-->
सेल्फीचा बोर्‍या वाजला

सेल्फीचा बोर्‍या वाजला

संपादकीय पान शुक्रवार दि. 13 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सेल्फीचा बोर्‍या वाजला
शिक्षण विभागाकडून सर्व गोष्टी ऑनलाइन करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र आपल्यावर अविश्‍वास दाखवला जात असल्याची भावना शिक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून ते शिक्षण विभागाकडे होते. पण तांत्रिक बिघाड आणि प्रशिक्षणाअभावी सेल्फीला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही शाळांमध्ये सेल्फी काढण्यात आले. पण काही शाळांमध्ये सेल्फी काढलेच गेले नाहीत. सेल्फी काढायचे, ते अपलोड करण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे काही शाळांत शिक्षकांना अडचणी आल्या. विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, यासाठी सरकारने काही मोहीम हाती घेतल्या होत्या. शिक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले. काही शाळांत बायोमेट्रिक्स बसवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थीसंख्या कळवण्यात आली आहे. आता शाळांत सेल्फी काढण्याची टूम काढण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे पहिले दोन तास वाया गेले. आता हे तास कोण भरून काढणार? शिक्षकांना सेल्फीचे आणि ते अपलोड करण्याचे प्रशिक्षण दिले नाही. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केल्याचे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेने म्हटले आहे. शिक्षण विभाग काही नीवन प्रयोग करीत आहे, मात्र त्यातील काही प्रयोग हे चांगले असले तरीही काही प्रयोग हे भ्रन्नाट आहेत. त्यातीलच सेल्फिचा हा प्रयोग आहे. मुलांची उपस्थिती पाहाण्यासाठी सेल्फि काढण्याचे कोणाच्या तरी डोक्यात आले. मात्र शाळेतील प्रत्येक शिक्षकाकडे स्मार्ट फोन आहे का? याचा विचार कोणी केला नाही. जर नसला तर पर्यायी काय व्यवस्था केली जाणार आहे? त्यातच अनेक शिक्षकांना सेल्फि काढताच येते असे नाही. त्यातील जे तरुण आहेत ते काढू शकतील, परंतु जे पंन्नशीच्या पुढे आहेत त्यांची खात्री देता येत नाही. अशा वेळी करायचे काय? तसेच शिक्षक अनेकदा सध्या सेल्फिच्या वापरामुळे अनेकांचे जे जीव जात आहेत त्याविरोधात विद्यार्थ्यांना कदाचित भाषणही देत असतील. तेच शिक्षक आता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फि काढणार आहेत का? याचा कुणीच विचार न करता सेल्फिचे हे फॅड शिक्षण खात्याने काढले. मुंबईत केबिनमध्ये घेऊन एखादा निर्णय घेतला की, त्याचे काय परिणाम असतात हेच यावरुन स्पष्ट दिसते.
---------------------------------------------------

0 Response to "सेल्फीचा बोर्‍या वाजला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel