-->
रामदेव बाबांचे मतपरिवर्तन

रामदेव बाबांचे मतपरिवर्तन

गुरुवार दि. 22 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
रामदेव बाबांचे मतपरिवर्तन
सत्ता आली की अनेकांचे विचार बदलतात. त्यात एखादा योगी माणूस तरी कसा अपवाद ठरेल? रामदेव बाबांच्या हाती थेट सत्ता आली नसली तरीही ते सत्तेच्या वर्तुळात आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांएवढी ताकद आज त्यांच्याकडे आहे. त्याच जोरावर त्यांनी आपल्या पतंजली या कंपनीची उलाढाल तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या घरात नेली. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नाकात त्यांनी दम आणला आहे. आज रामदेव बाबांची ताकद एवढी आहे की, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे राजकीय वजन वाढत असताना त्यांचे वजन त्यांनी चक्क 20 किलोने कमी करुन दाखविले आहे. तर अशा या रामदेव बाबांचे मतपरिवर्तन झाल्याचे सध्याच्या त्यांच्या वक्तत्यावरुन दिसते. रामदेव बाबा यांनी पाकिस्तानातील जनतेला योग शिकवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यापुढे जाऊन बाबा म्हणतात की, पाकिस्तानातील लोक वाईट नाहीत. मात्र हाफिज सईद, अजहर मसूदसारखे दहशतवादी नक्कीच वाईट आहेत. पाकिस्तानमधील लोक चांगले असल्यानेच तिथे जाऊन लोकांना योग शिकवायचा आहेे. रामदेव बाबा यांना आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला होता. याबद्दल बोलताना, दोन्ही देशांमधील संबंधांना क्रिकेटसोबत जोडून पाहिले जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतच विजयी होईल, असा विश्‍वास रामदेव बाबा यांनी व्यक्त केला होता. मात्र ही त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली. पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय खेळांचे मनोधैर्य दुपटीने वाढते. त्यामुळेच या सामन्यात भारत पाकिस्तानला पराभूत करेल, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यांचे सामन्याबाबतचे भविष्य भले खोटे ठरोत, त्यांचे पाकिस्तानबाबत मतपरिवर्तन झाले आहे, एवढे मात्र नक्की.
--------------------------------------------------------------

0 Response to "रामदेव बाबांचे मतपरिवर्तन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel