यांनी सांगितले आहे. मूळ बेंगळुरूचे विद्यार्थी असेलेले वासन यांनी स्कॉलरशीप प्राप्त करून ऑक्सफॉर्डच्या ट्रिनिटी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. तेथून त्यांनी डॉक्टरेट ही उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिंकासारख्या विषाणूंवरदेखील काम केले आहे. गेल्या काही वर्षात सार्स, चिकनगुनिया व आताचा करोना असे विविध विषाणूंमुळे झपाट्याने पसरणारे रोग आले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या टी.बी.सारख्या रोगांवर आपण मात करण्यात यश मिळविले आहे. परंतु जेस संशोधन वाढत चालले आहे तसे नवनवीन रोग ही लक्षात येत आहेत. करोना हा रोग वटवाघुळाच्या मटनातून झाल्याचे आता बाहेर आले आहे. चीनसारख्या देशात विविध प्रकारचे प्राणी पक्षी खाल्ले जातात. त्यातून या रोगांचा प्रादुर्भाव होतो असा अनुभव आहे. अर्थात कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र असे वारंवार प्रकार होत असले तर चीनचे कोणते पक्षी-प्राणी खावेत त्यावर एक मार्गदर्शक यादी तयार करणे गरजेचे आहे. अनेक रोगांवर आता लस, औषधे निर्माण झाल्याने एकीकडे माणसाचे आयुष्यमान वाढले असताना अशा प्रकारचे रोग नव्यानेच उद्भवून जगाला हादरवत आहेत. त्यावर उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचे पुढाकार घेऊन त्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे आखली पाहिजेत.
-------------------------------------------------------------------

0 Response to "करोना: वस्तुस्थिती आणि अफवा"
टिप्पणी पोस्ट करा