-->
पिकलबॉलची भरारी

पिकलबॉलची भरारी

संपादकीय पान सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
पिकलबॉलची भरारी
पिकलबॉल हा खेळ बॅडमिंटन, टेनिस व टेबल टेनिस या खेळांचे मिश्रण करुन तयार करण्यात आलेला आहे. अमेरिकेत 1965 साली हा सर्वात प्रथम खेळला गेला. त्यानंतर हा खेळ अमेरिकेच्या बरोबरीने कॅनडा, भारत, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, फिनलंड या देशात खेळला गेला. भारतात या खेळाची पाळेमुळे ऑल इंडिया पिकलबॉल संघटनेचे संयुक्त सचिव सुनिल वालावलकर यांनी रुजविली. त्यांच्याच परिश्रमाने हा खेळ आता आपल्याकडे खेळला जाऊ लागला व आता सर्वात प्रथम भारताचा पिकलबॉल संघ प्रथमच एका आन्तरराष्ट्रीय स्पर्धेला रवाना झाला. गेल्या दहा वर्षात हा खेळ भारतात चांंगलाच रुजला व आपला संघ आता आन्तराराष्ट्रीय पातळीवर खळण्यासाठी तयार झाला आहे. पिकलबॉलने भारतात गेल्या दहा वर्षात जी भरारी घेतली ती उल्लेखनीयच म्हणावी लागेल. बँकॉक येथील सँटीसुक इंग्लिश स्कूलच्या वतीने बँकॉक खुल्या पिकलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेसाठी भारतातील 23 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या या पहिल्या वहिल्या संघामध्ये 5 मुंबईकरांचा समावेश असून राजस्थानचे सर्वाधिक 10 खेळाडू भारतीय संघात आहेत. बिहारच्या रंजन कुमार गुप्ताकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून तो पिकलबॉल राष्ट्रीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे. तसेच, मुंबईकर राहुलकुमार वाणी संघव्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडेल. राहुलसह सुनिल वालावलकर, मनिषा वालावलकर, मनिष राव आणि सचिन मांद्रेकर हे मुंबईकर खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. मुळचे अमेरिकन नागरिक असलेले परंतु व्यवसायानिमित्त थायलंडला स्थायिक झालेले सँटिसुक स्कूलचे विश्‍वस्त स्टिव्हन केबल यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. आपल्याकडे क्रिकेटचे एवढे वेड व ग्लॅमर लोकांमध्ये आहे की त्याच अनेक मैदानी खेळ झाकोळले जातात. मग अगदी हॉकी, असो, टेबलटेनिस असो वा टेनिस अन्य खेळांकडे कमालीचे दुर्लक्ष होते. मात्र अशा स्थितीतही पिकलबॉलने केवळ दहा वर्षात भारतात प्रवेश करुन एक चांगली लोकप्रियता मिळविली आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "पिकलबॉलची भरारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel