-->
हवामान पूरक पीक हवे

हवामान पूरक पीक हवे

गुरुवार दि. 12 डिसेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
हवामान पूरक पीक हवे
बदलत्या हवामानाचे परिणाम म्हणून केवळ पावसाळा लांबला असे नव्हे तर महिनाभरापेक्षा अधिक काळ उशिराने थंडीचा हंगाम सुरू होत आहे. अनेऴी पडलेल्या पावसाने शेतकरयंचे मोठे नुकसान झाले. परंतु आता अवेळी पडणारा पाऊस व हवामानातील बदल हे सर्व लक्षात घेऊन शेतकर्‍याने त्यावर कसे मात करुन शेती करावयाची ते पाहिले पाहिजे. त्यासाठी अत्याधुनिक शेतीचे तंत्र अवलंबावे लागेल. यासाठी कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी बनविलेले नाविन्यपूर्ण सगुणा राईस टेक्निक (एस.आर.टी.) मुळे परिवर्तन घडत असून शेतकर्‍यांना कृषी उत्पन्न वाढवण्यास मदत करत आहे. सगुणा राईस टेक्निक ही एक झिरो-टिल कॉन्झर्व्हेशन अग्रीकल्चर (बिगर नांगरलेली शेती) पद्धती  आहे, आणि महाराष्ट्रातील 16 तालुक्यातील 3000 हून अधिक शेतकर्‍यांनी तिचा स्वीकार केला आहे. भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे  आणि म्हणूनच हवामान बदलाचा त्यावर प्रभाव पडतो. तांदूळ लागवडीसाठी वापरल्या जाणार्‍या पारंपारिक पद्धतीना अत्याधिक श्रम आणि जास्त प्रमाणात पाणी लागते, सगुणा राईस टेक्निक(एसआरटी) ही लागवडीची एक सोपी पद्धत आहे ज्यात कायमस्वरूपी उंचावत बेडचा (मातीचा उंचावटा) वापर लागवडीसाठी केला जातो. या बेड्स चा वापर करून  शेतकर्‍यांना थेट बियाणे पेरता येतात व मजुरी खर्च आणि पिकांच्या लागवडीसाठी लागणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी होते. एसआरटीमुळे केवळ शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नच वाढत नाही तर जमिनीचे आरोग्यही सुधारते आणि त्याद्वारे प्रक्रियेत अधिक कार्बन साठवले जाते. एसआरटी सारख्या संवर्धन कृषी पद्धतींद्वारे मातीमधील सेंद्रिय कार्बन वाढविण्यासाठी मदत होते व त्यामुळे  प्रत्येकाचा फायदा हातो.
कोकणात भात, मासे आणि फळे ही प्रमुख कृषी उत्पादने असून त्यावर बहुतांश लोकांचा चरितार्थ चालतो. कोकणात सुमारे 4000 मिमी. पर्यंत पाऊस पडूनही त्या पाण्याची साठवणूक न झाल्याने ते सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. यामुळे वर्षभर पाण्याच्या आधारावर होणारी पिके फार कमी क्षेत्रावर आहेत. भातशेतीचा खर्च उत्पादित मालाच्या किंमतीपेक्षा अधिक असल्याचा निष्कर्ष निघाला असला तरी सगुणा राईस हे तंत्रज्ञान वरदान ठरले आहे. त्याचामुळे आता शेतकर्‍यांनी याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता आहे. भाताशिवाय नाचणी, वरी यासारख्या धान्यांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. भाताप्रमाणे याही धान्य उत्पादनात खर्चापेक्षा उत्पन्न कमी हे गणित कायम आहे. कोकणाला असलेल्या 720 किमीच्या समुद्र किनार्‍याचा आपण पुरेसा वापर करीत नाही. या किनारपट्टीवर पर्यटन विकसीत करण्याला भरपूर वाव आहे तसेच मच्छिमारी उद्योगाकडेही मोठ्या प्रामाणावर लक्ष देण्याची गरज आहे. कोकणात प्रामुख्याने बिगर यांत्रिकी नौका सुरुवातीला या व्यावसायात होत्या. काळाच्या ओघात आधुनिक यंत्रे मच्छिमार नौकांवर बसवली गेली. सरकारने अनुदान देखील त्यासाठी देऊ केले. शास्त्राीय प्रमाणापेक्षा यांत्रिक नौकांची संख्या वाढली तरी सरकारी अनुदानाचा प्रवाह चालूच होता. यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत आहे. अनिर्बंध मच्छिमारीमुळे अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यातून होणारा पर्यावरणाचा ़र्‍हास हे वेगळेच. अवेळी पडणारा पाऊस, अनिर्बंध मच्छिमारी, वादळे यामुळे मच्छिमार व्यवसायावर संकट आले आहे. यावर देखील तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे. भात, मासे याच्या व्यतिरिक्त आंबा, काजू, फणस, नारळ यासारखी पिके कोकणी माणसाला वरदान ठरली असली तरीही सुरुवातीच्या काळात त्यासाठी कष्ट करावे लागतात. फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगदेखील कोकणात चांगल्याप्रकारे वाढले परंतु त्याच्या वाढीला अजूनही भरपूर वाव आहे. त्यातून स्थानिक उद्योजकता वाढीसा लागून तरुणांच्या हाताला काम मिळू शकते. बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील सर्वच कृषी उत्पादनांना सहन करावा लागत आहे. हापूस आंब्यासारखे अत्यंत नाजूक पिकाला याचा पटकन फटका सहन करावा लागतो. ढगाळलेले आकाश असो किंवा वाढलेली आर्दता यामुळे आंबा पीक कधीही धोक्यात येते. आंबा हे पिक फार नाजूक आहे व बदलत्या हवामानाचा त्यावर सर्वाधिक परिणाम होतो. काजूवर त्याचा परिणाम होतो व काजू मोहरावर काळसरपणा येतो. यावर्षी वेगवेगळ्या वादळांमुळे पावसाळी हंगाम खूप लांबला. यामुळे एका बाजूला भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक गावांमध्ये केलेल्या खासगी सर्वेक्षणामुळे सरासरी भात पीक 50 टक्के पर्यंतच आल्याचे आढळले आहे. केवळ एवढेच नव्हे तर मच्छिमारीलाही याचा फटका सहन करावा लागला आहे. यंदा भर मच्छिमारीच्या मोसमात मस्य दुष्काळासारखी स्थिती अनुभवावी लागली आहे. याचा सर्वाधिक फटका बसतो तो लहान मच्छिमारांना. त्याचे कंबरडे यात पार मोडले आहे. त्यामुळे त्यांच्यांसाठी सरकारने स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आता थंडीचा हंगाम सुरु होण्यास प्रारंभ झाल्याने हवामान स्थिरावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इथून पुढे चांगली मच्छिमारी करण्याची संधी येईल, असे सध्यातरी वातावरण आहे. यावर्षी महिनाभरापेक्षा अधिक काळ उशिराने थंडीचा हंगाम सुरू होत आहे. त्यातून वर्षाचे बिघडलेले आर्थिक गणित जाग्यावर येण्यास मदत होईल असे चित्र आहे. बदलणारे हवामान हे शेतक़र्‍यांच्या रोजीरोटीवर उठणारे न ठरता त्या हवामानाला पूरक पीक पद्धती आणि पिकांच्या जाती पुढे आणणे आवश्यक आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "हवामान पूरक पीक हवे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel