रंग निवडणुकीचे...
रविवार दि. 06 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी चिंतन -
-----------------------------------------------
रंग निवडणुकीचे...
------------------------------------
एन्ट्रो-राज्याच्या निवडणुकीत राज्यासमोरचे विषय चर्चेला यावेत, अशी अपेक्षा असते. महाराष्ट्रासमोर एका बाजूला पूर तर दुसर्या बाजूला दुष्काळ, शेतकर्यांचा कर्जबाजारीपणा व त्यातून होणार्या आत्महत्या, ढासळती आर्थिक स्थिती, शहरांचे वाढते बकालपण, सुशिक्षीत युवकांची वाढती बेकारी, अर्धवट पडलेले सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, राज्याबाहेर पळणारे उद्योग, नव्या गुंतवणुकीचा अभाव असे अनेक प्रश्न व नागरी आणि आर्थिक समस्या आहेत. यांची चर्चा करणे सत्ताधार्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ते विषयांतर करण्यासाठी नको त्या मुद्यांवर भर देऊन मतदारांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न नक्की करतील. परंतु जनतेने भाजपा-शिवसेनेचा डाव ओळखून त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशेब विचारला पाहिजे.
----------------------------------------------
राज्य विधानसभेच्या निवडणुकीला आता रंगत भरण्यास सुरुवात होऊ लागली आहे. उद्या अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत अनेक चर्चा, गॉसिप रंगणार आहेत. प्रत्येक पक्ष आपला जीव ओतून आपले उमेदवार विजयी करण्यासाठी झटणार आहेत. यात व्यक्ती लढत असल्या तरी पक्षांना त्यांच्या संघटनांना महत्व निश्चितच आहे. कॉँग्रेसने दगडही उभा केला तरी तो निवडणुकीत विजयी होईल असे ऐके काळी बोलले जात होते. आता मात्र तशी परिस्थिती कोणत्याच पक्षाची नाही. शेवटच्या टप्प्यात ए.बी. फॉर्म मिळण्यासाठी निष्ठा बदलणारेही काही कमी नव्हते. आता त्यांची ही निष्ठा निदान पाच वर्षे तरी टिकेल अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही. आपल्याकडे गेल्या सात दशकात लोकशाहीची पाळेमुळे घट्ट रोवली गेली असली तरी लोकशाहीची असा प्रकारे थट्टा करणार्यांची व केवळ सत्ता मिळविणे हेच एकमेव उदिष्ट डोळ्यापुढे ठेऊन निवडणूक लढविणारे महाभाग काही कमी नाहीत. यातून आपल्या लोकशाहीचे अवमूल्यनच जास्त झाले आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवून पदे मिळवायची आहेत. मग त्यात खरे समाजसेवक जसे आले तसे भूमाफियांपासून ते गुंडांची काही यात कमतरता नाही. लोकवर्गणीतून निवडणूक लढवून जिंकून येणारे मात्र आता हाताच्या बोटावर सापडत आहेत. हेच आपल्या लोकशाहीचे दुर्दैव ठरावे. ठाकरे घराण्यातील निवडणुकीत उतरलेला पहिला उमेदवार आदित्य, शरद पवारांचा नातू रोहित, शेतकरी कामगार पक्षाचे सलग 11 वेळा निवडून येणारे तेजस्वी नेते गणपतराव देशमुख यांनी स्वीकारलेली निवृत्ती ही सुरुवातीच्या टप्प्यातील काही वैशिष्ठे म्हणावी लागतील. यावेळी युती होणार...होणार... असे म्हणत झाली खरी परंतु अनेक ठिकाणा या युतीला खिंडार पडली आहेत. महाआघाडीचेही सुत्र काही शंभर टक्के जुळलेले नाही. अनेकांची तिकिटे कापली गेली, तर काहींच्या भाग्याची लॉटरी अचानक फुटली. एकनाथ खडसे यांचे भाजपाने कापलेले तिकिट सर्वांनाच आश्चर्य वाटणारे होते. शिवसेना व भाजप यांच्यात युती झाली खरी, पण मने मात्र जुळलेली नाहीत. मतभेद असले, तरी मनभेद नकोत, असे दोन्ही बाजूची नेतेमंडळी उच्चारवात म्हणत असली, मतभेदांबरोबरच मनभेदही झालेले आहेतच. दोघांमध्ये एकवाक्यता तर नाहीच. अशा स्थितीत आता प्रचाराचे नारळ फुटतील. सत्ताधार्यांनी तर अगोदरच सरकारी खर्चाने नारळ फोडून घेतले आहेत. भाजपामध्ये भरपूर आयात झाल्याने या सर्व नेत्यांना सामावून घेणे हा एक मोठी समस्या होतीच. मात्र राजकारण कोळून प्यालेल्या या नेत्यांनी भाजपात प्रवेश करताना हा विचार करावयास पाहिजे होता. पम सत्तेची लालूच म्हणा किंवा ईडीचा धाक म्हणा सत्ताधार्यांकडे रांगा अनेकांनी लावल्या व आता तिकिट न मिळाल्याने भ्रमनिरास झाला आहे. जेव्हा एका जागेसाठी किमान डझनभर इच्छुक असतात व प्रत्येकाला आपणच सर्वात योग्य असे वाटत असते. सत्ताधार्यांकडे जाण्याचा कल अनेकांचा असतो,. कारण तेथे समाजसेवेच्या बरोबरीने मलिदा मिळतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातल्या कोथरुड मतदारसंघात हलवून विद्यामान आमदार मेधा कुळकर्णी यांना बेघर करावे लागले. याचा परिणाम भाजपाला भोगावा लागतो किंवा नाही ते पहावे लागेल. परंतु भाजपाला ही जागा वाटते तेवढी सोपीही नाही. मेधा कुलकर्णींनी भर सभेत वाहिलेले अश्रु बरेच काही बोलून गेले. राज्याच्या या घडामोडींचा विचार करीत असताना रायगड जिल्ह्यात शेकापचा असलेला बालेकिल्ला शाबूत राहाणार यात काही शंका नाही. गेल्या सोमवारी अलिबागमध्ये लाल वादळ आले होते. आमदार पंडितशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या लाल वादळाने अन्य पक्ष झाकोळले गेले. सध्या सत्ताधार्यांच्या सुडाच्या राजकारणाबाबत जनतेच्या मनात चिड आणि संताप निर्माण होत आहे. वेगवगेळ्या खोटया प्रकरणात नेत्यांना गोवण्याची घाणेरडी राजनिती केली जात आहे. त्याचा प्रत्यय शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर इडीची खोटी कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचा प्रकार केला गेला. मात्र हे सत्ताधार्यांच्या आंगलटी आले व त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची नामुष्की स्तताधार्यांवर आली. यामुळे इडीचे हसे आणि सरकारची नालस्ती जगभरात झाली. अशा या तप्त राजकीय वातावरणात ही निवडणूक होत आहे. अलिबाग हा शेकापचा बालेकिल्ला असल्यामुळे येथून पुन्हा एकदा पंडितशेठ पाटील निवडून .येणार यात काहीच शंका नाही. राज्यातील व केंद्रातील जातियवादी सरकारच्या विरोधात कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, दोन्ही कम्युनिष्ट पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे राजकारण पुढे नेत ते टिकविण्याचे भूमीका घेतेली आहे. त्यासाठी प्रामुख्याने शेकापक्षाने पुढाकार घेतला. लोकसभा निवडणुकीला आम्हाला जागा नको परंतु आमच्या विचारांच्या उमेदवारांना समर्थन देण्याची भूमिका शेकापने घेतली. त्यातूनच सुनिल तटकरे यांना लोकसभेवर पाठविण्यात यश आले. आता राज्यातील राजकारणाची वेळ आली आहे. गेली अनेक वर्षे अलिबागमध्ये लाल बावटाच फडकतोय. सध्या जमीनीच्या दलालींचे व्यवहार करणारे आता नेते म्हणून जनतेत फिरत आहेत, हे खेदजनक आहे. शेकापने असले राजकारण कधीच केले नाही. जनतेच्या बाजूनेच नेहमी राहून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. त्यातूनच अलिबाग तालुका शेकापच्या बाजूने नेहमीच उभा राहिला आहे. आता केवळ पैशाचे व स्वार्थाचे राजकारण झाले आहे. प्रत्येक निवडणूकीत विचार व पक्ष बदलणारे लोक आता नेते म्हणवून घेत आता मतांचा जोगवा मागित आहेत. त्याना अर्थात जनता धडा शिकविल्याशिवाय राहाणार नाही. पंडितशेठनी पाच वर्षामध्ये विधीमंडळात विविध विषयावर विशेषतः ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब जनतेचे प्रश्न समर्थपणे आणि पोटतिडकीने मांडले आहेत. अनेक विकासांची कामे सरकारदरबारातून मार्गी लावली आहेत. त्यातून येथील जनतेला बर्यापैकी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पंडीत पाटील यांचा विजय निश्चित आहे. शेकापने आजवर नेहमीच गोरगरीब कष्टकरी, श्रमजीवींचे राजकारण केले आहे. या जिल्ह्यातला आणि तालुक्याचा जो विकास आहे, गावोगावचे रस्ते, पाणीपुरवठा योजना आहेत, त्या आमदारांनी समर्थपणे सोडविल्या आहेत. गेल्या काही वर्षात अलिबाग नगरीचा चेहरामोहरा बदण्यात शेकापचा मोठा वाटा आहे. एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून येथे लोक येतात. त्यातून येथील जनतेच्याही हातात चार पैसे खुळखुळतात. आता प्रत्यक्ष मतदान जेमतेम दोन आठवड्यावर येऊन ठेपले आहे. राज्याच्या निवडणुकीत राज्यासमोरचे विषय चर्चेला यावेत, अशी अपेक्षा असते. महाराष्ट्रासमोर एका बाजूला पूर तर दुसर्या बाजूला दुष्काळ, शेतकर्यांचा कर्जबाजारीपणा व त्यातून होणार्या आत्महत्या, ढासळती आर्थिक स्थिती, शहरांचे वाढते बकालपण, सुशिक्षीत युवकांची वाढती बेकारी, अर्धवट पडलेले सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, राज्याबाहेर पळणारे उद्योग, नव्या गुंतवणुकीचा अभाव असे अनेक प्रश्न व नागरी आणि आर्थिक समस्या आहेत. यांची चर्चा करणे सत्ताधार्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ते विषयांतर करण्यासाठी नको त्या मुद्यांवर भर देऊन मतदारांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न नक्की करतील. परंतु जनतेने भाजपा-शिवसेनेचा डाव ओळखून त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशेब विचारला पाहिजे.
-------------------------------------------------------

0 Response to "रंग निवडणुकीचे..."
टिप्पणी पोस्ट करा