-->
भाजपाला घरचा आहेर!

भाजपाला घरचा आहेर!

मंगळवार दि. 27 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
भाजपाला घरचा आहेर!
वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी मोदी सरकारने शाही सोहळ्याचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळे भाजपाला घरचा आहेर मिळाला आहे, असेच म्हणावे लागेल. जीएसटीमुळे छोट्या व्यापार्‍यांचे नुकसान होणार असून यामुळे चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल अशी भीती स्वदेशी जागरण मंचाने व्यक्त केली आहे. स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजक अश्‍विनी महाजन यांनी जीएसटीसंदर्भात भूमिका मांडली. 1.5 कोटी रुपयांपर्यंत उत्पादन असलेल्या लघु उद्योजकांना अबकारी करातून सूट देण्यात आली आहे. महाजन यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत जीएसटीतील नियमावलींवर बोट ठेवले. जीएसटीमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावीच लागेल असे म्हटल्याचे महाजन यांनी सांगितले. या नियमामुळे लघूउद्योगांवर कराचा बोजा वाढणार असून लघूउद्योगांवर याचा दीर्घकालीन परिणाम होईल असा दावा त्यांनी केला. लघूउद्योगांवर नकारात्मक परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचा रोजगार हिरावला जाऊ शकतो. देशांअंतर्गत उत्पादन कमी झाल्याने याचा चीनला फायदा होईल आणि चीनमधून आयातीचे प्रमाण वाढेल असे महाजन यांचे म्हणणे आहे. स्वदेशी जागरण मंचाने जीएसटीला विरोध दर्शवला असला तरी केंद्र सरकारने जीएसटीमुळे आर्थिक विकास दरात दोन टक्क्यांनी वाढ होईल असा दावा केला आहे. मोदी सरकारसाठी जीएसटी हा प्रतिष्ठेचा विषय आहे. कॉग्रेसच्या काळात त्यांनी याला विरोध केला अशला तरीही त्यांनी जीएसटी आणून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. बहुप्रतीक्षित वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी एक जुलैपासून लागू करण्यात यईल. मात्र जीएसटी लागू केल्यानंतर जवळपास लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जीएसटीमुळे टॅक्स, अकाऊंटिंग आणि डाटा एनलिसिस क्षेत्रांत नोकर्‍या निर्माण होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, जीएसटीमुळे रोजगार क्षेत्रात क्रांती घडणार आहे. तसेच या क्षेत्रात वर्षागणिक 10 ते 13 टक्के नोकर्‍यांमध्ये वाढ होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतल्या व्यावसायिक मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. जीएसटी वस्तूंच्या खरेदी आणि वितरणात तेजी येईल असे दिसते. त्यामुळे साहजिकच पारदर्शकता वाढणार आहे. रोख प्रवाहाचा अंदाज घेणंही सोपं जाणार असून, नफ्यातही वाढ होणार आहे. या कारणास्तव 10 ते 13 टक्क्यांनी रोजगाराची निर्मिती होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सुमारे एक लाख नोकर्‍या तात्काळ उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. या नोकर्‍या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होतील. जीएसटी लागू झाल्यानंतर 50 ते 60 हजार नोकर्‍या भविष्यात उपलब्ध होतील. मध्यम आणि लघु कंपन्यांही नोकरी सल्लागार कंपन्यांकडून लोकांना कामावर ठेवण्यासाठी आग्रही असतील. नवी कर प्रणाली व्यावसायिकतेवर सकारात्मक परिणाम करेल, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि कंपन्याही आकर्षित होणार आहे. ही वस्तुस्थीती असली तरीही स्वदेशी जागरण मंचटाला ते मान्य् नाही असे दिसते.

0 Response to "भाजपाला घरचा आहेर!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel