-->
सखोल चौकशी करा

सखोल चौकशी करा

संपादकीय पान शुक्रवार दि. 13 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सखोल चौकशी करा
सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांना मिळणार्‍या नित्कृष्ट जेवणाची व्यथा मांडणार्‍या सीमा सुरक्षा दलातील जवान तेज बहाद्दूर यादव याची कारकिर्द वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी त्या जवानावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलातर्फे देण्यात आली आहे. मात्र त्याने केलेल्या आरोपाची सखोल चौकशी सर्वात पहिल्यांदा केली गेली पाहिजे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रकरणावर अहवाल मागितला आहे. तसेच या जवानाला दोषारोप देण्यापेक्षा नेमकी लष्करातील जवानांना कशा प्रकारचे खाद्य दिले जाते याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सीमा सुरक्षा दलातील तेज बहादूर यादव या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तेज बहादूरने जवानांना मिळणार्‍या जेवणाचा दर्जा सुमार असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारकडून देशभक्तीचे दाखले दिले जात असताना जवानांना मिळणार्‍या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आल्याने केंद्रातील मोदी सरकार एक प्रकारे अडचमीतच आले. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सांगण्यानुसार, तेज बहादूरची कारकिर्द वादग्रस्त आहे. त्याच्यावर चार वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. मद्यप्राशन करणे, अधिकार्‍यांसोबत उद्धटपणे वर्तन करणे, वारंवार सुटी घेणे अशा विविध कारणांमुळे तेज बहादूर नेहमीच वादाच्या भोवर्‍यात असायचा असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. तेज बहादूरला शिस्तभंगाप्रकरणी शेवटची झालेली शिक्षा म्हणजे सात दिवसांचा तुरुंगवास होता. सीमा सुरक्षा दलाच्या न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली होती. तेज बहादूर यादवने काही दिवसांपूर्वी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्जही दिला आहे. तेज बहादूर हा 1996 च्या सुमारास भरती झाला होता. भरती झाल्यापासून त्याला समुपदेशनाची गरज होती. या कारणांमुळेच त्याला बराच काळ सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयातच तैनात केले जायचे असे सांगितले जाते. 10 दिवसांपूर्वीच तेज बहादूरला सीमा रेषेवर पाठवण्यात आले होते. समुपदेशनाचा त्याला फायदा होत आहे का हे तपासण्यासाठीच त्याला पुन्हा सीमा रेषेवर पाठवण्यात आले होते असे सांगण्यात आले आहे. मात्र, तेज बहादूरने मांडलेल्या परिस्थितीवर स्पष्टीकरण देण्याऐवजी सीमा सुरक्षा दलाकडून त्याला मनोरुग्ण ठरवण्याचा डाव होत असल्याची प्रतिक्रियाही आता व्यक्त होत आहे. तर तेज बहादूरनेही एका वृत्तवाहिनीशी बोलताना सीमा सुरक्षा दलाच्या दाव्यावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. मी मनोरुग्ण होतो तर मग मला पुरस्कार कसे मिळाले असा प्रश्‍नच त्याने उपस्थित केला आहे. त्याचे हे म्हणमे काही खोटे नाही. जर तो मनोरुग्ण आहे तर त्याला कामावर का रुजू करुन घेतले असाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. जवानांच्या जीवावर राष्ट्रप्रेमाचे राजकारण करायचे व प्रत्यक्षात सीमेवर लढणार्‍या जवानांना चांगले अन्नही मिळत नाही अशी स्थीती आहे, बरे हे जो उघड करेल त्याला मात्र मनोरुग्ण ठरवायचे. सरकारने या प्रकरणात स्पष्टता आणली पाहिजे.

0 Response to "सखोल चौकशी करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel