-->
कर्नाटकातील नवउद्योजकांची कथा

कर्नाटकातील नवउद्योजकांची कथा

रविवार दि. 15 जानेवारी 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
कर्नाटकातील नवउद्योजकांची कथा
-----------------------------------------
एन्ट्रो- आर्थिक उदारीकरणानंतर आपल्या आर्थिक रचनेत बदल होत असताना उद्योजकांची एक नवीन पिढी जन्माला आली. यातील नारायण मूर्ती हे नाव सर्वांनाच अल्पावधीत परिचयाचे झाले. एखादा उद्योगधंदा करण्यासाठी भांडवल लागत असे आणि ज्याच्याकडे भांडवल आहे तोच उद्योगधंदा सुरु करु शकत होता. मात्र 90 च्या दशकात आय.टी. उद्योगाने झपाट्याने आपल्याकडे शिरकाव केला आणि बौध्दीक संपत्तीच्या जोरावर देखील उद्योगधंदा करता येतो व करोडपती होता येते, हे पहिल्यांचा सिध्द झाले. त्यापूर्वी आपल्याकडे केवळ टाटा, बिर्ला या औघ्योगिक घराण्यांचाच इतिहास लोकांपुढे होता. आता मात्र भांडवल नसतानाही ज्यांनी करोडो रुपये आपल्या बौध्दीक संपत्तीच्या जोरावर कमविले अशांचा इतिहास पुढे आला. तरुणांसाठी हे मोठे प्रेरणादायी असेच होते. गेल्या दोन दशकांचा आता इतिहास पाहिल्यास, अशा प्रकारे एकाच पिढीत नवीन आर्थिक धोरणाचा फायदा घेत पुढे आलेल्या पिढीत कर्नाटकातील बुध्दीजीवींचा मोठा भरणा आहे...
----------------------------------------------------------
देशात 91 सालानंतर आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून आर्थिक धोरणात झपाट्याने बदल होत गेला. आजवर स्वातंत्र्यानंतर आपण सार्वजनिक क्षेत्राला जे प्राधान्य दिले होते ते मागे पडून खासगी क्षेत्रासाठी अनेक क्षेत्रे खुली करण्यात आली. सरकारचे व्यापार-उद्योग करणे हे काम नाही, त्यांनी केवळ धोरण आखावे व त्या धोरणाला अनुरुप उद्योगाला मदत करावी, असे नवे धोरण सुरु झाले. अर्थात हा बदल एका झटक्यात होणे काही शक्य नव्हते. सरकारची आजवरची असलेली मानसिकता बदलणे हे काही सोपे नव्हते. लाल फितीचा असलेला कारभार कमी व्हावा असे नोकरशाहीला मनोमन नकोसे वाटत होते. परंतु सरकारच्या धोरणानुसार त्यांना त्यात टप्प्याने बदल करावाच लागला. सरकारने हळूहळू आपले तोट्यातील उद्योग विकण्यास सुरुवात केली. यात चांगले नफ्यातील उद्योगही विकून सरकारने आपली दिवाळखोरी जाहीर केली. असो. हे सर्व आपल्या आर्थिक रचनेत बदल होत असताना उद्योजकांची एक नवीन पिढी जन्माला आली. यातील नारायण मूर्ती हे नाव सर्वांनाच अल्पावधीत परिचयाचे झाले. मात्र त्यापूर्वी एखादा उद्योगधंदा करण्यासाठी भांडवल लागत असे आणि ज्याच्याकडे भांडवल आहे तोच उद्योगधंदा सुरु करु शकत होता. मात्र 90 च्या दशकात आय.टी. उद्योगाने झपाट्याने आपल्याकडे शिरकाव केला आणि बौध्दीक संपत्तीच्या जोरावर देखील उद्योगधंदा करता येतो व करोडपती होता येते, हे पहिल्यांचा सिध्द झाले. त्यापूर्वी आपल्याकडे केवळ टाटा, बिर्ला या औघ्योगिक घराण्यांचाच इतिहास लोकांपुढे होता. आता मात्र भांडवल नसतानाही ज्यांनी करोडो रुपये आपल्या बौध्दीक संपत्तीच्या जोरावर कमविले अशांचा इतिहास पुढे आला. तरुणांसाठी हे मोठे प्रेरणादायी असेच होते. गेल्या दोन दशकांचा आता इतिहास पाहिल्यास अशा प्रकारे एकाच पिढीत नवीन आर्थिक धोरणाचा फायदा घेत पुढे आलेल्या पिढीत कर्नाटकातील बुध्दीजीवींचा मोठा भरणा आहे. याची उद्बोधक माहिती नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिध्द केली आहे. 90च्या काळात ज्या तरुणांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली त्यात बी.आर. शेट्टी (मालमत्ता 18,700 कोटी रुपये), नारायणमूर्ती (मालमत्ता 11,100 कोटी रुपये), रंजन पै (मालमत्ता 10,200 कोटी रुपये), नंदन निलकेणी (मालमत्ता 7,640 कोटी रुपये), के. दिनेश (मालमत्ता 5,730 कोटी रुपये), व्ही.जी. सिध्दरथा (मालमत्ता 4,800 कोटी रुपये), इरफान रझाक (मालमत्ता 4,560 कोटी रुपये), डॉ. देवी शेट्टी (मालमत्ता 4,510 कोटी रुपये), अजित प्रभू (मालमत्ता 3,460 कोटी रुपये), शशि किरण शेट्टी( मालमत्ता 3,040 कोटी रुपये) या उद्योजकांचा समावेश आहे. यातील सर्वात एक महत्वाची बाब म्हणजे यातील बहुतांशी उद्योजक हे पहिल्या पिढीचे आहेत व शून्यातून आज या थराला पोहोचले आहेत. अपवाद फक्त व्ही.जी. सिध्दरथा, इरफान रझाक, रंजन पै यांचा आहे. नारायममूर्ती व दिनेश यांचे वडिल हे शिक्षक होते. नंदन निलकेणी यांचे वडिल हे मिलमध्ये व्यवस्थापक होते. बी.आर.शेट्टी यांचे वडिल हे शेतकरी होते, मात्र त्यांचा राजकीय पक्षांशी संबंध होता. अजित प्रभूंचे वडिल हे फळ विक्रेते होते. डॉ. देवी शेट्टी व शशि किरण यांच्या वडिलांचे लहान उद्योग होते. मात्र आपला उद्योग त्यांनी नव्याने उभारला व घरच्यांचा त्यांना काही पाठिंबा नव्हता. बी.आर. शेट्टी यांनी अबुधाबीमध्ये साधी नोकरी करण्यास सुरुवात केली, आज त्यांचा बुर्ज खलिफा या इमारतीत 100 व्या मजल्यावर 15 हजार चौरस फुटांचा फ्लॅट आहे. त्यांच्या कंपनीत आज 38,000 कर्मचारी कामाला आहेत. आय.टी. उद्योगातील देशातील दोन क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोससचे संस्थापक नारायणमूर्ती यांचा जन्म कोलार जिल्ह्यातील असला तरी त्यांचे शिक्षण आय.आय.टी. कानपूरमध्ये झाले. त्यांच्या सोबत असलेले कंपनीचे संस्थापक नंदन निलकेणी व के. दिनेश हे देखील कर्नाटकातीलच होते. जी.व्ही.सिध्दरथा यांचा कौटुंबिक उद्योग कॉफी प्लॅनेटेशनचा होता. सिंगापूरला ते गेले असताना त्यांनी कॉफी व इंटरनेट वापरण्यांसाठी स्वतंत्र शॉप्स पाहिली होती. ही संकल्पना त्यांनी भारतात आणली व कॅफे कॉफी डेची स्थापना केली. आता याची साखळी संपूर्ण देशात पोहोचली आहे. रंजन पै यांचे देखील तसेच आहे. वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या वडिलांनी स्थापन केले होते. त्यांनी संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात उडी मारली व विद्यापीठ स्थापन केले. आज मणिपाल विद्यापीठाच्या शाखा नेपाळ, मलेशिया, दुबई येथे स्थापन झाल्या आहेत. 90च्या दशकात सुरुवात केलेल्या या उद्योजकांनी आपला उद्योग तेजीत आल्यावर त्याचे भांडवल शेअर बाजारात विक्रीस आणले. अशा प्रकारे नव उद्योजकांच्या या कंपन्यांना शेअर बाजारात जबरदस्त मागणी होती. त्यांचे शेअर्स झपाझप वाढत गेले तसे त्यांची श्रीमंतीही वाढली. इन्फोसिस हे त्याचे एक उत्तम उदाहरण ठरले. इन्फोसिसने त्यांच्या समभागधारकांनाच नव्हे तर कर्मचार्‍यांनाही करोडपती केले. या यादीत विजय मल्ल्या हे देखील येतात. मात्र आता ते पूर्णपणे बदनाम झाले आहेत. त्यांचा उद्योग देखील पिढीजातच होता. मात्र मल्ल्या यांनी तो वाढवला. नवीन क्षेत्रात प्रवेश केला. मात्र ते यश त्यांना टिकविता आले नाही. शेवटी त्यांना कर्ज बुडविण्यासाठी देशातून पलायन करण्याची वेळ आली. कर्नाटकात अनेक उद्योजकांनी चांगल्या प्रकारे उद्योग करुन राज्याचे नाव पुढे आणले असले तरी मल्ल्यांनी त्याला काळीमा फासला, ही दुदैवी बाब आहे. कर्नाटकातील श्रीमंतांच्या या यादीत विप्रोचे अझीम प्रेमजी, बायोकॉनच्या किरण मुझुमदार शॉ, वाडियार राजघराण्यातील कुटुंबियांचाही समावेश आहे. एकूणच पाहता कर्नाटकाने उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने गेल्या दोन दशकात नवीन पिढीतील तरुणांनी मोलाचे योगदान दिले आहे. तरुणांसाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "कर्नाटकातील नवउद्योजकांची कथा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel