-->
आता कामाला लागा...

आता कामाला लागा...

बुधवार दि. 01 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
आता कामाला लागा...
नवीन वर्षाच्या प्रारंभी महाराष्ट्रातील विस्तारीत मंत्रिमंडळ आता कामाला लागेल. मुक्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर त्यांना मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी तब्बल 32 दिवस लागले. त्यामुळे अखेर उशीरा का होईना अनेकांचे रुसवे फुगवे काढत हा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मार्गी लागला. शिवसेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेस या तिनही पक्षात मंत्री निवडताना धक्कातंत्र वापरण्यात आले आहे. काहीसे अपेक्षीतच ते होते. अर्थात प्रत्येक विस्ताराच्या वेळी काही नवीन चेहरे देणे गरजेचे असते, तसेच काही ज्येष्ठांना घरी बसविणे भाग पडते. परंतु यावेळी तीनही पक्षात आमदारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. प्रत्येकांच्या अपेक्षा पूर्ण होणे शक्य नसले तरीही या विस्तारामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आता खाटेवाटपाचा प्रश्‍न मार्गी लागावयाचा आहे. मात्र दोन दिवसात खातेवाटप होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मंत्र्यांच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकाच वेळी पित्रा-पुत्र मंत्रिमंडळात असण्याची ही बहुदा देशातील पहिलीच वेळ असावी. त्याचबरोबर जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे ही मामा-भाच्यांची जोडी मंत्रिमंडळात असेल. शपथविधी झालेल्या मंत्र्यांचा आढावा घेता एक बाब लक्षात येते ती म्हणजे, सध्या तीनही पक्षातून घराणेशाहीला बळ मिळाले आहे. ठाकरे, पवार या घराण्यांचा वरचश्मा जसा या मंत्रिमंडळावर आहे तसाच 43 पैकी 20 मंत्री हे विविध घराण्यातून आलेले आहेत, किंवा त्यांची पार्श्‍वभूमी ही राजकीय घराण्यांची आहे. त्यामुले आता घराणेशाही प्रत्येक पक्षात नांदते आहे, अर्थात मागच्या सरकारमधील भाजपामध्येही त्याला काही अपवाद होता असे नव्हे. त्यामुळे सर्वपक्षीय घरामेशाहीला आता आपल्याकडे राजमान्यता लाभली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नेहरु-गांंधी घराण्यावर घराणेशाहीचा टीका करण्याचा आता कुणाला अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे आता घराणेशाहीच्या मुद्यावर कोणत्याही पक्षाने परस्परांवर चिखलफेक न केलेली बरी. शिवसेनेने यावेळी रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत या ज्येष्ठांना घरचा रस्ता दाखविला आहे. उध्दव ठाकरेंच्या य धक्का तंत्रामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. परंतु त्यांचीही निराशा केली. त्यामुळे संजय राऊतही शपथविधी सोहळ्यास गैरहजर होते अशी दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र आपण नाराज नसल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा वरचश्मा स्पष्टपणे जाणवत आहे. राष्ट्रवादीला 12 कॅबिनेटसह 4 राज्यमंत्री अशी 16 मंत्रिपदे मिळाली आहेत. तर शिवसेनेने आपल्याकडे 11 कॅबिनेट व 4 राज्यमंत्रीपदे राखली आहेत. तर कॉँग्रेसला 10 कॅबिनेट व 2 राज्यमंत्रीपदांचा लाभ झाला आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद अपेक्षेनुसार मिळाले आहे. मात्र ते पद पुन्हा एकदा बंडखोरी करुनही अजित पवारांच्या पदरी पडले आहे. खरे तर हे पद राष्ट्रवादींच्या जयंत पाटलांना मिळेल अशी आशा होती. परंतु तसे न झाल्याने ते नाराज आहेत. मात्र ते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवित नाहीत. कॉँग्रेसमध्येही पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, नसीम खान, अमिन पटेल, संग्राम थोपटे यांची वर्णी न लागल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील लहान पक्षांनाही वगळण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी होणे स्वाभाविक आहे. राजू शेट्टी यांनी उघडपणे ती बोलूनही दाखविली. शिवसेनेने बच्चू कडू यांना या शपथविधीत समाविष्ट करुन घेतले. आता पुढील टप्प्यात तरी राष्ट्रवादी व कॉँग्रेसला आपल्या जवळच्या घटक पक्षांना सत्तेतील वाटा देण्यासंबंधी विचार करणे भाग पडणार आहे. पक्षातील व पक्षाबाहेरील हे सर्व रुसवे फुगवे बाजूला ठेऊन आता सरकारने तातडीने कामाला लागणे आवश्यक आहे. सरकारने यापूर्वीच दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्यातील सर्व शेतकर्‍योचे सातबारा कोरे करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. आता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हालचाली करण्याची आवश्यकता आहे. राज्य सध्या एका मोठ्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा एकदा सुस्थितीत आणणे हे ठाकरे सरकारला प्राधान्याने करावे लागेल. त्यातच त्यांची मोठी कसोटी लागणार आहे. सरकारच्या डोक्यावर जो साडे सहा लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे तो हळहळू कमी करीत विकासांच्या योजना हाती घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे कुठलाही वायफळ खर्च करता येणार नाही. प्रत्येक पैशाचा खर्च हा मोजून मापून करावा लागेल. तसेच राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी पावले उचललावी लागणार आहेत. रोजगार निर्मीतीसाठी नवीन प्रकल्प कसे राज्यात येतील ते पहावे लागेल. त्यासाठी सरकारला उद्योजकांमध्ये एक नवा विश्‍वास संपादन करावा लागेल. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केवळ कर्जमाफीच नव्हे तर इतरही उपाय योजावे लागतील. त्यातून जी तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे ती पुन्हा शेती करण्याकडे वळू शकेल. सरकार चालवताना सरकारची तीन पायांची शर्यत असली तरी ती जिंकता येऊ शकते, मात्र त्यासाठी इच्छाशक्ती सरकारने दाखविणे गरजेचे आहे. आता खरा कसोटीचा काळ ठाकरे सरकारचा सुरु झाला आहे.
----------------------------------------------------------------- 

1 Response to "आता कामाला लागा..."

  1. Love captions for Whatsapp & Fb. fb caption & 2 line love status in english, Today We are Sharing top love caption for whatsapp status. Dpcaption
    Love Caption For Girlfriend. A love Caption is always a good idea to remind your girlfriend how much you care about her. Girl friendship quotes. Dpcaption
    Romantic love Caption for instagram.Here are some couple Instagram captions for that cute selfie. short love captions or love captions for him. Dpcaption
    Love Captions For BoyFriend
    Best Love Captions for Whatsapp & Fb
    Love Captions For GirlFriend
    Love Captions For Lover

    You stole my heart, but I’ll let you keep it.
    When we’re together, hours feel like seconds. When we’re apart, days feel like years.
    Every love story is beautiful, but ours is my favorite.

    उत्तर द्याहटवा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel