-->
पर्यटनाची धूम!

पर्यटनाची धूम!

शनिवार दि. 23 डिसेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
पर्यटनाची धूम!
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या अलिबागमध्ये शनिवारी पर्यटन महोत्सवाची धूम सुरु होत आहे. चार दिवस चालणार्‍या महोत्सवात खाद्यपदार्थांची तसेच कार्यक्रमांची मोठी रेलचेल असेल. सध्या गुलाबी थंडीच्या वातावरणात या महोत्सवाची मजा काही औरच असेल. अलिबाग नगरपालिका व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायिकांना प्रोत्साहन तसेच महिला बचत गटांना आपली व्यवसायवृध्दी करणची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटन महोत्सवात 120 स्टॉल उभारण्यात आले आहे. पहिल्या दिवशी महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केल्यावर दुसर्‍या दिवशी रविवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता स्वच्छ सुंदर व प्लास्टीक मुक्त अलिबागसाठी ड्रीम रन चे आयोजन केले आहे. यामध्ये विद्याथ्यार्ंंसह ज्येष्ठ मंडळी व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचाही यामध्ये सहभाग असणार आहे. सायंकाळी सात वाजता लोकशाहीर नंदेश उमप निर्मित बहारदार गाण्याचा कार्यक्रम सादर केला जाईल. तिसर्‍या दिवशी सोमवारी 25 डिसेंबर रोजी खास महिलांसाठी होम मिनीस्टर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम महिलांसाठी खुला असून विजेत्या महिलांसाठी प्रसिध्द पैठणी देण्यात येणार आहे. तसेच इतर आकर्षक बक्षीसेही देऊन महिलांचा गौरव केला जाणार आहे. मंगळवारी 26 डिसेंबर रोजी पर्यटन महोत्सवाचा चौथा व शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशी शाळेतील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सकाळी दहा वाजता महोत्सवामध्ये होणार आहे.  वेगवेगळ्या वर्गातील विदयार्थ्यांचा गट तयार करून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शहरातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, बँकीग आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंताचा महोत्सवात विशेष सत्कार केला जाईल. सायंकाळी महोत्सवाच्या सांगता समारंभात स्थानिक कलाकारांना व्यासपिठ देण्याच्या दृष्टीने खास सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटक व स्थानिकांसाठी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केला जाणार आहेत. पर्यटनाच्या नकाशावर अत्यंत लोकप्रिय असलेल्या अलिबागची म्हणून एक वेगळी ओळक आहे. येथे मुबंई-पुण्यातील पर्यटक जसा येतो तसा समुद्रकिनार्‍याची मजा लुटण्यासाटी घाटावरुनही पर्यटक येतो. अशा प्रकारे एक दिवसांची मजा लुटायला येणारा पर्यटक जसा इ़थेे येतो तसेच दोन-तीन दिवस येऊन येथील सृष्टीसौंदर्याशी एकरुन होऊन पुन्हा शहराकडे वळणारा पर्यटकही येथे हजेरी लावतो. मुंबई येथून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तसेच कॅटामरानच्या सेवेमुळे सुखकर प्रवास करीत येणारा पर्यटक हा प्रामुख्याने शनिवार-रविवारी येतो. दोन दिवस मजा करुन सोमवारी तो मुंबईतल्या आपल्या कर्यालयात थेट जाऊही शकतो. त्यादृष्टीने पर्यटकांना अलिबाग हे एक सोयीचे विकएंड डेस्टिनेशन ठरते. अलिबाग सुमारे सव्वातीनशे वर्षापूर्वी रामनाथ गाव या नावाने ओळखले जायचे. आंग्रे कालीन अष्टागरांतील या प्रमुख परिसरात अलिनामक तत्कालीन धनीक व्यक्तींनी शहर वाढीसाठी आपल्या बागा कमी करुन जागा दिल्याने त्याची आठवण म्हणून रामनाथ गावाच्या ऐवजी अलिबाग हे नाव रुढ झाले. या अष्टागरांत नारळी- पोफळीची मोठ्या प्रमाणांत झाडे होती. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात भुंग्याचा वावर होता. अलिया शब्दाचा संस्कृत शब्दार्थ भुंगा असा आहे. येथील बागांमधील भुंग्याचे मोठे वैशिष्ट्य लक्षात घेता या परिसराचे नामकरण अलिबाग झाले असे सांगितले जाते. अलिबागची ग्रामदेवता असलेल्या काळंबा देवीच्या मंदिराजवळच अलिचा दर्गा आहे. त्याची पुजा करुन वंदन करणारे मुस्लिम बांधवांबरोबर हिंदु बांधव आजही अलिबागेत आहेत. काळंबादेवीचा नवरात्रौत्सव जसा जल्लोषात होतो तसा आंग्रे काळापासून अलिच्या दर्ग्याच्या ऊरुस देखील धुमधडाक्यात साजरा होतो. या टुमदार शहराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील हिंदू- मुस्लिम धर्मीयांत कधीही वाद वा तंटा निर्माण झाले नाहीत उलट नेहमी सलोख्याचेच संबंध राहिले. याच सलोख्यामुळे अलिबागच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेची मुहुर्तमेढ रोवणार्‍या अलिबागच्या पहिल्या सार्वजिनक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. अ‍ॅड. दत्ता खानविलकर तर सचिव पै. पापाभाई पठाण हे होते. सार्‍या विश्‍वांतील ज्यू वा बेने इस्त्रायली धर्मियांचे वास्तव देखील अलिबागेत दुधात साखर विरघळावी असे आहे. सुमारे 150 वर्षापूर्वीचे अलिबाग कोळीवाड्यांतील ज्यूंचे प्रार्थनास्थळ हे सार्‍या ज्यूचे पवित्र स्थान आहे. या ज्यू धर्मियांप्रमाणेच पारशी धर्मियांना देखील अलिबागकरांनी आपल्यात सामावून घेतले आहे. व्यापाराच्या निमित्ताने त्यावेळी अलिबागेत आलेले गुजराथी, मारवाडी बांधव कच्छी समाजाचे लोक अलिबाग झाले हे कुणाला कळलेच नाही, इतके हे घट्ट नाते आहे. शहरांतील मुख्य मारुती नाक्यावर असणार्‍या मारुती मंदिरांतील मारुतीला मिशा आहेत. हे एक आगळे वेगळे धार्मिक स्थान आहे. आर.सी.एफ.च्या प्रकल्पात नोकरीच्या निमित्ताने आलेल्या बंगाली बांधवांचा कोलकत्यांतील कालीमाता उत्सव उत्सव तर चेन्नईतून आलेल्या मद्रासी बांधवांची आय्यप्पा पूजा देखील धार्मिक सलोखा प्रिय अलिबागकरांनी श्रद्धेने स्विकारली. पर्यटकांसाठी येथे एक मोठी पर्वणीच आहे. निसर्गाच्या लयलुटीबरोबरीने अलिबाग किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावर समुद्रात जलदुर्ग कुलाबा किल्ला उभा आहे. शहरात जुनी नवी अशी पुरातन व आधुनिक मंदिरे आहेत. त्याकाळी आंग्रेचे प्रसिद्ध दिवाण गोविंदशेठ रेवादास रत्नागिरीकर यांनी बरीच मंदिरे स्वत:साठी व आंग्रेसाठी बांधली. सागराचे सान्निद्य व समशितोष्ण हवामान याचे इंग्रज सत्ताधिकार्‍यांना आकर्षण वाटल्याने त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण म्हणून अलिबाग शहराची निवड केली. निसर्गरम्य वातावरणामुळे ब्रिटीशांनी राहण्यासाठी आपली निवासस्थाने व कार्यालयासाठी दगडी बांधकाम असलेल्या इमारती बांधल्या. आजही या इमारती इतिहासाची साक्ष देत मोठ्या अभिमानाने उभ्या आहेत. एवढेच कशाला अलिबागला जगाच्या नकाशावर नेणारी चुंबकीय वेधशाळा येथे आहे. अशा या अलिबागला आजपासून चार दिवस पर्यटन महोत्सवाची लगबग आहे, त्याला जरुर या.
---------------------------------------------------

0 Response to "पर्यटनाची धूम!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel