ज्ञानभंडाराची शतसंवत्सरी
शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख
------------------------------------------------
ज्ञानभंडाराची शतसंवत्सरी
अलिबागमधील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय आज शतसंवत्सरी पूर्ण करीत आहे. एखाद्या संस्थेने स्थापनेची शंभरी पूर्ण करणे ही अत्यंत महत्वाची घटना ठरावी. राज्यात अशा प्रकारे शतसंवत्सरी पूर्ण करणारी केवळ 85 ग्रंथालये आहेत. आता त्यात अलिबागच्या या ग्रंथालयाचा समावेश झाला आहे. 17 ऑक्टोबर 1917 साली विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेल्या ग्रंथालयाने आपल्या शतकी वाटचालीत अनेक चढ उतार पाहिले. मात्र ही संस्था काळाच्या ओघात वाढतच गेली व अलिबागच्या वैभवात तिने भर घातली. रायगड जिल्ह्यात तर 90 ते 95 शासनमान्य ग्रंथालये आहेत. त्यामध्ये मुरुड, श्रीवर्धन, माथेरान, पाली, शहाबाज येथील व करसनदास मुलजी वाचनालय या सार्वजनिक वाचनालयांनी यापूर्वीच शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. स्वातंत्र्यपूर्वी काळात वाचनालये ही केवळ मोजक्याच लोकांची मक्तेदारी होती. मात्र शिक्षणाचे महत्व पटून सुशिक्षांचे प्रमाण वाढू लागले तसे वाचक वाढत गेले व वाचनालयेही फोफावत गेली. आताच्या काळाप्रमाणे त्याकाळी सोशल मिडिया किंवा वृतपत्रेही गावोगावी पोहचत नव्हती. अशा वेळी वाचनालयेच ही ज्ञानप्रसाराची कामे करीत. स्वातंत्र्यांच्या चळवळींचे स्पुलिंग याच चळवळीतून वाढत गेले. 1828 पासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहिली. पहिले ग्रंथालय 1828 साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटीश अमदानीत काही कारणास्तव ब्रिटीशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले. त्यापाठोपाठ सुरु झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील 1838 साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापिलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर 1840 साली नाशिक येथील ग्रंथालय सुरु झाले. पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ही चळवळ फोफावत गेली. या चळवळीला संस्थानिकांनी मोलाची मदत केल्याचे आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे लक्षात घेण्याजोगी आहेत. काही ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, दादर, ठाणे आदींचा त्यात समावेश आहे. यातील बहुतांश ग्रंथालये नेटिव्ह जनरल याच नावाने सुरु होऊन कालांतराने नगर, सार्वजनिक वाचनालय म्हणून रुपांतरीत झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरुन त्याचे नाव ग्रंथालयास दिल्याचे आढळते. तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली किंवा भरीव देणगी दिली आहे. अशांची नावे ग्रंथालयास दिलेली आहेत. नेटिव्ह जनरलमध्ये बर्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मा देखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. त्यांच्या अफाट कार्यातून मराठी ग्रंथसंग्रहालयांनी एक वेगळीच उंची गाठली आहे. अलिबागच्या ग्रंथालयाचाही असाच गंमतीदार इतिहास आहे. यात वेळोवेळी अलिबागकरांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शहरांतील एक प्रतिष्ठित वकील द.स. मणेरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे कामकाज सुरु झाले. मनोरंजनाबरोबर ज्ञानदान करणारी ही संस्था असल्याने व शहरातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याने संस्थेबद्दल नागरिकांच्या मनात एक वेगळेच कुतूहल व आपुलकी होती. त्याकाळी स्थानिक दानशून व्यक्तिनी आर्थिक हातभार लावल्याशिवाय अशा संस्था उभ्या राहत नसत. अलिबागच्या या ग्रंथालयाच्या वाढीसाठी बरेच हात पुढे आले. सुरुवातीला लागणारी आर्थिक मदत श्रीमंत सरदार बिवलकर यांच्याकडून मिळाली. बाजारपेठेतील भाड्याच्या घरात असलेले ग्रंथालय पुढे मोठ्या इमारतीत येईपर्यंत कै. डोंगरे यांच्याच घरात होते. पुढे संस्थेचा व्याप वाढतच होता. मोठ्या जागेची गरज होती. अलिबाग तालुक्यातील आक्षीचे बालामृतकार डोंगरे यांचा मोठा आधार संस्थेस मिळाला. डॉ. विनायक कृष्णाजी व दिनकर कृष्णाजी डोंगरे यांनी समुद्र किनार्याकडे जाणार्या रस्त्यावरील मोक्याची अशी 23 गुंठे जागा, या जागेच्या मध्यभागी 15000 रु. खर्च करुन टुमदार इमारत वाचनालयासाठी बांधून दिली. या इमारतीत त्यांनी डोंगरे हॉल ट्रस्ट निर्माण करुन ग्रंथालयास दिले. आजच्या वाढलेल्या जागेच्या किंमती पाहता केवढे मोठे औदार्य वाचकांसाठी डोंगरे कुटुंबानी दाखविले होते हे वाखाणण्याजोगे आहे. ग्रंथालय सुरु झाल्यापासून 30 वर्षांनी म्हणजे 1948 साली कुलाबा जिल्हा ग्रंथालय म्हणून सरकारी मान्यता मिळाली. त्यावेळी शासनाकडून अनुदानही मिळू लागले. अलिबाग नगरपालिकेकडूनही अनुदान मिळू लागले. 1926 साली डोंगरे हॉलचे उद्घाटन श्रीमत जगद्गुरु शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या हस्ते झाले. दिनांक 22 मार्च 1926 रोजी या नवीन इमारतीत ग्रंथालय सुरु झाले. आज या सार्वजनिक वाचनालयात 66 हजार पुस्तके, सातशेहून अधिक आजीव सदस्य व आठशे नियमित सदस्य आहेत. वाचनालयात मराठी, इंग्रजी, हिंदी संस्कृत, गुजराथी आणि दाक्षिणात्य भाषेतील पुस्तके मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे वाचकांना दररोज मोफत उपलब्ध होत असतात. दररोज जवळपास 800 ते 900 सभासद वाचनालयाला भेट देतात. अलिबागचे सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्धीला आलेल्या या वाचनालयांतून ज्ञानार्जन घेतलेल्या अनेकजणांनी विविध क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून आपली कारकिर्द गाजविलेली आहे. शंभर वर्षांच्या आपल्या यशस्वी वाटचालीत कोकण विभागांतील उत्कृष्ट ग्रंथालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, शासनाच्या ग्रंथालय पडताळणीत उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून दखल, कोकण विभागातून वाचनालयाचे उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून डॉ.शि.रा. रंगनाथन ग्रंथपाल सेवक पुरस्कार, आदी पुरस्कारांनी वाचनालयाचा गौरव झाला आहे. हे अलिबागकरांसाठी अभिमानास्पद आहे. ग्रंथालयाची ही देखणी वास्तू व तेथील नारळ, फोफळींचे आवार पाहता तेथे एखादा ग्रंथप्रेमी रमणारच. परंतु आता जग झपाट्याने बदलत चालले आहे. ग्रंथालयांचा वाचक दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ई बुक्सकडे लोकांचा प्रामुख्याने तरुणांचा कल वाढत चालला आहे. हे कितीही खरे असेल तरीही अपल्याला हे शतकी गाठलेले ज्ञानभंडार जपायचे आहे, वाढवायचे आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "ज्ञानभंडाराची शतसंवत्सरी"
टिप्पणी पोस्ट करा