-->
जिद्द कायम

जिद्द कायम

सोमवार दि. 09 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
जिद्द कायम
चांद्रयान-दोन ही मोहिम शंभर टक्के यशस्वी झाली नसली तरी या मोहिमेने भारतीय अंतराळ संशोधकांच्या मनात एक नवी जिद्द निर्माण केली आहे. इस्ञोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी ही मोहिम 95 टक्के यशस्वी झाली असताना देखील हे यश पूर्ण न मिळाल्याबद्दल पंतप्रधानांच्या खांद्यावर मान ठेऊन आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. मग पंतप्रधान मोदींनी देखील आपल्या डोळ्यात अश्रुंना जागा दिली. मोदींच्या दृष्टीने हा देखील एक इव्हेंट ठरला. कधीही दुख:त प्रसंगी मनुष्याने अश्रू ढाळल्यास तो त्यातून लवकर बाहेर येतो व नव्या उर्मिने उभा राहतो असे मानसशास्ञ सांगते. आता इस्ञोचे अध्यक्ष यातून पुन्हा नव्याने संशोधनाची विजयी पताका उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत, हे नक्की. मोदींपुढे आता चांद्रयानाचे नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे असलेले आव्हान महत्वाचे आहे. त्यावर ते कशी मात करतात ते पहावे लागेल. असो. चांद्रयान मोहिम अयशस्वी झालेली नाही तर 95 टक्के यशस्वी झाल्याचे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे. नासाने आजवर शेकडो मोहिमा चंद्रावर केल्या आहेत. त्यातील त्यांच्या 40 टक्के मोहिमांना अपयश आले आहे. त्यांची ही आकडेवारी पाहता आपले आजवरचे यश मोठेच आहे. त्यात आपल्या शास्ञन्यांनी ही मोहिम सर्वात कमी खर्चात केलेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विञान असो की कोणतेही क्षेञ त्यात अपयश ही यशाची पहिली पायरी असे म्हणून प्रयत्न केल्यास यश हे आपल्यापासून दूर जात नाही. आज पहिल्याच टप्प्यात आपण जे 95 टक्के यश मिळविले आहे त्याचे जगातील शास्ञञांनी कौतूक करावे ही मोठी बाब आहे.  प्रत्यक्ष आपण चंद्रावर पोहोचण्यासाठी केवळ दोन किमी मागे पडलो असून हे अंतर पुढील मोहिमात आपण सहज कापू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, आपण आजवर अंतराळ संशोधनाचे सर्व तंञन्यान हे देशात विकसीत केले आहे. स्वातंञ्यानंतर पंडित जवाहलाल नेहरु यांनी दूरदृष्टीने विक्रम साराभाईंच्या प्रेरणेने इस्ञोची स्थापना केली तेव्हापासून आपला भर हा केवळ मोहिमांवर नव्हता तर त्यासाठीचे संशोधन हे देशात विकसीत झालेले पाहिजे यावर होता. आज हे आपले उदिष्ट साध्य करण्यात इस्ञो शंभर टक्के यशस्वी ठरली आहे. रॉकेटची निर्मिती, विविध उपग्रह अवकाशात प्रक्षेपीत करणे यापासून ते चांद्रयान मोहिम शंभर टक्के भारतीय संशोधनाचे फलित आहे. उपग्रह प्रक्षेपणात तर आपण अनेक देशांचे उपग्रह एकाच रॉकेटमधून पाठविण्याचे विक्रम केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यातून देशाला कोट्यावधींचे परकीय चलन मिळवून दिले आहे. त्याच्या जिद्दीतूनचे हे सर्व उभे राहिले आहे. आता चांद्रयानाच्या मर्यादीत यशाने शास्ञजांना अपयशाने घेरले जाणार नाही, कारण प्रत्येक प्रयोग यशस्वी होतो असे नाही. अपयशात यशाची बिजे रोवली जातात. या जिद्दीने आता पुढील मोहिमा आखल्या जातील. यापूर्वी देखील इस्ञोने अपयशाच्या पायर्‍या चढतच आजचे हे शिखर गाठले आहे. ज्येष्ठ अंतराळ संशोधक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देखील आपल्याला अपयशातून कसे जावे लागले हे सांगितले आहे. अपयश हे नेतृत्वाचे असते आणि यश हे सहकार्‍यांचे असते असे त्यांनी सांगून इस्ञोच्या शास्ञन्यांपुढे पुढील आव्हानांना कसे तोंड द्यायचे हे सांगितले आहे. ही मोहिम अंशत: यशस्वी झाली असली तरी आपण आता अमेरिका, रशिया व चीन यांच्या रांगेत जाऊन बसलो आहोत. इस्ञोचे विद्यमान अध्यक्ष के. सिवन हे आयुष्यात संघर्ष करीतच या पदावर पोहोचले आहेत. एका साध्या शेतकर्‍याचा हा मुलगा या पदावर पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी संघर्ष ही बाब काही नवी नाही. इस्ञो पुढील काळात विविध आव्हाने पेलण्यास ते सज्ज करतील यात काहीच शंका नाही. त्यांनी ही मोहिम आखताना चांगला मूहूर्त पाहिला होता. तसेच या मोहिमेसाठी पूजाआर्चा केली होती. हा त्यांच्या वैयक्तीक श्रध्देचा भाग झाला. यातून त्यांच्या वैन्यानिक दृष्टीकोनाला काही तडा जात नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा रशियन आंतराळवीर युरी गागारिन देखील आपल्या सोबत क्रुस घेऊन गेला होता. त्यांच्या या श्रध्देमुळे जर त्यांना मानसिक बळ मिळणार असेल तर त्यात काहीच गैर नाही. माञ चांद्रमोहिम यशस्वी व्हावी यासाठी होमहवन करणार्‍यांची किव करावीशी वाटते. विन्यान व वैयक्तिक श्रध्दा यातील रेषा फुसट असल्या तरी श्रध्देतून कुणाला मानसिक बळ मिळणार असेल तर ती श्रध्दा देशहिताची ठरु शकते. चांद्रयानाचे अपयश ही आपल्या अंतराळ संशोधनातील एक महत्वाचा टप्पा ठरावा. या अपयशातूनच आपल्याला भविष्यातील यशस्वी वाटचाल करावयाची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पुढील वाटचालीसाठी आपली जिद्द कायम आहे, हे फार महत्वाचे आहे. चांद्रयानाच्या मर्यादीत यशाबद्दल इस्ञोच्या सर्व संशोधकांना सलाम.
----------------------------

Related Posts

0 Response to "जिद्द कायम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel