-->
डॉक्टरांचा बायपास

डॉक्टरांचा बायपास

संपादकीय पान गुरुवार दि. २६ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डॉक्टरांचा बायपास
सी.ई.टी. की निट या गोंधळात विद्यार्थ्यांचे करिअर पूर्णपणे धोक्यात आले आहे. न्यायालयाने सर्वच म्हणजे सरकारी व खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील वैद्याकीय शिक्षण विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना एकच देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. अर्थातच यामुळे खासगी व अभिमत विद्यापीठांची मोठी अडचण होणार होती. त्यावर उपाय म्हणून सरकारने चालू वर्षी दोन्ही परीक्षा घेण्यासंबंधीचा वटहुकून काढला. खरे तर अशा प्रकारचा वटहुकूम काढण्याची गरज नव्हती. परंतु खासगी वैद्यकीय संस्थांच्या लॉबीपुढे सरकारला झुकावे लागले. या सर्व गोंधळात विद्यार्थी कंटाळला आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षात कासगी शिक्षण प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण एवढे महाग झाले आहे की, अनेकांना ते परवडते असे नाही. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना रशिया व चीन या देशात जाऊन शिक्षण घेऊन येणे परवडते. तेथे शिक्षण घेऊन येणार्‍या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय प्रॅक्टीस करावयाची असेल तर एक परीक्षा द्यावी लागते. ही पीक्षा देऊन अनेकजण भारतात डॉक्टरी व्यवसाय करतात. भारतातील हे प्रवेशाचे गोंधळ त्याचबरोबर महागडे शिक्षण घेण्यापेक्षा अनेक वैद्यकीय विद्यार्थी रशिया व चीनमध्ये शिक्षण घेण्याचा बायपास स्वीकारतात. या देशांमध्ये शिक्षणही चांगले मिळते व तुलनेने फी कमी आकारली जाते. मात्र भारतात जी प्रॅक्टीस करण्यासाठी परीक्षा घेतली जाते ती फारच अवघड असल्यामुळे अनेक मुले येथे येण्यास राजी होत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे परदेशातून शिकून येणार्‍या डोक्टरांची संख्या कमी आहे. एका अर्थाने विचार करता आपण अनेक डॉक्टर आपण गमावत आहोत. रशिया व चीन या देशात शिक्षण घेणारे हे डॉक्टर तेथेच किंवा युरोपातच राहातात, असे बहुतांश लोकांच्या बाबतीत घडते. खरे तर विदेशात शिक्षण घेतल्यावर येथे नाममात्र परीक्षा घेण्याची पध्दत सुरु करण्याची आवश्यकता आहे. जगात उच्च शिक्षणामध्ये भारताचा सध्या २४ वा क्रमांक लागतो. यात पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा क्रमांक लागतो. तर दुसर्‍या क्रमांवर इंग्लंड व तिसर्‍या क्रमांकावर जर्मनी आहे. विविध प्रकारचे निकष लावून जागतिक शैक्षणिक पध्दतीनंतर हे क्रमांक लावण्यात आले आहेत. भारतातील मुंबई हे सर्वात जुने विद्यापीठ जगातील पहिल्या २०० क्रमांकातही नाही, ही मोठी दुदैवाची बाब आहे. याचा व एकूणच शैक्षणिक पध्दतीचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "डॉक्टरांचा बायपास"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel