-->
रविशकुमार को क्युं गुस्सा आता है...?

रविशकुमार को क्युं गुस्सा आता है...?

रविवार दि. 10 मार्च 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
रविशकुमार को क्युं गुस्सा आता है...?
------------------------------------
एन.डी.टी.व्ही. जे ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार रविशकुमार यांनी नुकतेच पुढील तीन महिने कोणतेही न्यूज चॅनेल पाहू नये असे आवाहान केले आहे. त्यांचे हे आवाहन एैकल्यावर काहीचे आश्‍चर्यच वाटेल. रविशकुमार यांनी हे आवाहन लोकशहाीच्या रक्षमासाटी केले आहे, असेच ते म्हणतात. त्यांच्या या आवाहनामागे त्वेेश आहे, पोटतिडिक आहे, संताप आहे व लोकशाही टिकावी अशी तळमळ आहे. त्यांनी केलेले हे आवाहन आम्ही वाचकांसाठी खास देत आहोत. यातून सध्यपरिस्थिची कल्पना यावी अशी अपेक्षा आहे...
जर तुम्हाला असे वाटते की, तुम्ही तुमची नागरिकता वाचवणे गरजेचे आहे. तर तुम्ही चॅनेल्स पाहणे बंद करा. जर तुम्ही लोकशाहीमध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू इच्छिता तर तुम्ही चॅनेल पाहणे बंद करा. जर तुम्ही तुमच्या मुलांना सांप्रदायीकतेपासून वाचवू इच्छिता तर चॅनेल पाहणे बंद करा. जर भारतातील पत्रकारीता वाचवणे ही जर तुमची इच्छा असेल तर आपण चॅनेल पाहणे बंद करा. न्यूज चॅनेल पाहणे स्वत:ची हानी होताना पाहण्यासारखे आहे. मी आपल्याला विनंती करतो की, आपण कोणतेही चॅनेल पाहू नये. आपल्या रोजच्या जीवन क्रमातून न्यूज चॅनेल बघणे सोडून द्या. मला ही पाहणे बंद करा. पण सर्व न्यूज चॅनेल पाहणे बंद करा. मी ही बाब यापूर्वीही बोललो आहे. मी हे जाणतो की, आपण इतक्या लवकर या मुर्खपणाच्या नशेतून बाहेर येणार नाही. तुम्ही सध्या चॅनेलवर पाहात आहात ते वेडे जग आहे. ते एक उन्माद करणारे जग आहे. त्याची ही आता सवय झाली आहे. तसे हे पहिल्यादा होत नाही. जेव्हा पाकिस्तानबरोबर तणाव नसतो, त्यावेळी चॅनेलवाले मंदिराच्या विषयावर तणाव निर्माण करतात. जेव्हा मंदिराचा प्रश्‍न नसतो तेव्हा चॅनेलवाले पद्मावती चित्रपटावरुन तणाव निर्माण करतात. जेव्हा चित्रपटावरुन तणाव नसतो, तेव्हा हे कैराना येथील निवडणुकीनंतर हिंदू मुसलमान दरम्यान तणाव निर्माण करतात. आणि जेव्हा काहीच नसतं तेव्हा हे खोट्या सर्व्हेवर कार्यक्रम करतात. हे का होत आहे? हे लोकांचे प्रश्‍न नाहीत. चॅनेलचे प्रश्‍न लोकांचे प्रश्‍न बनवले जात आहे. ही इतकी छोटी बाब नाही की, तुम्ही ते समजू शकत नाही. चॅनेल्सवरुन जनतेच्या समस्यांना जागा मिळत नाही. तरुणांच्या प्रश्‍नांसाठी त्यांच्याकडे जागा नसते. चॅनल आता जेव्हा काही करतात, ते तणावासाठी करतात. जो तणाव एका नेत्यासाठी रस्ता तयार करतो. त्या नेत्याचे नाव आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी! न्यूज चॅनेल, सरकार, भाजप आणि मोदी यांचे एकत्रीकरण झाले आहे. हे एकत्रीकरण इतके जबरदस्त आहे की, पत्रकारिता आहे की, प्रचार आहे, ते समजण्याच्या पलिकडेच आहे. आपण एका नेत्याला पंसद करतो. काही अंशी ते गरजेचे पण आहे. त्या पसंतीचा वापर करुन चॅनेल द्वारा जे केले जात आहे, ते अत्यंत भयंकर आहे. भाजपच्या जबाबदार समर्थकांना खर्‍या सुचनांची गरज असते. सरकार आणि मोदींची भक्ती यामध्ये त्या भाजप समर्थकांना प्रोपोगंडा करणे हे त्या सर्थकांचा अपमान आहे. त्याला मूर्ख समजले तरी तो त्याच्या समोर असलेल्या सुचनांच्या आधारे कोणाचे तरी समर्थन करत असतो. आजच्या न्यूज चॅनेलनी फक्त सामान्य नागरिकांचा अपमान केला नाही तर, त्यांच्या सोबत भाजप समर्थकांचा देखील अपमान केला आहे. मी भाजप समर्थकांना देखील विनंती करतो की, तुम्ही देखील चॅनेल पाहू नयेत. आपण भारताच्या लोकशाहीच्या नुकसानास कारणीभूत ठरु नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनासाठी घसरलेल्या पत्रकारितेचे समर्थन करणे गरजेचे आहे काय? तर तुम्ही एक इमानदार राजनैतिक समर्थक नाहीत. पत्रकारीतेच्या मुल्यांचा वापर करुन आपण नरेंद्र मोदींचे समर्थन करु शकत नाही का? किंवा हे अशक्य झाले आहे? भाजप समर्थकांनो तुम्ही या भाजपला स्विकारले होते. या चॅनेलला नाही. घसरलेली पत्रकारीता हे राजकारण आणि त्यांच्या समर्थकांना देखील घसरवणार आहे. चॅनेल आपल्या नागरिकतेवर हल्ला करत आहेत. लोकशाहीत नागरिक हवेमध्ये घडत नाहीत. खर्‍या सुचना आणि खरे प्रश्‍न आपल्या नागरिकतेसाठी गरजेचे आहेत. या चॅनेलकडे हे दोनही नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व गोष्टीचे पालक आहेत, संरक्षक आहेत. त्यांच्या भक्तीने चॅनेलने स्वत:ला विकले आहे. आणि तुमचे विकले जाणे लोकशाहीसाठी घातक आहे.
भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे यांना राष्ट्रभक्त होण्याची संधी मिळाली आहे. यांच्याजवळ राष्ट्राप्रती कोणतेच प्रेम नाही. प्रेम असते तर लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेच्या मानांकनांना यांनी गाढले नसते. चॅनेलवर ज्या पद्धतीने भारताला दाखवले जात आहे. ज्या पद्धतीचा भारत आपल्या गळी उतरवला जात आहे, तो आपला भारत नाही. देश प्रेमाचा अर्थ असा होतो की, आपण सर्वांनी आपले काम उच्च आदर्श आणि उच्च मानकांच्या हिशोबाने करायला हवेत. हिम्मत तर बघा ना खोट्या सुचना आणि विश्‍लेषणांनी अशी देशभक्ती आपल्यामध्ये उतरवली जात आहे. आपल्या आतील प्राकृतिक चॅनेलला नष्ठ करुन न्यूज चॅनेल आपल्या मध्ये देशभक्तीचे प्राकृतिक चॅनेल उभा करत आहे. यामुळे आपण फक्त एक रोबोट बनले पाहिजे. या सरकारची इच्छा नाही की, आपल्या नागरिकांना खरी माहिती, सुचना मिळवून ते सक्षम नागरिक बनतील. आपल्यामध्ये जर सरकारचा विरोधी पक्ष तयार होत नसेल तर, आपल्या आत सरकारचा समर्थक देखील तयार होऊ शकत नाही. शुद्धीवर असताना सपोर्ट करणे आणि नशेचे इंजेक्शन देऊन सपोर्ट करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यामध्ये आपल्या स्वाभिमान झळकतो तर दुसर्‍यात अपमान! काय आपण अपमानीत होऊन हे न्यूज चॅनेल पाहू इच्छिता? याच्याद्वारे सरकारला समर्थन देऊ इच्छिता? माझा हा लेख करोडो लोकांपर्यंत पोहोचेल आणि करोडो लोक न्यूज चॅनेल पाहणे सोडतील. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जर हीच चॅनेलची पत्रकारीता आहे, तर भारताच्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. न्यूज चॅनेल एक असा समाज निर्माण करत आहे, जो खोट्या सुचनांच्या आणि अपुर्‍या माहितीच्या आधारावर आहे. हे चॅनेल पाहून तयार झालेला हा समाज त्या समाजाला हरवून टाकेल. ज्यांना माहितीची गरज आहे. ज्यांच्याजवळ प्रश्‍न आहेत. प्रश्‍न आणि सुचनांशिवाय लोकशाही नसते. सत्य आणि तथ्थ्यामधील प्रत्येक संभावना संपवली गेली आहे. मी प्रत्येक दिवशी नागरिकांना लोटलेले पाहतो. ही चॅनेल अशा ठिकाणी नागरिकांना लोटतात जिथे राजनिती आपले अवडंबर रचत आहे. राजकीय पक्षांच्या व्यतीरिक्त बाहेरच्या प्रश्‍नांची जागा शिल्लक राहिलेली नाही. किती प्रश्‍न आपली वाट पाहात आहेत. तुमची गुलामगिरी हेच त्यांच जिंकणे आहे. यांच्या प्रभावातून कोणीही इतक्या सहजा सहजी निघू शकत नाही. आपण एक दर्शक आहात. आपण एका नेत्याचे समर्थन करण्यासाठी पत्रकारीतेचे नुकसान करु नका. फक्त अडीच महिन्यांची बाब आहे. चॅनेल पाहणे बंद करा.
रविशकुमार यांचा हा राग सध्याच्या व्यवस्थेवर आहे. जी व्यवस्था लोकांना अपंग बनवित आहे. एका चॅनेलच्या पत्रकारानेच सांगावे की तुम्ही चॅनेल पाहणे बंद करा, यातून त्यांची अगतीकता स्पष्ट दिसते. वाचकांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी रविशकुमार यांचा लेख छापला आहे. यातून सध्याचे सरकार बदलण्याची किती गरज आहे हे लक्षात यावे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "रविशकुमार को क्युं गुस्सा आता है...?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel