-->
ज्ञानमंदीरातील प्रथम

ज्ञानमंदीरातील प्रथम

रविवार दि. ०२ ऑक्टोबर २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
ज्ञानमंदीरातील प्रथम
-----------------------------------
नुकताच आय.आय.टी.च्या मुंबईतील विद्यार्थ्यांनी ङ्गप्रथमम हा दहा किलो वजनाचा उपग्रह तयार करुन तो यशस्वीरित्या आता प्रक्षेपित केला. अशा प्रकारे केवळ विद्यार्थ्यांनी त्यांचे डोके वापरुन उपग्रह तयार करण्याची ही जगातील पहिली वेळ आहे. अशा प्रकारचा प्रयोग कुठेही जगात झाला नाही. भारतासाठी ही मोठी गौरवाची बाब आहे. ज्यावेळी सोमवारी हा उपग्रह झेपावला, त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. या मुलांना आपला प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद तर मिळालच; परंतु आपण जगात काहीतरी वेगळे करुन दाखविल्याचा अभिमान वाटला. या उपग्रहासाठी मालाड येथील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्राऊंड स्टेशन उभे करण्यात आले आहे. याची उभारणीदेखील अथर्वच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी अथर्वच्या माजी विद्यार्थ्यांनीही मोठा हातभार लावला आहे. यातील अनेक विद्यार्थी आता नोकरीला लागले आहेत; परंतु त्यांनी सध्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे स्टेशन उभारले आहे. आय.आय.टी.च्या व अथर्वच्या या मुलांच्या यशामुळे तरुण पिढीच्या मनात एक नवा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. 
-----------------------------------------------
स्वातंत्र्यानंतर आपल्याला केवळ नोकरशाही तयार करायची नव्हती, तर येथे शास्त्रज्ञ व उत्तम प्रशासक तयार करावयाचे होते. यासाठी आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आखणी केली होती. आपल्या देशात शास्त्रज्ञ तयार व्हावेत व देश भविष्यात झपाट्याने प्रगती करावा यासाठी पंडितजींनी आय.आय.टी.ची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांना त्यावेळी सोव्हिएत युनियनचे सहकार्य लाभले होते. ज्याप्रकारे देशात कुशल कामगार तयार करण्यासाठी आय.टी.आय.ची स्थापना झाली, तसेच उत्कृष्ट बुध्दीमत्ता असलेल्या मुलांतून शास्त्रज्ञ व चांगले तंत्रज्ञ तयार व्हावेत या हेतूने आय.आय.टी. सुरु करण्यात आली. पंडित नेहरुंनी त्यावेळी केलेल्या भाषणात आय.आय.टी.चा उल्लेख ज्ञानमंदिरे असा केला होता. नेहरुंच्या दूरदृष्टीची फळे आपण आता चाखत आहोत. या आय.आय.टी.तून तयार झालेले पदवीधर आज केवळ देशात नव्हे तर, जगात टॉप पोझिशनला आहेत. जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांतील उच्च पदावर असलेल्या भारतीय सी.ई.ओ.चे शिक्षण पाहिल्यास ते आय.आय.टी.यन्स असल्याचे दिसते. ही पंडित नेहरुंची दूरदृष्टी होती. सध्या भाजपच्या काळात पंडित नेहरुंवर टीका करण्याची फॅशन आली आहे. मात्र, टीकाकारांनी ही वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. असो. आज याची आठवण येण्याचे कारण म्हणजे, नुकताच आय.आय.टी.च्या मुंबईतील विद्यार्थ्यांनी ङ्गप्रथमम हा दहा किलो वजनाचा उपग्रह तयार करुन तो यशस्वीरित्या आता प्रक्षेपित केला. अशा प्रकारे केवळ विद्यार्थ्यांनी त्यांचे डोके वापरुन उपग्रह तयार करण्याची ही जगातील पहिली वेळ आहे. अशा प्रकारचा प्रयोग कुठेही जगात झाला नाही. भारतासाठी ही मोठी गौरवाची बाब आहे. ङ्गप्रथममच्या निर्मितीसाठी गेली आठ वर्षे प्रयत्न कगरण्यात आले. यासाठी आय.आय.टी.च्या सात बॅचमधील मुलांचा समावेश होता. यासाठी ३० विद्यार्थ्यांची एक टीम करण्यात आली होती. आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी ही संकल्पना मांडली गेली, त्यावेळी मुले एवढे मोठे काम करु शकतील का, अशी अनेकांना शंका होती. त्यामुळे सुरुवातीला याचा गाजावाजा करण्याचे धाडस कुणी दाखविले नाही. मात्र, हळूहळू हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, अशी खात्री वाटल्यावर मात्र याची वाच्यता करण्यात आली. ज्यावेळी सोमवारी हा उपग्रह झेपावला, त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. या मुलांना आपला प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद तर मिळालच; परंतु आपण जगात काहीतरी वेगळे करुन दाखविल्याचा अभिमान वाटला. या उपग्रहासाठी मालाड येथील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्राऊंड स्टेशन उभे करण्यात आले आहे. याची उभारणीदेखील अथर्वच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी अथर्वच्या माजी विद्यार्थ्यांनीही मोठा हातभार लावला आहे. यातील अनेक विद्यार्थी आता नोकरीला लागले आहेत; परंतु त्यांनी सध्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे स्टेशन उभारले आहे. आय.आय.टी.च्या व अथर्वच्या या मुलांच्या यशामुळे तरुण पिढीच्या मनात एक नवा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. सध्याची तरुण पिढी फास्ट आहे. मागच्या पिढीचा विचार करता ती झपाट्याने आपला विकास करण्यात मग्न आहे. मात्र, त्यांना योग्य दिशा व संगत मिळावी लागते. आय.आय.टी. शिकणारी मुले ही अतिशय हुशार म्हणून ओळखली जात असली तरी एकूणच विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होण्यास मदत होते. आज या मुलांनी उपग्रह तयार केला, त्यातून प्रेरणा घेऊन अन्य महाविद्यालयातील मुले आणखी काही संशोधन करु शकतील. अशाच प्रयोगातून भविष्यातील संशोधक तयार होणार आहेत. गेल्या काही वर्षात भारताने उपग्रह प्रक्षेपणात मोठी कामगिरी बजावली आहे. याची जागतिक असलेली बाजारपेठ सहजरित्या काबीज करण्यात यश मिळविले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी लागणरे रॉकेट लॉंचर देशात विकसित करण्यात आले आहेत. अगदी दहा किलोच्या वजनापासून ते १८०० किलो वजनाचे उपग्रह भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. भारताने या क्षेत्रात एवढे नाव कमविले आहे की, अगदी ऑस्ट्रीया, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, अमेरिका, ग्रेट ब्रिटन या विकसित देशांचेही उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. अन्य देशातून उपग्रह सोडण्यापेक्षा भारतातून उपग्रहाचे प्रक्षेपण करणे स्वस्त पडते. त्यामुळे भारताची ही मागणी वाढत चालली आहे. त्यातच आता ङ्गप्रथममसारखे उपग्रह विद्यार्थ्यांनी बनविल्यामुळे यातून भविष्यात शास्त्रज्ञ घडणार आहेत. ही घटना जरी लहान वाटत असली, तरी त्याचे परिणाम मात्र दीर्घकालीन फायद्याचे असणार आहेत. प्रामुख्याने तरुण पिढीच्या विकासात याचा मोठा हातभार लागेल.

Related Posts

0 Response to "ज्ञानमंदीरातील प्रथम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel