-->
अ‍ॅप मय आपण!

अ‍ॅप मय आपण!

शनिवार दि. 30 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अ‍ॅप मय आपण!
2017 सालात आपण तंत्रज्ञानविषयक अनेक नवीन बाबींचा पुरस्कार केला. मोबाईल हे तंत्रज्ञान आता आपल्याकडे जुने होत असले तरी त्यातील स्मार्ट फोनने आता एक एक चमत्कार दाखवायला सुरुवात केली आहे. मोबाईल फोनमधील अ‍ॅप हे आता आपले आयुष्य भविष्यात बदलून टाकणार आहेत. त्याची सुरुवात या वर्षात सुरु झाली असे म्हणावयास काही हरकत नाही. आता जवळजवळ प्रत्येक विषयातील अ‍ॅप सुरु झाले आहेत. यातील काही पैसे देऊन घ्यावे लागतात तर काही मोफत असतात. अर्थात या अ‍ॅपमुळे मानवाचे आयुष्य सुकर जाणार आहे, हे नक्की. त्यामुळे आपल्या खर्चातही बचत करता येऊ शकते. पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती लाभत आपण सरकारी तिजोरीवरील भारही कमी करु शकतो. याचे एक उत्तम उदाहरण देता येईल ते वाहानांसाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅपचे. आपल्याकडे सध्या मोठ्या शहरांमध्ये ओलासारख्या अ‍ॅपने आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडविले आहेत. या टॅक्सींनी तर पारंपारिक टॅक्सी व्यवसायाला एक नवे परिमाण दिले. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे ओला अ‍ॅपमार्फत ही वाहन सेवा देणार्‍या कंपनीच्या मालकीचे स्वत:चे एकही वाहन नाही. केवळ त्यांच्या अ‍ॅपवर हा व्यवसाय केला जातो. यातून ग्राहकांना उत्तम सेवा व सुरक्षितता, चालकाला चांगल्या रोजगाराची हमी मिळाली आहे. त्यामुळे आता ही सेवा झपाट्याने लोकप्रिय झाली आहे. आपल्याकडे शहरात गाडी घेणार्‍यांचे प्रमाण जास्त असले तरीही एकूण देशाच्या लोकंसंख्येचा विचार करता कार मालकीचे प्रमाण कमीच आहे आणि वाहतुकीचे पायाभूत घटक गेल्या दशकांपासून वेगाने होत असलेल्या शहरीकरणाच्या तुलनेत वाढलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. सध्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सीसारखे पर्याय तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी ओलासारख्या राइड-हिलिंग प्लॅटफॉर्मवर आले आहेत. 2017 वर्षात लाखो भारतीयांनी राइड शेअरिंग आणि शेअर्ड मोबिलिटीच्या जादूचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. ओलाच्या नव्या सुविधांमुळे 10 कोटींपेक्षाही अधिक नागरिकांसाठी किफायती वाहतूक सुविधा आता आवाक्यात आली आहे. एकाच मोबाइल अ‍ॅपवर राइड हिलिंगचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे कार खरेदी करण्याचेच नव्हे, तर आपली कार चालवण्याची गरजदेखील बहुतांश प्रमाणात घटली आहे. आता लोकांकडे गरज आणि उपयुक्ततेनुसार ऑटोरिक्षापासून बस आणि लक्झरी कारपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर्ड मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एक वाहन 10 ते 44 कार रस्त्यावरून हटवते, असा अनुभव आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या मते एकट्या ओलाच्या शेअर्ड मोबिलिटीने 80 लाख लिटर इंधन, 1.40 कोटी किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी केले आणि 1.30 कोटी कार रस्त्यावरून बाजूला केल्या. 10 लाखांहून अधिक ड्राइव्ह पार्टनर आणि वर्षभरातील कोट्यवधी राइडच्या माध्यमातून जो डेटा उपलब्ध होतो त्याचा वापर सुयोग्य शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक प्रमाणात वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारे ओलाच्या माध्यमातून आपण एकीकडे चांगली ग्राहक सेवा बहाल करीत असताना दुसरीकडे इंधनाचीही मोठ्या प्रमामात बचत केली आहे. रस्त्याची जी पायाभूत सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे ती दिवसेंदिवस घटत चालली आहे. म्हणूनच विद्यमान सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीला सहायक बनण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतूक समाधान अत्यंत आवश्यक ठरते. याच सोबत मास ट्रांझिटला राइड शेअरिंगशी जोडण्याची समस्या अधिक महत्त्वपूर्ण आहे. एक अब्ज भारतीयांना पुरेशी वाहतूक सेवा देणे हे आमचे मिशन आहे. भारताच्या गरजा अशा आहेत की कोणताही एक तोडगा सर्वांचे समाधान करू शकत नाही. मोठ्या आणि लहान शहरांच्या, वस्त्यांच्या गरजा निराळ्या आहेत. मोठ्या शहरात कोणत्या प्रकारच्या वाहतुकीचा वापर होईल हे उपयोग, उपलब्धता आणि दर यावरून ठरते. प्लॅटफॉर्म आधारित नवी सुविधा देण्याच्या सोबतच ऑटोरिक्षा, बस, टॅक्सीसारख्या विद्यमान साधनांमधील सुधारणादेखील सहायक ठरू शकते. शहरी भारतात दररोज 30 कोटी ट्रिप लागतात. अशा प्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या जीवनात झपाट्याने बदल करीत आहे. युरोप-अमेरिकेत कार मालकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याचा अधिक प्रमाणात वापर होत असतो. त्यांच्याकडे असलेली कमी लोकसंख्या व प्रशस्त रस्ते यामुळे त्यांच्याकडे प्रत्येकाचे एक वाहन चालू शकते. मात्र भारतात असे चालणे कठीण आहे. असा वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करीत असताना अशा प्रकारचे वाहनाचे शेअर मोबिलीटी पर्यय उत्तम ठरु शकतात. इलेक्ट्रिक वाहनांसारखे पर्याय बाजारपेठेत येत असल्यामुळे आपल्याकडे आता इंधन बचत होऊ घातली आहे. वाढते शहरीकरण लक्षात घेता मेट्रो सेवा हे एक व्यवहार्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरू शकते. इलेक्ट्रिक बस, ई-कॅब, ई-रिक्षासारखे वाहनदेखील चांगला पर्याय ठरू शकतात. यामुळे तेलावरील अवलंबित्व आपोआपच कमी होईल. आपल्याला आता पुढील वीस वर्षात तेलावरील अवलंबित्व कमी करुन पर्यायी व्यवस्था कशी करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. सौर उर्जा हा त्यातील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
---------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "अ‍ॅप मय आपण!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel