-->
कट-काटशहा

कट-काटशहा

सोमवार दि. 07 ऑक्टोबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कट-काटशहा
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्ताधारी पक्षाचे तिकिट मिळविणे ही नेहमीच कठीण बाब असते. गेल्या वेळी 2014 साली जेवढे कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मांदीयाळी होती त्याच्या अर्धेही लोक यावेळी त्यांच्याकडे इच्छुक नव्हते. सत्ता असली अनेक मुंगळे सत्तेच्या गुळाला चिकटून असतात हे अनेकवार दिसते. यंदाही भाजपा-शिवसेना यांच्याकडे इच्छुकांचा मोठा लोंढा असणे यात काही आस्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. भाजपाने तर ईडीचा धाक दाखवून आपल्याकडे अनेक नेते लोहचुंबकाप्रमाणे खेचून आणण्याची किमया केली. यात त्यांना मोठे कर्तुत्व वाटते आहे, परंतु सत्तेसाठी आलेले हे कावळे कधी उडून जातील हे समजणार देखील नाही. महत्वाचे म्हणजे यातून भाजपाची संघटना विचारधारेवर मजबूत झाले असे काही सांगता य्ेत नाही. भाजपाची पुन्हा सत्ता येणार नाही असे दिसू लागल्यास हेच नेते कधी उडून दुसर्‍या झाडावर जाऊन बसतील व आपली वैचारिक बांधिलकी बदलून मोकळे होतील हे सांगता येत नाही. निवडणुकीत तिकिट हे जसे आर्थिक ताकदीवर मिळू शकते तसेच सत्ताधार्‍यांची तिकिटे ही विविध कारणांनी कापली जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांना पुढील पाच वर्षे निर्धोकपणाने सत्ता गाजवता यावी यासाठी काहींचा बळी दिला जातो तर काही आमदारांविषयी भ्रष्टाचाराचीच प्रकरणे उघड झालेली असतात, त्यांना घरी बसविणे गरजेचे असते. अन्यथा लोकांपुढे निवडणुकीला जाणे सत्ताधार्‍यांना कठीण जाऊ शकते. निवडणुकीच्या या राजकारणात अशा प्रकारे कट-काटशहाचे राजकारण काही नवीन नसते. सत्ताधारी पक्षातील ज्यांच्या हाती नेतृत्वाचे सुकाणू असते तो ठरवेल ती पूर्व दिशा असते. अर्थात हे कॉँग्रेस राजवटीपासून चालत आलेले आहे. भाजपा मात्र आपण कॉँग्रेस स्कृतीपासून वेगळे असल्याचा दावा करीत होता. मात्र त्यांच्याकडेही कट-काटशहाची कॉँग्रेस संकृती चांगलीच रुजली आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकिट कापल्यामुळे नाराज समर्थकांनी उमेदवार पराग शहा यांची घाटकोपरमध्ये गाडी फोडली. प्रकाश मेहता यांना तर आपले अश्र्रु अनावर झाले. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच बेभान झाले. त्यातून भाजपातही तोडफोड संस्कृती जन्माला आली. बोरीवलीमधून उमेदवारी न दिल्यामुळे चिडलेल्या तावडे समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. तावडे यांना शेवटपर्यंत तिकिट मिळेल अशी आशा होती. खरे तर त्यांच्यावर गेल्या वर्षीच मंत्रिमंडळातून वगळण्याची कारवाई होणार होती. परंतु त्यातून ते बचावले होते. आता अखेर त्यांना घरी बसावे लागले आहे. आता त्यांचे चिंतन सुरु असून आपण संघाचे कार्यकर्ते कसे काम करतो, याचे आख्यान ते देऊ लागले आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या मुलीला अखेरच्या टप्प्यात उमेदवारी दिली आहे. खडसे यांचे तिकिट कापले जाईल याची फारशी कुणाला कल्पना आली नव्हती. उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या या बलाढ्य नेत्यावर ही पाळी येईल असे वाटले नव्हते. गेल्या 2014 सालच्या निवडणुकीच्यावेळी खडसे यांनीच युती तोडण्याची घोषणा केली होती. आता पाच वर्षात त्यांची स्थीती कुठे आली? असा प्रश्‍न पडतो. गेली 40 वर्षे पक्षनिष्ठा बाळगणार्‍या नेत्यालाही यावेळी तिकिट मिळाले नाही. राजकारणातील फडणीसनिती सध्या जोरात आहे, हेच दर्शविते. तावडे, खडसे आणि प्रकाश मेहता यांच्यासह भाजपाने तब्बल 20 आमदारांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडाचे निशाल फडकले. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या म्हणजे 7 तारखेपर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने चार याद्या घोषित करत 150 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उभे राहता यावे, यासाठी तेथील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आले. मेधा कुलकर्णी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली असून त्यांनी आपल्या भाषणात अश्र्रु ढाळले आहे, त्यामुळे या मतदारसंघात चंद्रकांतदादांना जड जाऊ शकते. कोकणातील सर्वांचे लक्ष लागलेल्या कणकवलीतून नारायण राणे यांचे पुञ नितेश राणे यांना भाजपाचे तिकिट मिळाले असले तरी शिवसेनेने तेथे उमेदवार उभा केल्याने राणे यांच्या पुञाला यावेळी कठीण काळाला सामोरे जावे लागणार आहे असेच दिसते. अर्ज मागे गेण्याचा आज शेवटचा दिवस आहे, यातून जर बंडोबांनी आपली माघार घेतली नाही तर सत्ताधार्‍यांना ही निवडणूक कठीण जाणार हे नक्की.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "कट-काटशहा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel