-->
महागडी मुंबई

महागडी मुंबई

मंगळवार दि. 27 जून 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
महागडी मुंबई
देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे मायानगरी शहर देशातील सर्वांत महागडें तर जगातील 57 वे महाग शहर ठरले आहे. मुंबईची महागाई 4.81 टक्क्यांवरून 5.57 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जगातील महागड्टया शहरांच्या यादीत अंगोलाची राजधानी ल्युआंडा हे जगातील सर्वांत महागडे शहर ठरले आहे. दुसर्‍या स्थानावर हाँगकाँगचा क्रमांक लागतो. टोकियो, झ्युरिक आणि सिंगापूर ही शहरे अनुक्रमे तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत दिल्ली 99 व्या क्रमांकावर आहे. यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई 57 व्या क्रमांकावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे . या सर्वेक्षणात नवी दिल्ली 99 व्या स्थानावर आहे. तर चेन्नई (135), बंगळूरु(166), कोलकाता (184) या शहरांचाही समावेश आहे . मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (61), डल्लास आणि पॅरिस (62), कॅनबेरा (71), सीटल (76), आणि व्हिएना (78) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे . चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थांना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठया प्रामाणात वाढ झाली आहे . वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे . टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठया प्रमाणात वाढले आहे. ट्युनिस (209), बिशकेक (208), कोपजे आणि विन्डोक (206), ब्लाटायर (205), बिलीसी (204), मॉन्टेरेरी(203), सॅराजेवो (202), कराची (201) आणि मिन्स्क (200) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्व्हेक्षणात नमूद केले आहे . लुएन्डा या शहरानंतर हाँगकाँग (2), टोकियो (3), झ्युरिच (4), सिंगापूर (5) ही जगभरातील महागडी शहरे आहेत . याशिवाय सीऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे. 2016 साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या तर भाड्याने घर घेऊन तात्पुरती स्वताची सोय करणार्‍यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली. देशातले महागडे शहर हे आता कामगार, कष्टकर्‍यांचे राहिलेले नाही तर मुबई ही आता केवळ धनिकांचीच राहिली आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "महागडी मुंबई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel