-->
संपादकीय पान--चिंतन--१६ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
स्मार्ट फोन्समध्ये भारतीय कंपन्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांवर बाजी
----------------------------------------------
स्मार्ट फोम उद्योगात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नाकीनऊ आणणारी पहिली भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने आता आपले उत्पादन देशात सुरु करण्याचे ठरविल्याने देशात मोबाईल फोन्स उत्पादनात एक महत्वाचे पाऊल पडले आहे. आजपर्यंत मायक्रोमॅक्स ही कंपनी आपले उत्पादन चीनमधून उत्पादन करुन आणून भारतात त्याची विक्री करीत होती. मात्र आता त्यांनी त्यांच्या उत्पादनाविषयी धोरणात बदल केला आणि भारतात उत्तराखंडातील रुद्रपूर येथे नवीन उत्पादन प्रकल्प स्थापन केला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मायक्रोमॅक्सला भारतात चीनपेक्षा कमी खर्चात मोबाईल फोन उत्पादन करता येऊ लागले आहेत. तसेच भारत सरकारने देशात मोबाईल्सचे उत्पादन सुरु व्हावे यासाठी काही नवीन सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच सरकारच्या आदेशानुसार, २०१७ सालापासून मोबाईल उत्पादकांना त्यांच्या एकूण किंमतीच्या ४५ टक्के सुटे भाग भारतातून उत्पादीत करावे लागणार आहेत. यापूर्वी चीन ही जगातील मोबाईल फोन्स स्वस्तात उत्पादन करणारी सर्वात मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे जगातल्या अनेक नामवंत कंपन्या आपले उत्पादन चीनमधून करीत होत्या. मात्र आता मायक्रोमॅक्सने ही सर्व गणिते बदलून टाकली आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात मोबाईल फोन्सची उत्पादनाची बाजारपेठ भारत आपल्याकडे वळवू शकल्यास एक वेगळे चित्र निर्माण होईल.
मायक्रोमॅक्स ही मोबाईल उद्योगातली देशातली पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. त्यांनी अल्पावधीत केवळ भारतीयच नाही तर जगातील अनेक भागात आपले उत्पादन विकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही कंपनी आता रुमानिया व रशियाच्या बाजारपेठेत प्रवेश करीत आहे. कंपनीचे संस्थापक राहूल शर्मा हे दिल्लीस्थिती उद्योगपती असून येत्या वर्षात कंपनीची उलाढाल सहा हजार कोटी रुपयांवर जाईल. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने मोबाईल कंपन्यांना त्यांची उत्पादने चीनऐवजी भारतात उत्पादीत करणे फायदेशीर ठरेल. डॉलर महाग झाल्याने आयात महाग झाली आहे. याचा परिणाम म्हणून चीनमधून फोन उत्पादीत करुन ाणणे आता फारसे फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे केवळ भारतीयच नाही तर काही विदेशी कंपन्यांही भारतात फोन्सचे उत्पादन करण्याचा विचार करतील. मायक्रोमॅक्सने अल्पावधीत ज्या गतीने भारतीय स्मार्ट फोन बाजारपेठेत आपला वाटा काबीज केला ते कौतुकास्पदच आहे. सध्या स्मार्ट फोन्सच्या भारतीय बाजारपेठेत सॅमसुंग ही कंपनी २६ टक्के वाटा कमावून पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या मायक्रोमॅक्सचा वाटा २२ टक्के आहे. त्याखालोखाल आणखी एक भारतीय कंपनी कार्बनचा वाटा १३ टक्के आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्या नोकिया व सोनी यांचा प्रत्येकी वाटा पाच टक्के आहे. मायक्रोमॅक्सची उत्पादने आपल्या शेजारील बांगला देश, नेपाळ व श्रीलंकेतही अल्पावधीत लोकप्रिय झाली आहेत. सध्या भारतीय कंपन्या भारतात उत्पादन सुरु करीत असल्या तरी बहुतांशी सुटे भाग आयात करुन त्यांचे जुळवणी करण्याचे काम भारतात होईल. मात्र कालांतराने संपूर्णपणे भारतात उत्पादन सुरु होईल. स्मार्ट फोन्सची भारतात मोठी बाजारपेठ आहे. मात्र जे स्मार्ट फोन्स सर्वांना परवडतील असे तयार करणार्‍या कंपन्यांना भविष्य उत्तम आहे. मायक्रोमॅक्स कंपनीची गेल्या दोन वर्षात किंमत कमी असल्यानेच झापाट्याने वाढ झाली. अर्थातच चीनी कंपन्यांपेक्षा त्यांची किंमत थोडी जास्त असली तरीही किंमतीच्या तुलनेत त्यांनी उत्तम दर्जा राखल्याने त्यांनी झपाट्याने बाजारपेठ काबीज केली.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel