आत्महत्या वाढल्या
संपादकीय पान शनिवार दि. ३० एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आत्महत्या वाढल्या
संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल अशी बातमी नुकतीच प्रसिध्द झाली आहे. मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येच्या घटणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत ६५ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्या शेतकर्यांचा आकडा आता ३३८ वर पोहोचला आहे. बीडमध्ये सर्वोत जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे आढळले आहे. बीडमध्ये सर्वात जास्त ६० त्यानंतर औरंगाबादमध्ये ५७ आणि नांदडेमध्ये ५० शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये ४४, उस्मानाबादमध्ये ४३, जालनामध्ये ३७, परभणीमध्ये २७ आणि हिंगोलीमध्ये २० शेतकर्यांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करणार्या शेतकर्यांपैकी १४६ जणांच्या कुटुंब मदत मिळण्याठी पात्र आहेत तर ११७ प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं अधिकार्यांनी म्हटले आहे. ७५ अर्ज नाकारण्यात आले आहेत. आत्महत्या झाल्याचे सरकार एकीकडे मान्यही करते आणि दुसरीकडे नुकसानभरपाईचे अर्जही फेटाळून लावते. मग आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांनी याची दाद कुठे मागावी, असा सरकारला सवाल आहे. सरकारचे शेतकर्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी आखलेले सर्व उपाय कुचकामी ठरले आहेत. केंद्रीय कृषीनंत्री राधामोहन सिंग यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नव्या योजना आखून शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. मनरेगा आणि आरोग्य योजनांअंतर्गत शेतकर्यांना काम देण्याचा प्रयत्न करीत असल्याचं अधिकारी सांगत होते. परंतु प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. राज्यात गतवर्षी २०१५ मध्ये ३२२८ शेतकर्यांनी आत्महत्या केली होती. हा आकडा १४ वर्षातील उच्चांक होता. एकीकडे सरकारचे प्रयत्न फोल ठरलेले असताना अभिनेता नाना पाटेकर याने आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या नातेवाईकांना थोडीफार का होईना मदत करण्यास सुरुवात केली होती. तसेच आत्महत्या करण्याची मानसिकता झाल्यास मला एकदा शेवटचा फोन करा असे भावनीक आवाहन करुन आपला स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहीर केला होता. परंतु नानांच्या या आवाहानाला कितपत प्रतिसाद मिळाला ते अद्याप जाहीर झाले नसले तरीही आत्महत्या वाढल्या आहेत. नाना पाटेकरांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे स्वागत करीत असतानाच शेतकर्यांच्या आत्महत्या कशा रोखता येतील याचा सरकारने नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे आता आत्महत्यांची संख्या पाहता वाटते. अजूनही सरकार तळागाळातल्या शेतकर्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या शोधण्यात यशस्वी झालेले नाही. जर शेतकर्यांच्या समस्याच समजल्या नाहीत तर त्या सोडविणार कशा हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ दुष्काळ हे कारण नाही तर त्याचबरोबर तेथे असलेला सावकारी पाश फार महत्वाचा आहे. सरकार जोयपर्यंत ही सावकारशाही संपवित नाही तोपर्यंत आत्महत्या संपणार नाहीत. तसेच भाजपा-शिवसेनेच्या सरकारने फार मोठी आश्वासने निवडणुकीच्या पूर्वी दिली होती. त्याची पूर्तता काही झालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या नैराश्येत आणखीनच भर पडली आहे. नवीन सरकार आपल्यासाठी काही तरी करणार अशी त्यांची पक्की खूणगाठ होती. परंतु सरकारने त्यांच्या पदरी निराशाच टाकली. त्यामुळे या आत्महत्या वाढल्या आहेत. आज शेतकर्यापुढे अंधार आहे. आपले भविष्यात काय होणार याची त्याला चिंता आहे. यातूनच आत्महत्या वाढल्या आहेत.

0 Response to "आत्महत्या वाढल्या"
टिप्पणी पोस्ट करा