-->
सेक्युलर विचारांंची वज्रमुठ

सेक्युलर विचारांंची वज्रमुठ

शनिवार दि. 12 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सेक्युलर विचारांंची वज्रमुठ
शेतकरी कामगार पक्षाचा अलिबागमध्ये गुरुवारी निघालेला महामोर्चा व राष्ट्रवादी कॉँग्रेसची महाडहून निघालेली संपर्क यात्रा तसेच कॉँग्रेसची नागपूरातून निघालेली जनसंघर्ष यात्रा पाहता आता विरोधकांची एकजूट होत सेक्युलर मतांची विभागणी टाळण्याच्या दिशेने पडलेली महत्वाची पावले आहेत. या तीनही घटानंतून सेक्युलर मतांची वज्रमुठ आता अदिकच मजबूत होत आहे, असे म्हणता येईल. देशात संविधान, लोकशाही बदलून हुकूमशाही आणण्याच्या दिशेने केंद्रातील मोदी सरकारच्या हालचाली आहेत. यातून जनतेने प्रामुख्याने सेक्युलर विचार मानणार्‍या जनतेने एकत्र येऊन हे सरकार खाली खेचण्याची आता वेळ आली असून आगामी लोकसभा निवडणुकीत त्यादृष्टीने पावले पडण्याची आवश्यकता आहे. पाच वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठी-मोठी आश्‍वासने दिली खरी परंतु त्याची पूर्तता होणे अशक्यच होते. अखेरीस तसेच झाले. पाच वर्षात सरकारला एकही आश्‍वासन पूर्ण करता आलेले नाही. साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. त्याचच पिरणाम म्हणून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाचही राज्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मागील निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट झाल्यामुळे भाजपला फायदा झाला. आता राज्यात समविचारी पक्षांची महाआघाडी करून भाजपला पराभूत करणार असल्याचा आखाडा बांधत महाआघाडी जन्मला आली आहे. यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप यांनी अगोदरच आपली वैचारिक पायावर आघाडी उभारली आहे. आता त्यांना समविचारी पक्ष जोडले जात आहेत.  महाराष्ट्रात 25 जागा काँग्रेसला आणि 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असे सूत्र ठरल्याचे काँग्रेसच्या राज्यपातळीवरील सूत्रांचे म्हणणे आहे. यवतमाळ आणि पुणे मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील. समविचारी पक्षांना आपापल्या कोट्यातून दोन्ही पक्ष जागा सोडतील, असेही या सूत्रांचे सांगणे आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत दुजोरा दिलेला नाही. परंतु आघाडी होणार हे नक्की आहे. त्यातून सेक्युलर मते विभागली जाणार नाहीत याची खात्री घेतली जात आहे. राज्यात 20 - 20 जागांच्या वाटपावर दोन्ही पक्ष सहमत असले, तरी आठ जागांचा तिढा कायम होता. काही जागांवर दोन्ही पक्षांकडून होणारे दावे, अदलाबदल करावयाच्या जागा, तसेच अन्य मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागा या कळीच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसांत तोडगा निघेल असे समजते. नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रामुख्याने महाराष्ट्रातील जागावाटप हाच बैठकीचा केंद्रबिंदू होता. जागावाटपाच्या सूत्रावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या परस्परविरोधी दाव्यांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वमान्य तोडगा निघावा यावर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. यामध्ये मतदारसंघांची अदलाबदलदेखील प्रस्तावित आहेे. यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, नंदुरबार, रावेर, नगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या आठ जागांवर दोन्ही पक्षांची रस्सीखेच आहे. शिवाय, हा तिढा सोडविण्यासाठी काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यामध्ये भिवंडी, औरंगाबाद, जालना हे मतदारसंघ विचाराधीन आहेत. नगरसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील विशेष आग्रही आहेत; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने नगर कोणत्याही परिस्थितीत आपल्याचकडे राहील असे स्पष्ट केले आहे. याखेरीज भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी डावे पक्ष, राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि शक्य झाल्यास प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य समविचारी पक्षांना कशा प्रकारे या आघाडीत सामावून घेता येईल, त्यासाठी किती जागा सोडाव्या लागतील, त्या जागा कोणत्या पक्षाच्या हिश्शातील असतील, याचा पेच अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे शिवसेना-भाजपा यांची युती तुटल्यात जमा असे चित्र असले तरी शिवसेना पुन्हा युतीसाठी उत्सुक असल्याच्या बातम्या आहेत. खरे तर या दोघांमध्ये तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो असेच नाते आहे. शिवसेनेला असे वाटते की, आशा प्रकारे आपण जनतेला व शिवसैनिकांना खेळवून काही तरी मोठे राजकारण करीत आहोत. परंतु त्यांच्या या वागण्यामुळे जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. अनेकदा निष्ठावान असलेला शिवसैनिकही कधी नव्हे तो भ्रमीष्टासारका झाला आहे. कारण एकीकडे सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे त्याच सरकारला जाहीरपणे शिव्या घालायच्या. आघाडीने नेतृत्व करीत असलेल्या मोदी यांना चौकीदार चोर आहे असे म्हणावयाचे आणि दुसरीकडे त्यांच्याशीच पुन्हा युती करण्याची चर्चा करायची, हे शिवसेनेचे वागणे त्यांना खड्यात घालणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जोरात येऊन त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास सेक्युलर मते विभागली जाणार नाहीत. यावेळी शिवसेना-भाजपाच्या सरकारला मते देताना जनता त्यांच्या कारभाराचा हिशेब विचारणार आहे. त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखे काहीच नाही. अशा स्थितीत आघाडी मजबुतीने वाटचाल करु शकते.
------------------------------------------------------------- 

0 Response to "सेक्युलर विचारांंची वज्रमुठ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel