संपादकीय पान बुधवार दि. १३ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
फाजिल आत्मविश्वास
------------------------------------------------
केंद्रात एकहाती सत्ता आल्यावर भाजपाचा आत्मविश्वास आता वाढलेला नसून फाजिल आत्मविश्वासत्यांच्यात भिनू लागला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजपाच्या शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीतील बैठकीत नेत्यांची झालेली भाषणे. एकतर या बैठकीवर सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा संपूर्ण ताबा आहे. खरे तर अशा प्रकारचे व्यक्तिनिष्ठीत राजकारण भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत बसणारे नाही. परंतु आता मोदींनी कॉँग्रेसचा पाडाव करुन सत्ता खेचून आणल्याने त्यांना आता व्यक्तिनिष्ठ राजकारणातून सूट देण्यात आली असावी. परंतु मोदी व शहा या दोघांनी भाजपा संपूर्णपणे हायजॅक केलेला आहे. त्यामुळेच अडवाणी यांना नाईलाजास्तव समारोपाची संधी देण्यात आली आणि त्याची खंत अडवाणी यांनी व्यक्तही केली. सत्तेपुढे शहाणपण नसते, हेच खरे. परंतु सत्तेचा जर माज भिनला तर डोळ्यापुढे अंधारी येते आणि जनता मग घरी बसविते, हे जसे कॉँग्रेसचे झाले तसे भाजपाचेही होऊ शकते याची जाणीव मोदी व शहा यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. शनिवारी झालेल्या या बैठकीचे प्रामुख्याने लक्ष्य हे महाराष्ट्रासह देशातील चार राज्यातील आगामी निवडणुका हेच होते. महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षापासून सोबत असलेल्या शिवसेनेला बाजूला सारुन भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात आहे. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही, परंतु ती स्वप्ने अवास्तव नसावीत, हे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिवसेना व भाजपा यांची ताकद एकत्रित असल्यानेच सत्तेची स्वप्ने पाहीली जाऊ शकतात. मात्र अमित शहा यांना हे मान्य नाही. पक्ष म्हणजे एखादी कंपनी आहे, अन्य कंपन्या टेकअव्हर करुन ज्या प्रकारे आपली उलाढाल वाढविली जाते त्याधर्तीवर पक्षाची ताकद वाढविण्याचा कल शहा यांचा आहे. शहा हे मूळचे शेअर दलाल असल्याने ते त्यादृष्टीने विचार करु शकतात. असो. राज्यात भाजपाची ताकद आहे त्याला शिवसेनेचे इंजिन लाभल्याने सत्तेच्या सारीपाटात विजयी होण्याचे स्वप्न युती पाहू शकते. मात्र केवळ स्वबळावर भाजपा सत्तेत येणे असा सध्या विचार करणे म्हणजे फाजिल आत्मविश्वास ठरावा. केंद्रात सोशल मिडिया व चॅनेल्स खरेदी करुन नरेंद्र मोदींची एक हवा तयार केल्याने व त्याच्या जोडीला कॉँग्रेसच्या कारभाराला जनता विटल्याने त्याचा फायदा झाला. परंतु तेच मॉडेल महाराष्ट्रात यशस्वी होणे शक्य नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या साठ दिवसात त्यांच्याविरोधात बर्यापैकी जनमत तयार होऊ लागले आहे. याचे महत्वाचे कारण मोदी हेच आहेत. कारण त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी लोकांना खोटी आश्वासने दिली. आपल्याकडे एखादी जादुची कांडी आहे अशाच थाटात मोदींनी आश्वासने दिली. याचा परिणाम असा झाला की, लोकांच्या मोदी सरकारबद्दल अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या. या देशात कोणाचेही सरकार आले तरी एका झटक्यात काही बदल व विकास होऊ शकत नाही. त्यासाठी काही काळ हा द्यावा लागतो. परंतु मोदी व भाजपाने लोकांना खोटी आश्वासने देऊन एका झटक्यात बदल करण्याचे स्वप्न दाखविले. मात्र सत्तेवर आल्यावर महागाई कमी होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याएवजी लोकांच्या खिशात हात घालायला सुरुवात केली. सर्वात प्रथम मोठ्या प्रमाणावर केलेली रेल्वेदर वाढ त्यानंतर गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ या सर्व बाबी पाहता कॉँग्रेस व भाजपाचे सरकार यात फरक तो काय असे लोकांना गेल्या साठ दिवसात वाटू लागले आहे. कांदा, बटाटा, मिरची या सर्वसामान्य लोकांच्या नित्याच्या खाण्याच्या वस्तूंनी आता महागाईंचा नवा उच्चाक गाठल्याने भाजपाचे सरकार नेमके काय करते आहे असा विचार लोक करु लागले आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रासह अन्य चार राज्यातील निवडणुका सहजरित्या जिंकणे ही बाब मोदी सरकारला वाटते तेवढी सोपी नाही. कारण आता लोक मतदान हे गेल्या साठ दिवसांची मोदींची कामगिरी पाहून करणार आहेत आणि मोदींची कामगिरी ही अत्यंत निराशाजनकच ठरावी अशी आहे. देशातील बदल हे झपाट्याने होणार नाहीत हे मान्य आहे. मात्र त्यादृष्टीने पावले तरी टाकणे गरजेचे होते. तसेच सर्वसामान्यांनांची महागाईतून सुटका होण्यासाठी कोणती पावले टाकली असा प्रश्न उपस्थित होतो. सर्वसामान्यांना दिलासा तर सोडून द्या उलट जास्तच महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर एवढा काळ बरोबर असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर नेहमीच दावा राहिला आहे. आता मात्र केंद्रात सत्ता आल्यावर एक मंत्रीपद तोंडावर फेकून आपण जसे शिवसेनेला गप्प केले तसेच राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत करु शकतो असा विश्वास मोदी व शहा यांना वाटतो. शिवसेनेला अजून एखादे केंद्रात मंत्रिपद देऊन राज्यात आपल्या जागा वाढवून घेणे व पर्यायाने सत्ता आल्यास आपला मुख्यमंत्री करणे हा भाजपाचा डाव शिवसेना सफल करुन देईल असे वाटत नाही. उलट शिवसेनेने आपला मुख्यंमंत्री हा आपला नेता उध्दव ठाकरेच असतील असे ठणकावून सांगितले आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्रीपदाच्या चढाओढीत युतीच्या जागा कमी होऊ शकतील, हे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व विसरत आहेत. केंद्रातील सरकारविषयी लोकांच्या मनात नैराश्य निर्माण झाले असताना राज्यात जर शिवसेनेच्या वर कुरघोडी करुन मुख्यमंत्रीपद ढापण्याचा डाव जर भाजपा आखत असेल तर शिवसैनिक भाजपाला मतदान करणार नाहीत आणि भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही. भाजपाच्या नेत्यांचा हा फाजिल आत्मविश्वास त्यांना घातकी ठरु शकतो.
----------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा