
कमोडिटीची डिलिव्हरी स्वीकारली जाईल काय?
कमोडिटीची डिलिव्हरी स्वीकारली जाईल काय? |
प्रसाद केरकर, मुंबई |
कोणत्याही कॉन्ट्रॅक्टची डिलिव्हरी होत असताना कमोडिटीच्या गुणवत्तेविषयी विहित 'क्वालिटी अँडजस्टमेंट'चे संकेत पाळले गेलेले नसल्यास त्या कमोडिटीची डिलिव्हरी घेतली जात नाही. प्रश्न- कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या मुदतपूर्तीनंतर (एक्स्पायरी) डिलिव्हरी कुठे केली जाते? उतर - कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या 'एक्स्पायरी'नंतर एक्स्चेंजने ठरवून दिलेली गोदामे किंवा डिलिव्हरी केंद्रांमध्ये संबंधित कमोडिटीची करारविषयक तपशिलांनुसार डिलिव्हरी केली गेली पाहिजे. प्रश्न- करारविषयक तपशिलात नमूद केलेले 'डिलिव्हरी सेंटर्स' काय असतात? उत्तर- एक्स्चेंजने मान्यता दिलेल्या देशभरातील विविध गोदामांची ही ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी ट्रेडिंग मेंबर्सना त्यांच्या कमोडिटीची डिलिव्हरी करणे आवश्यक असते. उत्तर- कमोडिटीचे 'डिलिव्हरी पे-इन' म्हणजे मेंबर्सद्वारे करारकाळात किंवा डिलिव्हरीच्या काळात एक्स्चेंजद्वारे विहित गोदामांकडे कमोडिटी विहित प्रमाणात सुपूर्द करणे होय. प्रश्न- डिलिव्हरीसमयी 'पे-इन ऑफ फंड्स' या सं™ोतून कोणता अर्थ सूचित होतो? उत्तर - डिलिव्हरीच्या वेळी खरेदीदाराने प्रत्यक्षात गोदामातून कमोडिटीची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्याच्या सौदापूर्ती खात्यातून त्याने कॉन्ट्रॅक्टमध्ये विहित निधी हस्तांतरित होण्याला 'पे-इन ऑफ फंड्स' म्हटले जाते. प्रश्न- कमोडिटीचे 'डिलिव्हरी पे-आऊट' कशाला म्हटले जाते? उत्तर- कमोडिटीचे 'डिलिव्हरी पे-आऊट' म्हणजे खरेदीद्वारे करारकाळात किंवा डिलिव्हरीच्या काळात एक्स्चेंजद्वारे निश्चित गोदामांतून कमोडिटीची विहित प्रमाणात उचल करणे होय. उत्तर- डिलिव्हरीच्या वेळी खरेदीदाराने प्रत्यक्षात गोदामातून कमोडिटीच्या डिलिव्हरीची उचल केल्यानंतर विक्रेत्याच्या सौदापूर्ती खात्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये विहित निधी एक्स्चेंजद्वारे हस्तांतरित होण्याला 'पे-आऊट ऑफ फंड्स' म्हटले जाते. प्रश्न- कराराच्या तपशिलात नमूद 'डिलिव्हरी लॉजिक' या सं™ोतून कोणता अर्थ सूचित होतो? उत्तर - याचा अर्थ करारकाळात खरेदीदार आणि विक्रेत्यांकडे कमोडिटीच्या डिलिव्हरी संबंधाने उपलब्ध असलेले विविध पर्याय असा आहे. डिलिव्हरीसंबंधी या पर्यायांमध्ये प्रामुख्याने 'सेलर्स ऑप्शन', 'बोथ ऑप्शन' आणि 'कम्पलसरी डिलिव्हरी' असे तीन पर्याय उपलब्ध असतात. prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "कमोडिटीची डिलिव्हरी स्वीकारली जाईल काय?"
टिप्पणी पोस्ट करा