-->
गुजरातमधील घुसळण

गुजरातमधील घुसळण

गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
गुजरातमधील घुसळण
गेली 22 वर्षे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष यावेळी गुजरातमध्ये कशी कामगिरी करणार असे एक मोठे प्रश्‍नचिन्ह उभे आहे. पक्षाला 182 जागांपैकी किती जागा मिळणार हा सवाल आहे. पक्षाला जर 100 च्या आत जागा मिळून निसटता विजय मिळाला तरी भाजपासाठी तो मोठा पराभव असेल. आजवर गुजरातमधील गेल्या दोन दशकाच्या राजकारणात हिरो होते ते नरेंद्र मोदी. त्यांनी पक्षाला जागा मिळवून देण्याच्या राजकारणात सर्वोच्च जागी नेऊन बसविले. परंतु मोदी दिल्लीच्या राजकारणात गेले व गुजरातमधील राजकारण बदलू लागले. 2014 पासून गुजरातच्या राजकारणात अंतर्गतपणे धक्के बसू लागले आहेत. विशेष धक्का पाटीदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मिळाला. हार्दिक पटेल या 22 वर्षाच्या तरुण पोराने भाजपाला एक मोठे आव्हान केले. अनपेक्षीत असे हे सर्व होते परंतु राजकारण कसे फिरत गेले हे कोणाच्याच लक्षात आले नाही. कॉग्रेस पक्ष येते दोन दशके सत्ता नसल्यामुळे पूर्णपणे दुबला झाला आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कॉग्रेसने अनेक ग्रामपंचायती जिंकल्या. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी नव्हे एवढे लक्षणीय यश लाभले. त्यामुले काँग्रेसच्या आशा देकील प्रफुल्लीत झाल्या. त्यामुले यावेळी भाजपा व कॉग्रेस अशीच प्रामुख्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे. दर आठवड्याला पंतप्रदान काही ना काही निमित्त करुन गुजरातला भेटी देत आहेत. त्यावरुन भाजपाला हे राज्य हातातून जाते की काय अशी भीती वाटू लागल्याचे स्पष्ट आहे. गुजरातमधील या निवडणुकीत यावेळी देखील विकासाचा मुद्दा कळीचाच ठरणार आहे. ही निवडणूक एका राज्याची असली तरी तिचे पडसाद मात्र राष्ट्रीय स्तरावरचे असतील यात काहीच शंका नाही. विकास पगला थई गयो हे कॉग्रेसचे पहिल्या टप्प्यातील कॅम्पेन चांगलेच प्रभावी ठरले आहे. त्याला उत्तर देताना भाजपा बॅकफूटवर गेला आहे. राष्ट्रीय राजकारणातले भाजपाचे चलनी नाणेे नरेंद्र मोदी आणि राज्याच्या राजकारणातले धोरणकर्ते अमित शहा हेच राज्याच्या राजकारणाची व्यूहरचना आखत आहेत. गुजरात राज्याचे नेते विजय रूपानी यांच्या तुलनेत मोदी-शहा यांनी राज्यांचं राजकारण घडवण्याची तीव्र इच्छाशक्ती व्यक्त केली आहे. गुजरातमधील निवडणुकीबरोबर हिमाचल प्रदेशातही निवडणूक होत आहे. मात्र चर्चा ही सर्वत्र गुजरातचीच आहे. 182पैकी 150 हे लक्ष्य मिशन मोदी-शहा यांचे आहे. रूपानी हे राज्याच्या राजकीय अर्थकारणातले एक महत्त्वाचे घटक आहेत. जनपाठिंबा, व्यूहरचना आणि राजकीय अर्थकारण अशी त्रिस्तरीय रचना भाजपने केली आहे. या तीन घटकांमुळेच भाजपचा गुजरात हा सध्या बालेकिल्ला आहे. गुजरातचा गड सर करणे म्हणजे राज्याच्या नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणाला आव्हान देण्यासारखे आहे. हे आव्हान रूपानी यांना नव्हे, तर मोदी-शहा यांना असते, हे लक्षात घेऊन भाजपचा स्पर्धक असलेल्या काँग्रेसने गुजरातच्या राजकारणात मुसंडी मारली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातच्या राजकारणात भाग घेतला आहे. गुजरातचे दौरे सुरू केले आहेत. द्वारका-राजकोट असा दौरा त्यांनी केला. सौराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि जनता यांच्यामध्ये काँग्रेसबद्दल आशावादी दृष्टिकोन तयार केला. अशोक गेहलोत यांच्याकडें गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे. गेहलोत हे राज्याच्या बाहेरचे, परंतु मागासवर्गीयांचे राजकारण करणारे एक महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी आहेत. सोलंकी यांच्या तुलनेत गांधी-गेहलोत ही जोडगोळी राष्ट्रीय पातळीवरून राजकारण करत आहे. सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे चिरंजीव. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा वारसा त्यांच्याकडे आहे; मात्र एकूण भाजप विरुद्ध काँग्रेस या सत्तास्पर्धेत राज्याच्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवरून जुळणी जास्त होत आहे. गुजरातमध्ये व्यापारी, लहान उद्योजक हा भाजपाचा मुख्य पाया आहे. हा पाया गेल्या वर्षात बर्‍यापैकी ढिसूळ झाला आहे. कारण जी.एस.टी.मुळे हा वर्ग हैराण आहे. कोणताच कर द्यायला व्यापार्‍यांचा विरोध नाही. मात्र त्यात सुटसुटीतपणा असावा ही त्यांची मागणी आहे. याच धागा पकडत  शिक्षण, आरोग्य, नोकरी, शेती, छोटे व्यापारी, छोटे उद्योगपती यांच्या विकासावर काँग्रेस लक्ष केंद्रीत करत आहे, तर भाजपचे लक्ष मेगा विकासावर आहे. या या दोन्ही विकासांच्या चर्चांमधून सध्याचे गुजरातचं निवडणुकीय राजकारण घुसळत आहे. वीस-बावीस वर्षांपूर्वीच्या काँग्रेसच्या विकासाचे आकडे आणि भाजप युगातले विकासाचे आकडे यांची तुलना केली जात आहे. या चर्चांमध्ये गुजराती अस्मिता मध्यवर्ती ठेवण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गुजराती अस्मितेची ढाल उभी करत आहेत. गुजराती आणि स्थानिक अस्मिता यांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेसची गुजरातविरोधी, स्थानिकविरोधी, भांडवलदारविरोधी अशी प्रतिमा उभी करण्याची भाजपची व्यूहरचना दिसते. काँग्रेसकडं स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळे काँग्रेसची विकासाची संकल्पना तळागाळात जाण्यास मर्यादा आहे. काँग्रेसची सामाजिक रचना भाजपच्या तुलनेत प्रभावी आहे. कारण पाटीदार भाजपविरोधात गेले आहेत. एकीकडे भाजप वर्चस्व दिसत असताना त्याला अल्पसंख्याक, दलित यांची साथ फार नाही. राहुल गांधी यांच्या समर्थकांची संख्या वाढत आहे. सोशल मीडियात काँग्रेसनं शिरकाव केला आहे. अर्थात यात बाजी कोण मारणार हे कळच ठरवील.
-------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "गुजरातमधील घुसळण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel