-->
दिल्लीतील आरोग्य आणीबाणी

दिल्लीतील आरोग्य आणीबाणी

शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
दिल्लीतील आरोग्य आणीबाणी
राजकीय घडामोडींमुळे कायम चर्चेत असलेल्या राजधानी दिल्लीवर सध्या प्रदूषणाचे सावट आले आहे. देशाची राजधानीच नव्हे तर मोठ्या लोकसंख्येचे एक शहर म्हणून  आंतरराष्ट्रीय नकाशावर मानाचे स्थान असलेल्या या महानगरात सध्या साधा फेरफटकाही मारू नका, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याच्या कमाल मर्यादाही ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच या महानगरात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील शाळा या आठवडाअखेरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि प्रदूषणाची चादर या महानगरावर पसरल्यामुळे गेल्या दोन दिवसांत दिल्लीकरांना सूर्यदर्शनही होऊ शकलेले नाही. दिल्लीत अघोषित आरोग्य आणीबामी लागली आहे. आपल्यासारख्या विकसीनशील देशात अशा प्रकारे राजधानीतच अशा प्रकारे स्थीती निर्माण व्हावी हे शोभनीय नाही. कारण येथे जागतिक पातळीवरील विविध देशांचे राजदूत, प्रतिनिधी कार्यालये आहेत. त्यांच्यापर्यंत आपली यामुळे बदनामी होणार तर आहेच शिवाय विदेशातील येणारे पाहुणे आपल्या देशाविषयी वाईट प्रतिमा घेऊन जाणार आहेत. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या देशाची मान यामुळे खाली जाणे, स्वाभाविक असले तरी ही परिस्थिती दिल्लीकरांनी स्वत:च ओढवून घेतली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या दिल्ली आणि परिसरात जोरदार वारे वाहत आहेत आणि त्यामुळे शेजारच्या राज्यांतून प्रदूषणाचे लोट दिल्लीच्या दिशेने येत आहेत. दिल्लीवर सध्या राज्य आहे ते धूळ, धुके आणि विषारी वायू यांचे. दिल्ली परिसरातील अनेक गावांत सध्या शेतीची कापणी संपली आहे आणि त्यामुळे शेतात आगी लावून देण्याचा त्या परिसरातील प्रघात हा दिल्लीच्या दिशेने येणार्‍या प्रदूषित हवेस कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर दिल्लीकर तसेच दिल्लीचे राज्यकर्ते यांचाही या प्रदूषणात तितकाच वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. या प्रतिष्ठेच्या शहरात रोज शेकडो टनांनी तयार होणार्‍या कचर्‍यावर काही प्रक्रिया करण्याऐवजी तो सर्रास जाळला जातो. त्यात भर पडली ती श्री श्री रविशंकर यांनी यमुनेच्या थेट पात्रात आयोजित केलेल्या महाउत्सवाची. तेव्हा त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होईल, हे लक्षात घेऊन त्याला न्यायालयाने व राष्ट्रीय हरित लवादाने मनाई केली होती. मात्र, ती धाब्यावर बसवून, तो उत्सव पार पडलाच. त्यानंतर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी न्यायालयाने या परिसरात फटाके विक्रीस बंदी घातली होती. तरीही फटाक्यांच्या धुरामुळे व्हायचे ते झालेच. त्यामुळेच आता दिल्लीकरांना श्‍वसनापासून छाती भरून येण्यापर्यंत अनेक विकारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच दिल्लीवर ही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. आता यातून बाहेर पडायचे कसे ते दिल्लीकरांनीच ठरवायचे आहे. एक दशकापूर्वी दिल्लीत वाहानांच्या प्रदूषणामुळे विविध रोग यायचे. आता सार्वजनिक वाहने वायूवर चालविली जातात. तसेच मोठ्या प्रमाणावर मेट्रोचेही जाळे विणले गेले आहे. त्यामुळे वाहानांचे प्रदूषण कमी झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षात खासगी वाहाने वाढली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. त्यासाठी सरकारने सम-विषम वाहानांची योजना आखली होती. मात्र गेल्या वर्षी त्याचा काही प्रमाणात फायदाही झाला. मात्र याला जनतेचा विरोध आहे. आता मात्र याची अंमलबजावणी पुन्हा विरोध डावलून करावी लागणार आहे. या प्रदूषणाच्या धुक्यामुळे जनतेला अनेक श्‍वसनाचे रोग तसेच छातीचा कॅन्सर होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. एखाद्याने सिगारेट पिण्यापेक्षा या प्रदूषणाचा धोका जास्त आहे. त्याचबरोबर यामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले आहे. रेल्वेची वाहतूक देखील सुरळीत करणे कठीण झाले आहे. काही विमान कंपन्यांची भाडी एक लाख रुपयांवर गेली आहेत. अर्थात हे संकट काही निर्सगाचे नाही, तर मनुष्यनिर्मीत आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम देखील मानवालाच करावयाचे आहे. आपण आरोग्यविना आयुष्य जगावयाचे की अशा प्रकारच्या विषारी प्रदूषणामुळे आपले आयुष्य संपवायचे याचा विचार लोकांनी केला पाहिजे. गेल्या वर्षी देखील हे संकट उद्भवले होते. मात्र त्यापसून कोणताही धडा राज्यकर्ते व जनतेने घेतलेले नाही ही सर्वात दुर्दैवी बाब आहे.पंजाब व हरयाणा येथून प्रामुख्याने शेती झाल्यावर लोक जाळ करतात व त्याचा प्रसार हा वार्‍यामुळे पार दिल्लीपर्यंत होतो. दोन वर्षापूर्वी दिल्लीत काही दिवस धुक्याची चादर थंडीमुळे पसरली होती. उत्तर भारतामध्ये आलेल्या कडक थंडीच्या लाटेने सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. जम्मू-काश्मीरलगत असलेला लडाख परिसर हे अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ. तेथील लेह शहरात रविवारी उणे 19 अंश सेल्सियस इतके तापमान होते. थंडीच्या मोसमातले जम्मू-काश्मीर व लगतच्या परिसरात नोंदवले गेलेले सर्वात कमी तापमान होते. कारगिल, पहलगाम, गुलमर्ग या काश्मीरमधील काही ठिकाणांमध्ये उणे 10.8 अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली उतरलेले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, पूर्वांचल राज्यांचा काही भाग येथे बर्फाचे साम्राज्य पसरले होतेे. कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याचे आच्छादन दुपारचे बारा वाजले तरी हटायला तयार होत नसल्याने उत्तर भारतातल्या राज्यांतील रेल्वे व विमानसेवा विस्कळीत झाली होती. अमृतसर, पतियाळा, लुधियानासारख्या काही ठिकाणी धुके सरले अशी स्थिती निर्माण होऊन थोडे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. अंटार्क्टिका येथे असलेले बर्फ वितळण्याचे प्रमाण येत्या काही वर्षांत वाढीला लागेल व त्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती ओढवू शकतात, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने देत आहेत. गेल्या काही वर्षात निर्सगाचा जो असमतोल ढळत चालला आहे ती बाब गंभीर्याने घेण्याची आता वेळ आली आहे. थंडीच्या लाटेचे जागतिक परिणाम आपल्याला अनुभवयाला मिळत आहेत. मात्र त्याचवेळी याकडे कुणी गांभीर्याने पाहत नाही ही चिंतेची बाब आहे.
----------------------------------

0 Response to "दिल्लीतील आरोग्य आणीबाणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel