-->
संपादकीय पान--चिंतन-- ०२ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------------
चूक मान्य करण्याचा रतन टाटांचा प्रमाणिकपणा
--------------------------------
टाटा उद्योसमूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी नॅनो ही सर्वात स्वस्त मोटार म्हणून तिचे ब्रँडिंग करण्यात चूक झाली. असे न करता ही मोटार जर अन्य वाहानांप्रमाणे बाजारात यावयास हवी होती असे मान्य करुन आपली झालेली चूक प्रामाणिकपणे मान्य केली आहे. ऐवढ्या मोठ्या उद्योगसूहाच्या प्रमुखाने आपली चूक मान्य करणे ही मोठी बाब झाली. खरे तर ही चूक आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर किंवा मार्केटिंग विभागावर टाकून टाटा मोकळे झाले असते तरी त्यांनी कुणी बोलले नसते. परंतु आपल्या निर्णयाची ही एक सामुदायीक जबाबदारी आहे असे मान्य करुन टाटा यांनी केवळ उद्योगपतींनाच नव्हे तर समाजकारण व राजकारणातील व्यक्तींपुढे एक आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक माणसाच्या हातून ही चूक होऊ शकते. चूक झालीच नाही अशी व्यक्ती आपल्याला आढळणार नाही. परंतु झालेली चूक मान्य करणे व त्या चुका सुधारुन त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. रतन टाटा यांनी हा मोठेपणा दाखवून दिला आहे.
नॅनोचा जन्म फार गमतीशीररित्या झाला आहे. एकदा स्कूटर वरुन बसून चार जणांचे कुटुंब जात असताना रतन टाटा यांनी पाहिले आणि त्यांना यावरुन स्वस्तात परवडेल म्हणजेच एक लाख रुपयांची मोटार बनविण्याची कल्पना सुचली. अर्थात अशा प्रकारचे वाहन तयार करणे हे एक मोठे आव्हान होते. ही मोटार पूर्णत: भारतीय बनावटीची असल्याने वाहन उद्योगातील नामवंत कंपन्यांनाही याची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस नॅनो २००९ साली बाजारात अवतरली. सुरुवातील टाटांनी नॅनोचा प्रकल्प पश्‍चिम बंगालमध्ये आखला होता. परंतु ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पाच्या जमीन ताब्यात घेण्याच्या प्रकरमावरुन आंदोलन छेडले आणि शेवटी कंटाळून टाटांनी हा प्रकल्पच रद्द केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आमंत्रण दिले. विक्रमी वेळात गुजरातमधील साणंद येथे हा प्रकल्प उभा राहिला. मात्र टाटांच्या या महत्वाकांक्षी ठरलेल्या नॅनोला अपेक्षेएवढे यश काही लाभले नाही. सुरुवातीला मोठ्या उत्साहाने या बुकिंग झाली खरी परंतु नॅनोचा खप दिवसेंदिवस घसरु लागला. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वस्त कार म्हणून याला जो शिक्का बसला होता त्यामुळे मोटार खरेदीकरणार्‍या ग्राहकांना ही मोटार घेणे काहीसे कमीपणाचे वाटू लागले. त्याचबरोबर जो ग्राहक टाटांनी अपेक्षित ठेवला होता, तो मोटार सायकल असणारा ग्राहक. जवळपास तेवढ्याच किंमतीत किंवा त्याहून थोडेफार जास्त पैसे टाकून नॅनो हे चार चाकी वाहन खरेदी करेल अशी टाटांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे टाटांनी गृहीत धरलेल्या ग्राहकाने पाठ फिरविली व नेहमीचा ग्राहक या वाहानाकडे नाक मुरडू लागला. अशा स्थितीत नॅनोचा खप घसरु लागला. अर्थात जागतिक पातळीवर नॅनोला चांगली मागणी आहे. अगदी युरोपीयन बाजारपेठेतही नॅनोला चांगली विचारणा झाल्याने आता विदेशी ग्राहकपेठ काबीज करुन नंतर पुन्हा भारतीय ग्राहकांकडे वळण्याचे टाटांचे धोरण निश्‍चितच धोरणात्मक आहे. या मोटारीला आता इंडोनेशियात लॉँच करुन तेथे नॅनो लोकप्रिय करण्याचा टाटा मोटार्सचा विचार आहे. नाही तरी आपल्याकडून विदेशातून एखादी गोष्ट आली की आपण तिला झपाट्याने स्वीकारतो. टाटांनी यातून आपला मार्केटिंगचा अध्याय मांडला आहे. यात त्यांनी जरुर यश लाभेल.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel