-->
वाढता डिजिटल प्रचार

वाढता डिजिटल प्रचार

संपादकीय पान शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
वाढता डिजिटल प्रचार
एक काळ असा होता की, निवडणुका आल्या म्हणजे, रिक्षांवर कर्णे लावून प्रचार करणेे किंवा भित्तीपत्रके लावणे व त्याव्दारे उमेदवारांची माहिती सर्वत्र पोहोचविणे, असे महत्वाचे काम असे. गेल्या पाच वर्षात प्रचाराचे तंत्र झपाट्याने बदलत गेले आहे. भाजपाने पुढाकार घेऊन डिजिटल प्रचाराला आघाडीवर घेतले व नवीन प्रचारतंत्र अवलंबिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरचा विचार करता प्रत्यक्ष प्रचाराला केवळ पाच दिवस शिल्लक राहातात अशा वेळी अनेक उमेदवारांना प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करणे अवघड जाते त्यांच्यासाठी हा डिजिटल प्रचार एक प्रकारचा वरदान ठरणार आहे. हा प्रचार प्रामुख्याने व्हॉट्स अ‍ॅप क्लिप, व्हॉट्स अ‍ॅप संदेश, चित्रफिती आदींचा असून याचा मोठया प्रमाणात वापर होत असून या सेवा पुरवणार्‍यांच्या व्यवसायामध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल प्रचार साहित्याच्या मागणीमध्ये 30 टक्के वाढ झाली असून मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. कमी वेळात जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. त्यासाठी उमेदवार व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून प्रचार करत असून त्याचे संदेश अनेक मतदारांच्या मोबाईलवर फिरवले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे परिचय पत्रकापेक्षा कमी खर्चात डिजिटल साधनांच्या साहाय्याने प्रचार होतो. पंधरा हजारापासून ते साडेपाच लाखांपर्यंत चित्रफित तयार करण्यासाठी खर्च येतो. डिजिटल प्रचार साधने तयार करण्यासाठी छायाचित्रकार, रेकॉर्डिग स्टुडियो, कला दिग्दर्शक यांना मोठी मागणी आहे. सोळा हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यंत एल.ई.डी, आठ हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत टी.व्ही. असा दर घेतात. यातून अनेक तंत्रज्ञांना तात्पुरता रोजगार मिळाला आहे. डिजिटल प्रचार हे आगामी काळात वाढत जाणार आहे, भविष्यात पारंपारिक पध्दतीने प्रचार करण्याची पध्दत बहुदा संपुष्टात येईल.
------------------------------------------------------

0 Response to "वाढता डिजिटल प्रचार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel