-->
संपादकीय पान--चिंतन--१८ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
विक्रमादित्य खरोखरीच उपयोगी ठरेल का? 
--------------------------------
रशियन बनावटीची कालच भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली आयएनएस विक्रमादित्य हे विमानवाहू लढावू जहाज आपल्याला खरोखरीच फायदेशीर ठरेल का? कारण आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू लढाऊ जहाज रशियाहून मायदेशी परतीच्या मार्गावर कसलेही हवाई संरक्षण देण्यात आले नसून या जहाजाच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने युद्धनौका पाठविल्या आहेत. भारतीय नौदलाने विक्रमादित्यचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी वादग्रस्त बॅरक क्षेपणास्त्रांची निवड केली आहे.
भारतात पोहोचल्यानंतरच हे क्षेपणास्त्र विक्रमादित्यवर तैनात केले गेले आहे.  आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू लढाऊ युद्धनौकेला अंगभूत अशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा नाही. आम्ही हे लढाऊ जहाज भारतात आल्यानंतर त्यावर बॅरक क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्याचे ठरविले आहे, असे नौदल अधिका-याने सांगितले आहेे.  तर मग हे लढावू वामानवाहू जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याची ऐवढी घाई कशाला करण्यात आली? असे नेमके कोणते कारण आहे की या जहाजावर ही यंत्रणा रशियापासून निघाल्यापासून का बसविण्यात आलेली नाही. आयएनएस विक्रमादित्यला विशिष्ट मार्गाने भारतातील तिचा मूळ तळ असलेल्या हिंदी महासागरात आणण्यासाठी संरक्षक युद्धनौकांचा ताफा रशियाकडे रवाना झाला होता. त्याचबरोबर नौदलाने विमानवाहू नौकांच्या संरक्षणार्थ बॅरक क्षेपणास्त्रांची केलेली निवडही वादग्रस्त आहे. सीबीआय सध्या २००६ मध्ये झालेल्या बॅरक क्षेपणास्त्र खरेदी गैरव्यवहारप्रकरणी तपास करत आहे. हा तपास पूर्ण झाल्याशिवाय ही क्षेपणास्त्रे या जहाजावर बसिवणे योग्य ठरणारे नाही. तरीही ती बसविण्यात आली आहेत.
रशियाची युद्धनौका ऍडमिरल गोश्कोर्व्हला भारतीय नौदलाने आयएनएस विक्रमादित्य असे नाव दिले आहे. हे एक प्रकारे तरंगते शहरच आहे. ४५ हजार टचन वजनाच्या या युद्धनौकेवर हवाई तळदेखील आहे. त्याची लांबी २८४ मीटर तर रुंदी ६० मीटर आहे. हे तीन फुटबॉलच्या मैदानाइतके आहे. २० मजली उंच इमारती इतकी या युद्धनौकेची उंची आहे. विक्रमादित्यवर २२ छत असून तेथे १, ६०८ नौसैनिक तैनात असतील. विक्रमादित्य सलग ४५ दिवस समुद्रात राहू शकते. त्याची इंधन क्षमता आठ हजार टन इतकी आहे. एकूणच विक्रमादित्यचे स्वरुप पाहता ते भारतीय नौदलातील ताफ्यातील एक महत्वाची कामगिरी बजावणारे ठरेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. एक जमेची बाजू म्हणजे यात रशियन युध्दात वापरलेली अत्याधुनिक इलेक्ट्रनिक यंत्रणा वापरण्यात आलेली आहे. या यंत्रणेनुसार हे जहान त्याच्या ४०० कि.मी. अंतरावर दूर असलेले कोणतेही संदेदनाक्षम विमान ओळखू शकते. या जहाजाची तपासणी भारतीय नौदलाने अनेक चाचण्या करुन केली आहे. यासाठी मिग २९ सारख्या अत्याधुनिक लढावू विमानांचा वापर करण्यात आला होता. या चाचण्या घेतल्या त्यावेळी सुमारे एक हजार नौसैनिकांसह २५०० लोक या जहाजावर होते. भारतीय हवामान, येथील परिस्थती यांचा विचार करुन या जहाजात अनेक बदल करण्यात आले आहेत. यातील जल शुध्दीकरण प्रकल्पही बदलून भारतीय बनावटीचा बसविण्यात आला आहे. कारण त्यापूर्वी असलेला रशियन जल शुध्दीकरण प्रकल्प योग्य वाटला नाही. अतिभव्य दिव्य असे हे जहाज आहे. याची भव्यता केवळ एकाच गोष्टीवरुन आपण सांगू शकतो व ती म्हणजे. या जहाजाला दरमाहा आपल्या नौसैनकांना जगविण्यासाठी दरमहा एक लाख अंडी, वीस हजार लीटर दूध व १६ टन तांदूळ लागणार आहे. परंतु केवळ या भव्यतेवरुन भूरळून न जाता त्याच्या संरक्षणसज्जतेचा विचार झाला पाहिजे. अलीकडेच आपण रशियाहून आयात केलेल्या सिंधुरक्षक या पाणबुडी ज्या प्रकारे आगीत जळाली ते पाहता यापुढे विदेशातून युध्दनौका आयात करताना बरीच मोठी सावधानगिरी बाळगली गेली पाहिजे. विक्रमादित्यचे स्वागत करताना या बाबी लक्षात घएतल्या पाहिजेत.
---------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel