गरीब-श्रीमंतातील दरी
संपादकीय पान मंगळवार दि. 17 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख
--------------------------------------------
गरीब-श्रीमंतातील दरी
आपल्या देशात गेल्या काही वर्षात जे आपण अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत त्यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, गरीब व श्रीमंतांतील वाढत चाललेली दरी, हा आहे. ही दरी एवढ्या झपाट्याने वाढत चालली आहे की, ही दरी कधीही भरून न निघणारीच आहे. अर्थात अशा प्रकारची दरी असणे हा जगातील अनेक देशांपुढील प्रश्न आहे, मात्र विकसनशील देशांपुढे प्रामुख्याने आशियाई खंडात भारतापुढे हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. सुमारे एक टक्के भारतीय अब्जाधिशांकडे देशातील जवळपास 58 टक्के संपत्ती केंद्रीत झाल्याचे एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे. देशात 58 असे श्रीमंत असे आहेत की ज्यांकडे देशातील 70 टक्के लोकांकडे मिळून जितकी संपत्ती नसेल त्याहूनही अधिक संपत्ती आहे. भारतात गरीब-श्रीमंत दरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आयटी उद्योगातील कंपन्या जवळपास 416 पटींनी जास्त नफा कमावत आहेत म्हणून श्रीमंत आणि गरीब अशी तफावत भारतात पाहायला मिळत आहे, असे बोलले जाते. मात्र हे शंभर टक्के सत्य नाही. आपल्याकडे गेल्या वीस वर्षात प्रामुख्याने आर्थिक उदारीकरण सुरु झाल्यापासून ही दरी झपाट्याने वाढत गेली. 1988 ते 2011 या काळात देशातील 10 टक्के गरीबांचे वार्षिक उत्पन्न हे फक्त 2 हजार रुपयांनी वाढले आहे तर या तुलनेत देशातील श्रीमंतांच्या वार्षिक उत्पन्नांत मात्र 40 हजार रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे भारतातील गरिबांच्या आर्थिक स्थितीत कोणताही फरक दिसत नाही तर श्रीमंत मात्र अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत. अर्थात ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही समस्या जागतिक आहे. जगातील अर्ध्याधिक संपत्ती ही फक्त आठ व्यक्तींच्या हाती एकवटली आहे. त्यात अमेरिकेतल्या सहा गर्भश्रीमंताचा आणि मेक्सिकोमधल्या एक आणि स्पेनमधल्या एका व्यवसायिकाचा समावेश आहे. जगातील 50 टक्के गरीबांची संपत्ती एकत्र केली तर त्यापेक्षाही अधिक संपत्ती ही या आठ गर्भश्रींमतांकडे आहे. यात बिल गेट्स, मार्क्स झुकेरबर्ग आणि मायकल ब्लूमबर्ग व्यतिरिक्त आणखी पाच जणांचा समावेश आहे. ही तफावत कमी करणे हे जगापुढे आव्हान आहे तसेच हे आव्हान भारतापुढेही आहे.
------------------------------------------------

0 Response to "गरीब-श्रीमंतातील दरी"
टिप्पणी पोस्ट करा