देशाचे शक्तीस्थान
शुक्रवार दि. 29 मार्च 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
-----------------------------------------------
देशाचे शक्तीस्थान
मिसाईलने लोअर ऑर्बिटमधल्या उपग्रहाला नष्ट करण्याचे देशी तंत्रज्ञान आपण विकसीत करुन त्याचा प्रयोग यशस्वी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ही घटना म्हणजे आपल्या तमाम शास्त्रज्ञांचा अतिशय अभिमान वाटावा अशीच आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे असलेले हे तंत्रज्ञान आता भारताने स्वतःच्या हिमतीवर निर्माण केले आहे, ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाची, अभिमानाची बाब ठरावी. खरे तर या घटनेची घोषणा शास्त्रज्ञ करतात ही प्रथा आहे. मात्र आपल्या प्रसिध्दीसाठी सतत झटणार्या पंतप्रधानांनी निवडणुकांच्या काळात ही संधी साधून आपणच घोषणा करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे, हे निंदनीय आहे. आता यावरुन आचारसंहितेचा भंग झाला आहे का, यावर वाद सुरु झाला आहे. तसे होणेही स्वाभाविकच आहे उठसुठ प्रत्येक बाबतीत पंतप्रधानांनी घोषणा करणे व त्याचे श्रेय लाटल्यासारखे दाखविणे हे निषेधार्थच आहे. यापूर्वी अशा घडलेल्या अनेक विक्रमांच्या घोषणा पंतप्रधांनी नव्हे तर इस्त्रोच्या प्रमुखांनी केल्या आहेत हे विसरता कामा नये. असो. आधुनिक विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनुषंगाने उपग्रहांचे महत्व खूप मोठे आहे. अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणाकडे पाहून त्यातले बदल ओळखून वेळीच डिझास्टर प्लॅनिंग करण्यासाठी उपग्रह गेली काही वर्ष खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. याबरोबरच माहितीचे आदान प्रदान, दळणवळण, विशेषतः सीमा सुरक्षेच्या दृष्टीने या उपग्रहांचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही तंत्रज्ञानाचा जसा विधायक वापर होऊ शकतो, तसाच त्याचा गैरवापरही होऊ शकतोच. अनेक विधायक कामांबरोबरच उपग्रह लांब पल्ल्याच्या मिसाईल्सना गाईड करण्यासाठी, एखाद्या देशावर, अगदी देशातल्या एखाद्या लहानशा भागावरही चोरून नजर ठेवून मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करण्यासाठीही वापरात येऊ लागले. अनेक देशांनी आपापले दळणवळण उपग्रह अंतराळात धाडले आणि एकूणच यामुळे भारतासारख्या देशांना राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आव्हान देऊ लागला. मग असा एखादा स्पाय उपग्रह जर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत असेल आणि ज्या देशाचा तो सॅटेलाईट आहे तो देश आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय डिप्लोमसीला झुगारून देत असेल तर आपण काय करायचे? चर्चेतून प्रश्न सुटतच नसेल तर अगदी शेवटचा पर्याय म्हणजे त्या उपग्रहावरच थेट सर्जिकल स्ट्राईक करणे. पण हे काम सोपे नाही. त्यासाठी अशी गाईडेड मिसाईल सिस्टम निर्माण करण्याची आवश्यकता होती जी एखाद्या मिसाईलला वातावरणाच्या अनेक लेअर्स छेदून एखाद्या उपग्रहाच्या अंतराळातल्या सद्य पोझिशनवर जाऊन मारा करण्याची ताकद देईल. पृथ्वीच्या फिरण्याची गती, त्या उपग्रहाच्या फिरण्याची गती आणि त्या उपग्रहाच्या ऑर्बिटचे गणित अशी बरीच आकडेमोड आणि गाईडेड ट्रॅकिंग याचा अचूक मेळ साधत मिसाईलने आपले टार्गेट कमीत कमी वेळात हिट करायचे आहे, आणि हेच काम करणारी संपूर्णतः भारतात विकसित झालेल्या प्रणालीची आज यशस्वी चाचणी झाली. चाचणी करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी आपलाच एक चालू उपग्रह या प्रणालीचा वापर करून यशस्वीपणे पाडला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका आणि रशियाने अवकाश संशोधनात फार मोठी झपाट्याने प्रगती केली. चीननेही एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला या क्षेत्रातील दमदार प्रगतीचे दर्शन जगाला घडविले. त्या देशाने 2003 मधील मानवी अवकाश मोहीम यशस्वी केली. आपणही अवकासाच्या क्षेत्रात अल्पावधीत मानाचे स्थान मिळविले. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आपण अवकाश तंत्रज्ञान हे स्वत:च विकसीत केले आहे.अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमार्फत दळणवळण, हवामानविषयक अंदाज अशा अनेक उपयोगांप्रमाणेच उपग्रहामार्फत टेहळणी करणे, प्रतिस्पर्धी देशांची गोपनीय माहिती मिळविणे, हेही होत असते. आपण मात्र जाणीवपुर्वक शांततेच्या व विधायक कार्यासाठी उपग्रहांचा उपयोग करीत आलो आहोत. मिशन शक्ती हे त्यादृष्टीनेही महत्त्वाचे पाऊल. पारंपरिक युद्धतंत्राच्या बाबतीत भारत आंतरराष्ट्रीय नियम आणि करारांना बांधील आहे; त्याचप्रमाणे अवकाश मोहिमांच्या बाबतीतही भारताने या मर्यादा नेहमीच पाळल्या आहेत आणि ही चाचणीदेखील त्याला अपवाद नाही. मुळात बाह्य अवकाश ही सार्या मानवजातीची ठेव आहे आणि त्यादृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे. आपण हे बंधन पाळत आलो तरी प्रत्येक देश हे पाळतीलच असे नाही. त्यादृष्टीने आपल्याकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध होणे ही गरज होती. अवकाश तंत्रज्ञानात प्रगती केलेल्या सर्वच देशांकडून ही अपेक्षा आहे. अवकाशही युद्धखोरीने व्यापून गेले, तर त्यात नुकसान आहे ते सार्या मानवजातीचेच. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रांत शांतता, सहकार्य आणि सौहार्द निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत राहणे सर्वांत महत्त्वाचे. सर्व स्तरांवर आपले किमान सामर्थ्य निर्माण करीत राहणे आवश्यक ठरते. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. आपल्या अवकाश तंत्रज्ञानातील हा देशी तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा टप्पा ठरावा.
-----------------------------------------------------------------

0 Response to "देशाचे शक्तीस्थान"
टिप्पणी पोस्ट करा