चीनी स्मार्टफोन्सला मागणी
संपादकीय पान शनिवार दि. 07 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चीनी स्मार्टफोन्सला मागणी
तुम्ही जर सच्चे भारतीय असाल तर चीनी मालावर बहिष्कार टाका, चीनमधील वस्तू वापरू नका, स्वदेशी वस्तू वापरा असा प्रचार होत असतानाच भारतीय बाजारपेठेमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका असे काही लोक म्हणत होते परंतु भारतीयांची पसंती चीनच्या स्मार्टफोनला असल्याचे एका पाहणीतून आढळले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये चीनच्या स्मार्टफोनचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा हा 40 टक्के झाला आहे. भारतीय बाजारपेठ ही स्मार्टफोनसाठी जगातील दुसर्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे चीनचा भारतीय बाजारपेठेतील वाढता हिस्सा ही भारतीय निर्मात्यांची डोकेदुखी ठरत आहे. सर्वाधिक जास्त वाढ ही लिनोव्होच्या स्मार्टफोन्समध्ये पाहायला मिळाली आहे. सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीनंतर लिनोव्होचीच उत्पादने सर्वाधिक विकली गेली आहे. भारतीय बाजारपेठेत विक्रीमध्ये प्रथम क्रमांकावर सॅमसंग, द्वितीय क्रमांकावर लिनोव्हो आहेत. पाठोपाठ शिओमी या कंपनीने भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. शिओमीचा भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये 10.7 टक्के हिस्सा आहे. चीनमधील उत्पादनांची जर बेरीज केली तर त्यांचा हिस्सा 40 टक्क्यांचा असल्याचे या पाहाणीत म्हटले आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांच्या विक्रीत तुलनेनी घट झाली आहे. मायक्रोमॅक्सची भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड होती परंतु त्यांच्या विक्रीतही सातत्याने घट झाली आहे. मायक्रोमॅक्सची विक्री 16.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. राष्ट्रप्रेमाचा एवढा प्रचार होईनही लोक का चीनी माल घेतात असा प्रश्न कोणालाही पडेल. अर्थात वस्तू खरेदी करण्यामागे राष्ट्रप्रेम हा मुद्दा नसून आपल्या खिसाला कोणती बाब परवडेल याचा ग्राहक सर्वात प्रथम विचार करतो. सध्या चीनी माल अतिशय स्वस्त तर आहेतच शिवाय भरपूर फिचर्सयुक्त असे आहेत. त्यामुळे महागडे फोन घेण्यापेक्षा चीनी माल घेणे लोक पसंत करतात. यासाठी चिनी मालावर बहिष्कार हे उत्तर असू शकत नाही. तर चीनच्या किंमतीत व चांगले फिचर्स असलेले स्मार्टपोन्स आपल्या कंपन्यांना बाजारात आणावे लागतील. अर्थात त्यासाठी सरकारची मदत या कंपन्यांना लागेल. केवळ मेक इन इंडियाची प्रदर्शने भरवून हा प्रश्न सुटणार नाही.
----------------------------------------------------------------

0 Response to "चीनी स्मार्टफोन्सला मागणी"
टिप्पणी पोस्ट करा