साईबाबांचा विचार महत्वाचा / शिक्षकांना खूषखबर
बुधवार दि. 22 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
साईबाबांचा विचार महत्वाचा
लक्षावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेला वाद अखेर सबुरीने मिटविण्यात सरकारला यश आले आहे. मात्र ज्यामुळे वाद निर्माण झाला त्या पाथरी येथील तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आणि त्यानंतर, शिर्डीकरांनी या वादावर पडदा टाकला. एकूणच हा वाद खेळीमेळीच्या वातावरणात व जास्त विलंब न लावता मिटविण्यात यश आले हे बरे झाले. मुख्यमंत्र्यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावर, पाथरी नव्हे, तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. जन्मस्थळाच्या उल्लेख न करता पाथरी येथील या विकास आराखड्यास आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी जाहीर केल आणि या वादावर पडदा पाडला. एकूणच काय तर शिर्डीचे सध्याचे स्थान अबधीत राहाणार याची हमी शिर्डीकरांना पाहिजे होती. त्यात श्रध्दपेेक्षाही आर्थिक बाजू होती. ती हमी मिळाल्यामुळे शिर्डीकर खूष झाले. यापूर्वी जन्मस्थळाबाबत राज्य शासनाची कुठलीच भूमिका नव्हती. आता यापुढेही हीच भूमिका सरकारची कायम राहाणार आहे. या वादावर पडदा पडला असे दिसत असताना आता पैठण तालुक्यातील धुपखेड्यातील गावकर्यांनी, साईबाबा हे सर्वप्रथम धुपखेडा येथे प्रगट झाले असल्याचा दावा केला आहे. शासनाने धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगट भूमी जाहीर करून गावात येणार्या साईभक्तासाठी निधी देण्याचीही मागणी गावकर्यांनी केली आहे. पैठणपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धुपखेडा गावात साईबाबांंचे मोठे मंदिर असून, दररोज शेकडो साईभक्त मंदिराला भेट देतात. गावकर्यांच्या सांगण्यानुसार, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा यांचे धुपखेडा या गावात अडीच ते तीन वर्षे वास्तव्य होते. धुपखेड्याच्या गावकर्यांनी ग्रामसभा घेतली व सरकारने धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगटभूमी जाहीर करून गावाला निधी द्यावा, अशी मागणी या ग्रामसभेत करण्यात आली. धुपखेड्याचे रहिवाशी असलेले माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या दाव्यानुसार, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी, धुपखेड्याचे पोलीस पाटील चांद पटेल यांचा घोडा हरवला होता. घोड्याचा शोध घेत असताना चांद पटेल यांची साईबाबा यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी, साईबाबा यांनी चांद पटेल यांचा घोडा शोधून दिला व त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांद पटेल यांनी साईबाबा यांना धुपखेड्यात आणले. चांद पटेल यांच्या बहिणीच्या लग्नाला साईबाबा शिर्डी येथे गेले व ते शिर्डीतच राहिले. आजही चांद पटेल यांचे वंशज धुपखेड्यातच राहतात व शिर्डी येथे त्यांचे नातेवाईक राहतात. धुपखेड्यात साईबाबा ज्या लिंबाच्या झाडाखाली बसत होते, ते झाड व ते अंघोळ करीत असलेला डोह आजही धुपखेड्यात आहे. त्या लिंबाच्या झाडाची पाने गोड लागतात व त्या डोहाचे पाणी कधीच आटत नाही, असा वाघचौरे यांचा दावा आहे. आजच्या काळात साईबाबा हे कुठले होते? त्यांचा जन्म कुठला? त्यांचे आयुष्य कुठे गेले? हे सर्व मुद्दे निरर्थक आहेत. साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा जो विचार दिला त्यापासून आपण दूर जात आहोत. साईंच्या मंदिरात शेजारी दर्गा आहे, हे विसरुन आपल्याला चालणार नाही. साईबाबांवर श्रध्दा जरुर असावी परंतु त्यांचे विचार विसरले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.
शिक्षकांना खूषखबर
सध्या शिक्षकांना विविध प्रकारची अशैक्षणिक 250 कामे देऊन त्यांच्यावर जो बोजा वाढविला आहे, ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केल्याने समस्त शिक्षकांसाठी एक खूषखूबर नवीन सरकारने दिली आहे. शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या भूमिकेचे सर्वात प्रथम स्वागत झाले पाहिजे. सध्या शिक्षक हा अनेक ओझी वाहाणारा सरकारी नोकर झाला आहे. त्यावर अनेक अशैक्षणिक कामे लादल्यामुळे त्याचे शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष होते, असे नेहमीच आढळले आहे. शिक्षकांना सर्वात प्रथम विद्यादानाचे काम प्राधान्यतेने करता आले पाहिजे. त्यानंतर शिक्षणाशी संबंधीत काही काम असल्यास त्यांच्याकडून सुट्टीच्या काळात करुन घेतल्यास कुणी शिक्षक त्याला नकार देणार नाही. परंतु सध्या शिक्षकांवर अशैक्षणिक कांमांचा एवढा बोजा टाकण्यात आला आहे की, त्यांना शैक्षणिक कामाकडे लक्ष देण्यास फारसा वेळच मिळत नाही. त्यात आपली भावी पिढी दुर्लक्षीत होते. खरे तर शिक्षकांच्या या प्रश्नांकडे अनेकदा काणाडोळा केला जातो, मात्र अशा प्रकारे अशैक्षणिक कामात गुंतल्यामुळे त्यांची इच्छा असूनही मुलांकडे लक्ष देता येत नाही. यात मुलांचे नुकसान होते. आज अनेक सालांचा शैक्षणिक दर्जा घसरलेला दिसतो त्यामागे शिक्षकांचे दुर्लक्ष हेच कारण आहे. आता जर शिक्षकांकडे जर केवळ शैक्षणिक कामच दिले गेेले तर त्यांच्याकडून योग्य कामाची अपेक्षा करता येईल. आपल्याकडे शिक्षणव्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत. अनेक शाळांना केवळ अंशत: अनपुदान जाहीर झालेले आहे, परंतु प्रत्यक्षात पदरात पडलेले नाही. शिक्षकांचे निवृत्तीवेतनाचे प्रश्न आहेत. शिक्षक जर समाधानी राहिला तर तो मुलांना विद्यादानाचे काम प्रभावीपणे करील व त्यातून नवीन पिढी चांगली घडेल. जर शिक्षकांनी आपल्या कामात कामचुकारपणा केला तर त्यांनाही जाब विचारला गेलापाहिजे, हे देखील तेवढे खरे आहे. निदान वर्षाताईंनी एक चांगला निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची सुरुवात केली आहे.
------------------------------------------------------
----------------------------------------------
साईबाबांचा विचार महत्वाचा
लक्षावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेला वाद अखेर सबुरीने मिटविण्यात सरकारला यश आले आहे. मात्र ज्यामुळे वाद निर्माण झाला त्या पाथरी येथील तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आणि त्यानंतर, शिर्डीकरांनी या वादावर पडदा टाकला. एकूणच हा वाद खेळीमेळीच्या वातावरणात व जास्त विलंब न लावता मिटविण्यात यश आले हे बरे झाले. मुख्यमंत्र्यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावर, पाथरी नव्हे, तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. जन्मस्थळाच्या उल्लेख न करता पाथरी येथील या विकास आराखड्यास आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी जाहीर केल आणि या वादावर पडदा पाडला. एकूणच काय तर शिर्डीचे सध्याचे स्थान अबधीत राहाणार याची हमी शिर्डीकरांना पाहिजे होती. त्यात श्रध्दपेेक्षाही आर्थिक बाजू होती. ती हमी मिळाल्यामुळे शिर्डीकर खूष झाले. यापूर्वी जन्मस्थळाबाबत राज्य शासनाची कुठलीच भूमिका नव्हती. आता यापुढेही हीच भूमिका सरकारची कायम राहाणार आहे. या वादावर पडदा पडला असे दिसत असताना आता पैठण तालुक्यातील धुपखेड्यातील गावकर्यांनी, साईबाबा हे सर्वप्रथम धुपखेडा येथे प्रगट झाले असल्याचा दावा केला आहे. शासनाने धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगट भूमी जाहीर करून गावात येणार्या साईभक्तासाठी निधी देण्याचीही मागणी गावकर्यांनी केली आहे. पैठणपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धुपखेडा गावात साईबाबांंचे मोठे मंदिर असून, दररोज शेकडो साईभक्त मंदिराला भेट देतात. गावकर्यांच्या सांगण्यानुसार, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा यांचे धुपखेडा या गावात अडीच ते तीन वर्षे वास्तव्य होते. धुपखेड्याच्या गावकर्यांनी ग्रामसभा घेतली व सरकारने धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगटभूमी जाहीर करून गावाला निधी द्यावा, अशी मागणी या ग्रामसभेत करण्यात आली. धुपखेड्याचे रहिवाशी असलेले माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या दाव्यानुसार, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी, धुपखेड्याचे पोलीस पाटील चांद पटेल यांचा घोडा हरवला होता. घोड्याचा शोध घेत असताना चांद पटेल यांची साईबाबा यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी, साईबाबा यांनी चांद पटेल यांचा घोडा शोधून दिला व त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांद पटेल यांनी साईबाबा यांना धुपखेड्यात आणले. चांद पटेल यांच्या बहिणीच्या लग्नाला साईबाबा शिर्डी येथे गेले व ते शिर्डीतच राहिले. आजही चांद पटेल यांचे वंशज धुपखेड्यातच राहतात व शिर्डी येथे त्यांचे नातेवाईक राहतात. धुपखेड्यात साईबाबा ज्या लिंबाच्या झाडाखाली बसत होते, ते झाड व ते अंघोळ करीत असलेला डोह आजही धुपखेड्यात आहे. त्या लिंबाच्या झाडाची पाने गोड लागतात व त्या डोहाचे पाणी कधीच आटत नाही, असा वाघचौरे यांचा दावा आहे. आजच्या काळात साईबाबा हे कुठले होते? त्यांचा जन्म कुठला? त्यांचे आयुष्य कुठे गेले? हे सर्व मुद्दे निरर्थक आहेत. साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा जो विचार दिला त्यापासून आपण दूर जात आहोत. साईंच्या मंदिरात शेजारी दर्गा आहे, हे विसरुन आपल्याला चालणार नाही. साईबाबांवर श्रध्दा जरुर असावी परंतु त्यांचे विचार विसरले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.
शिक्षकांना खूषखबर
------------------------------------------------------
0 Response to "साईबाबांचा विचार महत्वाचा / शिक्षकांना खूषखबर "
टिप्पणी पोस्ट करा