संपादकीय पान--अग्रलेख-- ०२ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------------
पक्षनिष्ठा आणि पक्षनेतृत्व
---------------------------------
शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावरुन विधान केल्यावर जे वादळ उठले होते ते न शमल्याने अखेर पक्षनेतृत्वाला लेखी माफीनामा देऊन या प्रकरणावर अखेर पडदा पडेल अशी अपेक्षा सरांनी केली आहे. जोशी सरांना पक्ष व पक्षाचे नेतृत्व आता तरी माफ करेल का, की सर आता पुढील काही काळ दुर्लक्षीतच राहातील असे सर्व प्रश्न उपस्थित होतात. कारण पक्षनिष्ठा ही काचेसारखी असते. एकदा का काच फुटली की ती पुन्हा सांधता येत नाही. पक्षनिष्ठेची तुलना ही काचेसारखी करता येईल. अर्थात प्रत्येक पक्षात पक्षनिष्ठेला महत्व आहे. पक्षनेतृत्व नेहमीच पक्षनिष्ठेला महत्व देत आले आहे. मग तो कोणताही पक्ष असो. प्रत्येक पक्षात पक्षनिष्ठेला एक महत्वाचे स्थान असणे स्वाभाविक आहे. अर्थात प्रत्येक पक्षात या निष्ठेची व्याख्या वेगवेगळी असेल. स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त काळ सत्तेत असलेल्या कॉँग्रेस पक्षातही पक्षनिष्ठेला महत्व दिले जाते. मात्र त्यांची पक्षनिष्ठा ही पक्षनेतृत्वाशी निगडीत आहे. गेली ५० हून अधिक वर्षे कॉँग्रेस पक्षाशी नेहरु व गांधी घराण्याशी जोडलेला आहे. तिथे जो या घराण्याशी निष्ठावान तो पक्षनिष्ठा पाळतो असे सूत्र तयार झाले आहे. त्यामुळे अनेकवेळा पक्षात हमरीतुमरी करुनही सोनिया गांधी झिंदाबादची घोषणा देऊन कॉँग्रेसजन आपली निष्ठा पक्षनेतृत्वाशी असल्याचे सिध्द करुन पक्षातील आपले स्थान बळकट करतात. कॉँग्रेस पक्ष हा एखाद्या सागराप्रमाणे आहे. एवढ्या वर्षे सत्तेत असूनही पक्षाकडे संघटना नाही. परंतु गांधी घराण्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इकडे काम चालते. जो या घराण्याच्या विरोधात गेला तो संपला असे इकडचे सूत्र आहे. जो या घराण्याशी निष्ठा (किंवा चमचेगिरी) करील त्याचे भवितव्य उज्वल असते. असा कॉँग्रेस पक्षाचा निष्ठेचा ढाचा आहे. भाजपा या पक्षात व्यक्तीपुजा करावी असे कोणतेही नामवंत घराणेच नाही. संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते हे भाजपाचे निष्ठेने काम करताना दिसतील परंतु त्यांची संख्या नगण्यच आहे. कॉंग्रेसप्रमाणे भाजपामध्येही कार्यकर्त्यांचे इनकमिंग व आऊटगोईंग सुरुच असते. त्यात निष्ठेचा भाग गौण असतो. प्रश्न फक्त सत्तेशी निगडीत असतो. भाजपाचा सर्वात मोठा समर्थक वर्ग हा व्यापारी व दलाल आहे. त्यामुळेच कॉँग्रेस व भाजपामध्ये काही फरक नाही. कम्युुनिष्ट पक्षात व्यक्तिपुजेला कधीच महत्व देण्यात आलेले नाही. कोणताही कम्युनिष्ट पक्ष, जो मार्क्स व लेनिन यांच्या विचारसारणीला बांधिलकी मानणारा पक्ष हा पक्षाच्या निष्ठेला व पक्षाच्या कामाला महत्व देतो. कम्युनिष्ट पक्षातील शिस्त ही कडवी असते. जो पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाईल त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. मग तो कितीही मोठा नेता वा पुढारी असो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थांपकापैकी एक असलेल्या कॉम्रेड एस.ए. डांगे यांनी इंदिरा गांधींच्या बाजूने घेतलेली भूमिका पक्षाला मान्य झाली नाही. त्यातून डांगे व कम्युनिस्ट पक्ष यांच्यात दुरावा निर्माण झाला. शेवटी कॉम्रेड डांगेना पक्षातून डच्यू देण्यात आला होता. अलीकडच्या काळात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते खासदार सोमनाथ चटर्जी यांनी सभापती असताना कॉँग्रेसच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यावर त्यांना पक्षातून हाकलण्यात आले होते. कम्युनिष्ट पक्षात व्यक्तीपुजेला महत्व दिले गेले नसले तरीही काही नेते उदाहरणार्थ ज्योती बसू यांनी हे स्थान कार्यातून मिळविले होते. त्यामुळे बसूदा गेल्यावर पुढील पाच वर्षातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आपली सत्ता गमवावी लागली. शिवसेनेसारख्या संघटनेत किंवा पक्षात एक खांबी तंबू आजवर होता व ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी अनेक सर्वसामान्य माणसे कार्यकर्ते म्हणून घडविली. कार्यकर्त्यांची जात-पात याची बंधने झुगारुन शिवसेना उभी राहीली. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात सत्ता आल्यावर मनोहरपंतांच्या रुपाने ब्राह्मण माणूस मुख्यमंत्रीपदी बसविला. आजवर कॉँग्रेसला आपली सत्ता टिकविण्यासाठी मराठा मुख्यमंत्रीच लागला. केवळ अंतुलेंचा काय तो अपवाद. शिवसेनेत आजवर निष्ठाही बाळासाहेबांच्याच चरणी अर्पण होती. त्यातूनच पक्षनिष्ठा व्यक्त होत होती. अर्थात बाळासाहेबांवरील प्रेमापोटी ही निष्ठा व्यक्त होत होती. बाळासाहेबांनी आपला वारस म्हणून उद्धव ठाकरे यांना नियुक्त केल्यावर जुन्या पिढीतल्या नेत्यांची त्यांची नाळ जुळणे कठीण होत चालले होते. त्यातून नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. हा देखील शिवसेनेला मोठा फटका होता. त्यापूर्वी अनेकांनी म्हणजे छगन भुळबळांनी शिवसेना सोडली आणि कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या सर्वांनी शिवसेना काही ना काही कारणांनी सोडली असली तरीही त्यांची निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी कायमच होती. कारण बाळासाहेबांनीच त्यांना घडविले होते. या सर्वांनी केवळ सत्तेच्या लोभाने शिवसेना सोडली असे म्हणता येणार नाही. तर त्याचे जे मतभेद झाले किंवा शिवसेनेतील नवी पिढी या जुन्या नेत्यांना आपल्यात सामावू घेऊ न शकल्याने त्यांनी शिवसेना सोडली. आता देखील मनोहरपंतांनी मोठ्या धौर्याने उध्दव ठाकरेंवर टीका केली. परंतु अशा प्रकारची टीका ही शिवसेनेसारख्या संघटनेत पचविली जात नाही, हे सत्य पंतांसारख्या धुर्त नेत्याला समजले नाही. त्यातून त्यांचा जो अपमान शिवतीर्थावर झाला तो व्हावयास नको होता. शेवटी मनोहरपंतांनी लेखी माफीनामा पाठवून पक्षनेतृत्वापुढे लोटांगण घातले. किंबहूना त्यांना तसे करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पक्षनिष्ठा आणि पक्षनेतृत्व यांच्यातील नाते काय असते हे या निमित्ताने सर्वांनाच उमजले आहे.
----------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा