-->
कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज

कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज

संपादकीय पान गुरुवार दि. २६ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज
देशातील नव्हे तर जगातील तंत्रज्ञानाचा एक अविष्कार म्हणून ओळखली गेलेली कोकण रेल्वे यंदाच्या पावसाळ्यासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाली आहे. यंदा जास्त प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. गेले काही वर्षे प्रत्येक पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे किंवा रेल्वे ट्रॅक खचल्याच्या घटनांमुळे कोकण रेल्वे बंद पडत आली आहे. कोकण रेल्वेचा प्रवासच असा दर्‍याखोर्‍यातून आहे की अशी संकटे येणार हे रेल्वे प्रशासनाने गृहीतच धरले आहे. मात्र त्यावर उपाययोजना हाती घेऊन मात करण्याची वेळ आहे. यंदा रेल्वेने आपण या सर्व परिस्थितीतला सामोरे जाण्यास सज्ज आहोत असे सांगितले आहे. मात्र त्यांनी खरी कसोटी ही प्रत्यक्ष पाऊस पडल्यावरच होईल. रेल्वे मार्गावरील ३६ ठिकाणे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. त्यावर विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी खबरदारीसाठी ९५० लोक गस्ती पथकात नेमले आहेत. या मार्गावर ३६ संवेदनशील भाग आहेत. १० जून ते ३१ ऑक्टोबर या काळात पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे धावणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेगदेखील कमी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता आपल्या सेवेची २५ वर्षे पूर्ण केल्यावर कोकण रेल्वेने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. यात या मार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके मंजूर करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील नऊ स्थानके आहेत. त्यात रायगड तीन, रत्नागिरी चार व सिंधुदुर्ग दोन अशी संख्या आहे. रायगड इंदापूर, गोरेगाव, सापेबामणे, कळंबोली, पोमेंडी, खारेपाटण, आर्चिणे व कसाल यांचा समावेश आहे. तसेच दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम जोरात सुरू आहे.  वैभववाडी-कोल्हापूर हा ११० किमी रेल्वे मार्ग मध्य व भारतीय रेल्वे महाराष्ट्र रेल्वे विकास बोर्डाच्या माध्यमातून करणार असून, त्याला तीन हजार २०० कोटी खर्च अपेक्षित आहे. सावंतवाडी टर्मिनसचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. रेल्वेने १८२ व ९००४४७०७०० हे नंबर आपत्कालीन वेळी हेल्पलाईन म्हणून ठेवले आहेत. वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हे काम जलदगतीने होईल. मध्य रेल्वे व भारतीय रेल्वे मिळून प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार आहे. या ११० किमी मार्गाला तीन हजार २०० कोटी खर्च अपेक्षित आहेे. कोकण रेल्वे बंदरे जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार आहे. बंदरे विकास जलद गतीने झाल्यास रेल्वेने जोडण्याची रेल्वेने तयारी सुरु केली आहेे. रोहा ते वीर हा ४६ किमी.चे दुपदरीकरण हाती घेतले जाणार आहे. रत्नागिरीत ३५० वॅटचा सोलर प्लँट बसविण्यात आला आहे. कोकण रेल्वे आयटी प्रकल्प विकसित केला जात असून रेल्वेचे कामकाज ई ऑफिस म्हणून करण्यात येत असल्याने ६० टक्के कागद बचत केली जात आहे. ठेकेदारीदेखील ई टेंडरिंगच आहे. कुडाळ, कणकवली व सावंतवाडी ही महत्त्वाची स्थानके मानून विकास करण्यात येत आहे. एकीकडे कोकण रेल्वे अशा प्रकारे विस्तार प्रकल्प हाती घेत असताना येत्या पावसाळ्यात मोठी कसोटी लागणार आहे हे देखील तितकेच खरे.

0 Response to "कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel