-->
टेलिकॉम उद्योगातील संकट

टेलिकॉम उद्योगातील संकट

संपादकीय पान शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
टेलिकॉम उद्योगातील संकट
टेलिकॉम उद्योगात सध्या आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोकर्‍यांवर कुर्‍हाड पडणार आहे. देशातील आघाडीच्या दोन खासगी कंपन्या व्होडाफोन व आयडीया यांच्या कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे देशातील टेलिकॉम उद्योगात अनेक बदल होऊ घातले आहेत याचे देशात दूरगामी परिणाम होतील असे दिसते. या विलीनीकरणामुळे या कंपन्यांचे मुख्यालय आणि विभागिय कार्यालयात काम करणार्‍या अधिकार्‍यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. जवळपास 10 हजार ते 25 हजार नोकर कपात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली जात असून, त्यांची संख्या एक लाखांच्याही घरात जाऊ शकते, असे वृत्त एका अर्थविषयक दैनिकाने दिले आहे. देशातील टेलिकॉम उद्योगाची 92 सालानंतर खरी वाढ सुरु झाली. खासगी क्षेत्रासाठी हा उद्योग त्याचवेळी खुला करण्यात आला होता. त्यापूर्वी असलेल्या सरकारी टेलिकॉम खात्याची अतिशय वाईट स्थिती होती. नंतर या सरकारी टेलिकॉम खात्याचे रुपांतर बी.एस.एन.एल. या कंपनीत करण्यात आले, मात्र त्यांच्याकडे व्यावसायिकता नसल्याने या कंपनीने खरे तर चांगली पायाभूत सुविधा असूनही खासगी कंपन्यांशी ते स्पर्धा करु शकले नाहीत, ही दुदैवी बाब आहे. मात्र हा उद्योग खासगी क्षेत्राला खुला केल्यापासून सर्वसामान्यांपर्यंत मोबाईल पोहोचले व स्पर्धेचा फायदा ग्राहकांना झाला. आता मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाने यात पाऊल ठेवल्यापासून या उद्योगाला मोठी स्पर्धा करावी लागत आहे. यातून यातील कंपन्यांचे विलीनीकरण होऊ घातले आहे. यातून नोकर्‍या जातील हे वास्तव स्वीकारत असताना ग्राहकांचा फायदा होणार आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
----------------------------------------------------------------

0 Response to "टेलिकॉम उद्योगातील संकट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel