-->
दहशतवादाचा धोका

दहशतवादाचा धोका

संपादकीय पान शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
दहशतवादाचा धोका
सध्याच्या निवडणुकीच्या धावपळीत दहशतवादी घटनांकडे आपण काहीसे दुर्लक्ष झाले आहे. परंतु देशाच्या सुरक्षितेचा विचार करता त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. खरे तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, नोटाबंदीमुळे अतिरेकी कारवाया कमी होती. कारण अतिरेक्यांकडे येणार्‍या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. मात्र तसे काही घडलेले नाही. आपल्या देशाला असलेला अतिरेक्यांचा वेढा दिवसेंदिवस घट्टच होत चालला आहे. या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. गेल्याच आठवड्यात पनवेलजवळ रेल्वेच्या रुळावर जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. सुदैवाने त्या वेळेत ओळखल्या गेल्यामुळे हजारो प्रवासी बचावले आहेत. कारण जर त्यावरुन रेल्वे वेगाने गेली असती तर कोणतीही भयानक घटना घडली असती. त्याचबरोबर त्यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वीच दिवा स्टेशनच्या जवळच अशाच प्रकारे रेल्वे रुळावर एक मोठा लोखंडी रुळ टाकण्यात आला होता. हे दोन्ही प्रकार दहशतवादी कृत्ये असल्याचा संशय आहे. आता मध्यप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगीरी करणार्‍या 11 संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 हजार सिमकार्ड, 50 मोबाइल फोन आणि 35 सिम बॉक्स जप्त करण्यात आले आहे. यांच्या मदतीने ते देतात आय.एस.आय.चे नेटवर्क चालवत होते. या आरोपींनी बनावट नाव, पत्त्याने देशातील अनेक बँकांमध्ये शेकडो खाते उघडल्याची धक्कादायक माहितीही एटीएसला मिळाली आहे. मध्य प्रदेश एटीएसने आय.एस.आय. नेटवर्कच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सांगितली जात आहे. एटीएस टीमने ग्वॉल्हेरमधून पाच, भोपाळमधून तीन, जबलपूरमधून दोन आणि सतनामधून एकाला अटक केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा येथून सतविंदर सिंह आणि दादू नामक दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशात त्यांचे नेटवर्क सक्रीय असल्याचे दोघांनी कबूल केले होते. या कामासाठी त्यांना पाककडून मोठी मदत मिळते. सतना येथील राहाणारा बलराम याच्या बँक खात्यावर ती पाकिस्तानी हँडलर्स ट्रान्सफर करतात, अशी माहिती मिळाली होती. एटीएसच्या माहितीनुसार, दिल्लीतील एका कोचिंग सेंटरचा टीचर गुलशन सेन हा या नेटवर्कचा मास्टरमाइंड आहे. त्याने मध्यप्रदेशसह दिल्ली, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेशात समांतर टेलीफोन एक्सचेंज स्थापन केले आहेत. यासाठी त्याने जवळपास एक हजार सिम बॉक्स भाड्याने दिले आहेत. गुलशन सेन सध्या लखनऊच्या तुरुंगात आहे. उत्तर प्रदेश एटीएसने त्याला जम्मू-काश्मीरमधील मिलिट्री इंटेलिजेंसची हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा खुलासा झाला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला गुलशन सेन दोनदा अफगाणिस्तानात जाऊन आला आहे. त्याने अफगाणिस्तानात पाच वर्षे अमेरिकन सैन्यासाठी काम केले होते. मागील काही महिन्यांपासून लष्कराच्या अधिकार्‍याचे नाव सांगून गुलशन गोपनिय माहिती जाणून घेत होता. वारंवार गोपनिय माहिती विचारली जात असल्याने लष्कराच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाला संशय आला होता. एके दिवशी जम्मूमध्ये कर्नल विक्रम तिवारी यांच्या नावाने गुलशनने फोन करून लष्कराच्या हालचालींबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गुलशन समांतर एक्सचेंजच्या मदतीने हेरगिरी करत असल्याची बाब समोर आली. 24 जानेवारीला युपी एटीएसच्या अधिकार्‍यांनी गुलशन सेनसह 11 जणांना अटक केली होती. त्यानंतर बर्‍याच बाबी उघड झाल्या होत्या. अतिरेक्यंच्या या कारवाया अतिशय धोकादायक असून त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

0 Response to "दहशतवादाचा धोका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel