दारुबंदीचा नारा
संपादकीय पान शुक्रवार दि. २९ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दारुबंदीचा नारा
नुकतीच बिहारमध्ये सरकारने दारुबंदी जाहीर केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात दारुबंदी अंमलात आणून आपले निवडणुकीचे आश्वासन पाळले आहे. अर्थात यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे चार हजार कोटीचा ताण पडणार आहे. परंतु बिहारमध्ये दारुबंदी व्हावी ही महिलांची मागणी होती आणि नितीशकुमार यांनी ही मागणी उचलून धरल्याने त्यांना व त्यांच्या पक्षाला महिलांनी भरघोस मते दिली होती. बिहारचीच पुनरावृत्ती रायगड जिल्ह्यातील उलवे येथे झाली आहे. उलवे नोड, वहाळ, बामणडोंगरी, मोरवे, जावळे येथील ग्रामपंचायतींतील महिलांची तेथे दारुबंदी करण्यात यावी यासाठी एकमुखी मागणी होती. उलवे येथे दारूबंदीच्या विरोधात सोमवारी मतदान घेण्यात आले. या मतदानात भाजपाच्या महिला मतदारांनी १४१ दारूच्या बाजूने म्हणजेच उभ्या बाटलीच्या बाजूने मतदान केले, तर शेकापच्या १३०८ महिला कार्यकर्त्यांनी आडव्या बाटलीला मतदान केले. त्यामुळे उलव्यात अखेर बाटली आडवी झाली व शेकापचा मोठा विजय झाला आहे. उलवे येथे विजय शेट्टीचा रजत नावाचा बार चालू होता. शेकापने उलवे हे नो लिकर झोन करण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यासाठी जनजागृती केली. २६ जानेवारीला झालेल्या वहाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते वहाळ व उलवे नोड परिसरात दारूबंदीचा ठराव पास झाला. मात्र असे असतानाही उलवे नोड सेक्टर २३ मध्ये रजत बार सुरूच होता. याविरुद्ध पसिरातील महिलांनी तीव्र आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी दारूबंदीसाठी मतदान घेण्याचे ठरविले होते. अशा प्रकारे स्वयंस्फुर्तीने महिलांनी पुढाकार घेऊन दारुबंदीचा नारा दिला आहे. दारुमुळे सर्वात जास्त नुकसान होते व ज्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यात महिला आघाडीवर असतात. दारुमुळे लाखो लोकांचे संसार उध्दवस्थ झालेले आहेत. त्यामुळेच महिलांनी दारुबंदीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ज्याप्रामाणे दहा वर्षांपूर्वी डान्सबारने धुमाकूळ घातला होता व तरुण पिढी त्याच्या आहारी गेली होती, त्यावेळी देखील डान्स बार बंद व्हावेत यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला होता. नवश्रीमंत व श्रीमंतांमध्ये मद्यपान करणे ही एक फॅशन झालेली आहे. परंतु ही फॅशन त्यांना परवडणारी आहे. सर्वसामान्या जनतेला मद्यपान परवडणारे नाही. दारुबंदी करणे हे त्यावरचे उत्तर नाही तर दारु न पिण्यासंबंधी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे सांगणारा एक वर्ग आपल्याकडे आहे. परंतु आता प्रबोधन करुनही अनेक जण थकले आहेत. त्यामुळे आता दारुबंदी हेच एकमेव साधान आपल्या हातात शिल्लक आहे. उलवे गावातील महिलांनी जसा या कामी पुढाकार घेतला आहे, तशा अन्य गावातील महिला पुढे आल्या तर त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रशासनाचे आहे. अशा प्रकारे महिलातून जर दारुबंदीचा आवाज उठला तर ही बंदी प्रभावी ठरु शकेल.
----------------------------------------------------------------------------

0 Response to "दारुबंदीचा नारा"
टिप्पणी पोस्ट करा