-->
संपादकीय पान गुरुवार दि. ५ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
तियानान्मेन घटनेची २५ वर्षे व ब्यू स्टार ऑपरेशन्सची ३० वर्षे
------------------------------------
एैशीचे दशक हे खर्‍या अर्थाने राजकारण, अर्थकारण व समाजकारणाच्या दृष्टीने हेलावून सोडणारे दशक होते. त्यावेळी जग हे पूर्णपणे अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमध्ये वाटून घेण्यात आले होते. त्यामुळे जगातील सर्व राजकारणाची केंद्रें या दोन महासत्ता होत्या. या पार्श्‍वभूमीवर भारत व लाल चीन या दोन देशात महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतात पंजाबातील अतिरेकी कारवायांनी परिसिमा गाठली होती आणि या अतिरेक्यांचा पवित्र सुवर्णमंदीरातील तळ उद्धस्थ करण्यासाठी ३ जून रोजी ब्यू स्टार ऑपरेशन ही कारवाई बरोबर ३० वर्षांपूर्वी करण्यात आली. याचे पडसाद देशात उमटले होते. लष्करातील शीख जवानांनी बंड करण्यापर्यंत मजर मारली होती. मात्र या घटनेनंतर शीख अतिरेकी कारवायांना पायबंद घालण्यत यश आले होते. यानंतरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकाकडून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अशा प्रकारे ब्लयू स्टार ऑपरेशनच्या हादर्‍या नंतर चीनमध्ये बरोबर पाच वर्षांनी याच जून महिन्यात तियानान्मेन चौकात व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरणार्‍या तरुण निदर्शकांवर चीनी सरकारने रनगाडे फिरवून त्यांचे आंदोलन दडपले होते. या घटनेला आता २५ वर्षे झाली आहेत. परंतु या घटनेने संपूर्ण जगाला हादरा बसला होता. चीनच्या राजधानीतील तियानान्मेन चौकात १९८९ साली तरुणांची निदर्शने ३ जूनच्या मध्यरात्री आणि ४ जूनच्या दिवशी रणगाडे फिरवून चिरडून काढली. त्या घटनेला २५ वर्षे होत असताना बंडखोरीचा संभाव्य आवाज दाबून टाकण्यात आताचे चिनी सरकारही पुढे आहेच. तियानान्मेन दिनाच्या अगोदर ज्यांना ताब्यात घेण्यात आले वा बेपत्ता करण्यात आले, त्यांत पत्रकार, मानवी हक्कांसाठी लढणारे वकील व गुओ जिआनसारखा चित्रकारही आहे. अशी अटक होणे हा या चित्रकाराचा जणू एकप्रकारे बहुमानच वाटावा, एवढी राजकीय ताकद त्याच्या चित्रांमध्ये आहे. वयाच्या १७व्या वर्षी, १९७९ मध्ये गुओ जिआन चिनी लष्करात दाखल झाला. या लष्कराचेच मचित्रकला महाविद्यालय आहे, तेथे प्रचारकी कला शिकवली जाते. तेथे जिआनने कौशल्ये शिकून घेतली. लष्कराच्याच कला विभागातील सैनिक म्हणून त्याची भरती झाली, तेव्हाच (१९८२) राजीनामा देऊन तो गुइशू प्रांतातील मूळ गावी परतून ट्रकचालक बनला! चिनी सरकारवर टीका राजकीय स्पर्धेतून नव्हे तर हताशेतून करणार्‍या सिनिकल रिऍलिझम. या शैलीची सुरुवात जिआनने केलेली नसली, तरी त्याचे नाव या शैलीच्या चित्रकारांत अग्रगण्य आहे, ते त्याच्या याच मनोभूमिकेमुळे. ही चित्रे पाहूनच ऑस्ट्रेलियात अनेकदा प्रदर्शने भरवण्याची संधी त्याला मिळाली. पुढे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्वही मिळाले. त्या देशात राहून जिआनच्या कुंचल्यातील टीकेची धार आणखीच वाढली. तेथून २००५ साली तो चीनमध्ये परतला.  सैनिकांची लैंगिक उपासमार, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, देशभक्तीचे प्रतीक म्हणून स्त्रियांची चित्रे वापरण्यातून लैंगिकतेचेच होणारे उदात्तीकरण आणि अशा अनाठायी उदात्तीकरणाच्या दावणीला बांधली गेल्यामुळे प्रत्यक्ष जगण्यात विकृत वळणाला जाणारी लैंगिकता, अशी वैचारिक मांडणीच जिआनने गेल्या १५ वर्षांतील चित्र-शिल्पांतून केली आहे, म्हणून तो महत्त्वाचा. एक्साइटमेंट : ग्रेट तियानान्मेन या १९९८ सालच्या चित्रातून आणि २०११ साली डायोरामा ऑफ तियानान्मेन या प्रचंड (१५ फूट बाय सव्वासात फूट) प्रतिकृतीवजा शिल्पातून गुओ जिआनने एक शोकांतिका अधोरेखित केली. त्याच्या मते, हे असे चिरडणे- स्वत:ची सत्ता अबाधित राखणे यात अनेक सत्ताधार्‍यांना धन्यता वाटते, ही खरी शोकांतिका आहे. ब्ल्यू स्टार ऑपरेशन असो वा तितान्मेनची घटना असो याने जगाला हादरा दिला होता. आज ऐवढी वर्षे झाली तरीही या घटना ज्यासाठी घडल्या ते प्रश्‍न अजूनही कायम आहेत. आज आपल्याकडे शीक अतिरेकी संपले असले तरीही दहशतवाद काही संपलेला नाही. तसेच चीनमध्येही व्यक्ती स्वातंत्र्यावर अजूनही मर्यादा   आहेत.
---------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel