
कॉन्ट्रॅक्टमधील 'टिक साइज'चा अर्थ काय?
कॉन्ट्रॅक्टमधील 'टिक साइज'चा अर्थ काय? |
Published on 02 Apr-2012 ARTHPRAVA |
प्रसाद केरकर, मुंबई प्रश्न - 'कोटेशन/ बेस व्हॅल्यू' याचा अर्थ काय? उत्तर- कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेली किंमत ज्या प्रमाणित परिमाण वा एककातून काढली जाते त्याला कोटेशन किंवा 'बेस व्हॅल्यू' म्हटले जाते. उदाहरणार्थ- सोन्याच्या वायद्यांसाठी 10 ग्रॅम हे एकक बेस व्हॅल्यू आहे. प्रश्न - कॉन्ट्रॅक्टच्या तपशिलात नमूद केलेले 'ट्रेडिंग युनिट' काय असते? उत्तर- फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये एक्स्चेंजवर किमती प्रमाणात ट्रेडिंग केले जावे त्याचे आकारमान म्हणजे ट्रेडिंग युनिट होय. उदाहरणार्थ, सोन्याच्या वायद्यांसाठी 1 किलोग्रॅम हे ट्रेडिंग युनिट आहे. प्रश्न -कमाल 'ऑर्डर साझ'मधून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? प्रश्न - कमाल परवानाप्राप्त ओपन पोझिशन र्मयादेचा अर्थ काय? उत्तर- ट्रेडिंग मेंबर अथवा त्यांच्या क्लायन्ट्सना ओपन पोझिशन्ससाठी परवानगी देण्यात आलेली ही कमाल र्मयादा असते. प्रश्न - डिलिव्हरी युनिट किंवा डिलिव्हरी लॉटचा अर्थ काय? उत्तर- कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील झालेल्या संबंधित कमोडिटीची कोणत्या प्रमाणात डिलिव्हरी केली जावी त्याचे हे एकक आहे. यासाठी प्रचलित व्यवहारपद्धती आणि वाहतुकीची सोय लक्षात घेतली जाते. प्रश्न - गुणवत्तेविषयक तपशिलाद्वारे काय सूचित केले जाते? प्रश्न - 'क्वालिटी अँडजस्टमेंट'चा अर्थ काय? उत्तर - कोणत्याही कॉन्ट्रॅक्टची डिलिव्हरी होत असताना कमोडिटीच्या गुणवत्तेविषयक किमान सुसह्य पातळी 'क्वालिटी अँडजस्टमेंट'द्वारे ठरवली जाते. या पातळीपेक्षा खराब अवस्था असल्यास त्या कमोडिटीची डिलिव्हरी घेतली जाऊ नये असे संकेत आहेत, अन्यथा त्या त्या परिस्थितीनुसार, कॉन्ट्रॅक्टच्या मूल्यात सवलत किंवा अधिमूल्य आकारण्याची पद्धती आहे. prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "कॉन्ट्रॅक्टमधील 'टिक साइज'चा अर्थ काय?"
टिप्पणी पोस्ट करा