बंडखोरी कायम
बुधवार दि. 09 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
बंडखोरी कायम
बंडखोरांनी माघार घ्यावी, अन्यथा त्यांची खैर नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही त्याचा फारसा परिणाम भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोरांवर झालेला नाही. युतीतच मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली असून, काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत. तिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही काही मतदारसंघांमध्ये बेबनाव निर्माण झाला. भाजपच्या विरोधात ठाणे आणि पुण्यात राष्ट्रवादी आणि मनसेत समझोता झाला. बंडखोरांना किती मते मिळतात, यावर अधिकृत उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी बंडखोरी झाली असून तिरंगी किंवा काही ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे. अलिबागमध्ये कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील बंडखोराने दंड थोपटले आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड या सात जागांसाठी निवडणूक रिंगणात उरलेल्या 78 उमेदवारांमध्ये लढाई रंगणार आहे. निवडणूक रिंगणात सर्वाधिक उमेदवारांचे आव्हान कायम असलेला मतदारसंघ पेण आणि श्रीवर्धन ठरले आहेत. या मतदारसंघात प्रत्येकी 13 उमेदवार लढत आहेत. तर सर्वाधिक कमी उमेदवार असलेले मतदारसंघ उरण आणि महाड असून इथे प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हाभरात दाखल झालेल्या 131 उमेदवारांच्या 160 अर्जापैकी छाननीनंतर 19 अर्ज अवैध ठरल्यानंतर 7 जागांसाठी उरलेल्या 112 उमेदवारांचे अर्ज उरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अलिबागमूधन सर्वाधिक अशी 37 उमेदवारांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले. होते त्यापैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर उरलेल्या 33 उमेदवारांपैकी आज तब्बल 20 जणांनी आपले निवडणूक अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 11 पुरुष आणि 2 महिला उमेदवारांसह 13 उमेदवार उरले असल्याने खरी लढत यांच्यात रंगणार आहे. पनवेलमधून 18 अर्जांपैकी 5 अर्ज अवैध ठरल्यानंतर शिल्लक 13 उमेदवारांपैकी तीघाजणांनी आपले अर्ज मागे घेतले. कर्जत मतदारसंघातू मधून 17 उमेदवारांनी अर्ज भरले होते. तयपैकी आता निवडणूक रिंगणात 11 उमेदवार कायम असून त्यांच्यात खरी लढत होणार आहे. उरणमधून 11 अर्ज भरले होते, मात्र आता रिंगणात 8 उमेदवार राहिले आहेत. तर पेणमधून 18 उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जानंतर अंतिम लढत 14 उमेदवारांमध्ये होईल. श्रीवर्धन मतदारसंघामधून 14 उमेदवार अंतिम उरले असून त्यांच्यातच लढत होईल. आणि महाड मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात राहिले असून त्यांच्यात खरी लढाई रंगणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी कायम असून जवळजवळ प्रत्येक पक्षाला कमी अधिक प्रमाणात बंडखोरीची लागण झाली आहे. मात्र सत्ताधारी भाजपा-शिवसेनात बंडखोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मराठवाडयाचा अपवाद वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणात सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगडमध्ये बंडखोरी मोठया प्रमाणावर झाली. पुन्हा सत्तेत परतणार, असा दावा भाजपची मंडळी करीत असतानाच भाजपमध्येच सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. उमेदवारी नाकारलेल्या भाजपच्याच काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मतदारसंघांमध्ये मेळ जमू शकला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांना विरोध करणार्या शिवसेनेने भाजपशी युती करण्याचे टाळले. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केल्याने अन्य दोन मतदारसंघांमध्ये राणे यांनी उमेदवार उभे केले. राणे आणि शिवसेनेत समझोता घडवून आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अपयश आले. परिणामी राज्यात युती असली तरी सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्ष परस्परांविरोधात रिंगणात आहेत. तिन्ही मतदारसंघांमध्ये या दोन पक्षांमध्येच चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिवसेनेप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीत काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेत समझोता झाला. ठाण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मनसेसाठी माघार घेतली. पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी बंडखोरी कायम ठेवली. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रमेश लटके यांच्या विरोधात भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली नाही. मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात पक्षाच्याच माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी केली आहे. उरण मतदारसंघात भाजपच्या महेश बालदी यांची उमेदवारी कायम असल्याने सेनेच्या आमदाराची कोंडी झाली आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी झाली आहे. मुखंयमंत्र्यांच्या नागपूरमध्येही भाजपात मोठी बंडखोरी झाली आहे. उमेदवारांच्या माघारीनंतर तसेच नवरात्र संपल्याने आता खर्या अर्थाने प्रचाराचा जोर वाढणार आहे.
-------------------------------------------------

0 Response to "बंडखोरी कायम"
टिप्पणी पोस्ट करा