संघातील बंडाळी!
संपादकीय पान शनिवार दि. ०३ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
संघातील बंडाळी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि बंडाळी... छे, छे कधीच नाही. कडव्या शिस्तीचा नेहमी दाखला देणार्या संघात बंडाळी व्हायला ती काही कॉँग्रेस नव्हे. मात्र गोवा या छोट्याश्या राज्यात प्रथम संघाने आणि त्यांच्या माध्यमातून भाजपाने आपली बिजे रोऊन सत्ता काबीज करण्यापर्यंत पोहोचलेल्या संघात आता बंडाळी झाली आहे. एकदा का सत्ता आली की त्यातून येणारे सुसवे फुगवे, मानापमान, ज्येष्ठ-कनिष्ठ या सर्वच बाबी येतात. संघाने आपल्याला कितीही सांस्कृतिक संघटना म्हणवून घेतले असले तरीही आपली राजकीय पालकत्व संघटना भाजपा असल्याचे उघड आहे. यातून अनेकदा भाजपा व संघ हे हातात हात घालून थेटपणे वावरत असतात. अगदी स्पष्ट बोलायचे झाल्यास संघाचे राजकारण हे मागील दाराने असते तर भाजपाचे राजकारण हे संघाच्या मुखवट्याआड सुरु असते. संघाने आपल्या सदस्यांनी राजकीयदृष्ट्या कोणाबरोबर जायचे हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे असे उघडपणे सांगितले असले तरीही प्रत्येक संघाचा कार्यकर्ता हा भाजपाचाच असतो, हे काही लपलेले नाही. अशा प्रकारे गोव्यातही ज्या संघाच्या जोरावर सत्तेत आलो त्यांचेच राजकारण करण्याचे काम भाजपाने आजवर केले. त्याची करसत करण्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे तरबेज होते. पर्रिकरांनी आपल्या काळात पक्ष वाढविताना ज्यांचा संघाशी काडीमात्र संबंध नव्हता अशांनाही भाजपाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे भाजपाला गोव्यात चांगले बस्तान बसवायचे असेल तर केवळ संघाचे एकून चालणार नाही तर अन्य समाज घटकांचेही एैकावे लागणार हे स्पष्ट होते. त्यानुसार भाजपाची वाटचाल होती. प्रामुख्याने भाजपाशी नेहमी विरोधात असणार्या ख्रिश्चनानांनीही त्यांनी भाजपाच्या प्रवाहात आणले. हे त्यांचे एक मोठे यश होते. सुभाष वेलिंगकर यांनीच सुरुवातीला संघाच्या माध्यमातून अनेक कामे केली व आम जनतेला आपल्याकडे खेचून घेतले. मात्र त्याचबरोबर आक्रमक समाजकारणाची आणि त्याच्या मागच्या दाराने केल्या जाणार्या विभाजनवादी राजकारणाची दीक्षा दिली आहे. संघाचा विभागचालक हे काही साधेसुधे पद नव्हे. अत्यंत विश्वासातल्या आणि अनेक दिव्यातून तावून सुलाखून निघालेल्या कार्यकर्त्याकडे हे पद सुपुर्द केले जाते. या विश्वासाला वेलिंगकरांनी आपल्या कृती आणि उक्तीने तडा दिला, असा अन्वयार्थ या पदच्युतीतून काढावा लागेल. संघाची शिस्त, जो त्यांचा संघटनेचा गाभा समजला जातो ती शिस्त वेलिंगकरांनी मोडली, असाही या घटनेचा अर्थ आहे. पर्रिकर मुख्यमंत्रिपदी असताना सरकारने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सांभाळून घेण्याचा जो निर्णय घेतला त्याविषयीचे विचारमंथन होताना संघाचे विभागचालक या नात्याने वेलिंगकर यांना विश्वासात घेतले नव्हते, असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल. मग आत्ताच का वेलिंगकारंना ही बाब खटकली? यात कदाचित वेलिंकर यांची राजकीय महत्वाकांक्षाही आता जागृत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ख्रिश्चनांच्या कलाने राजकारण करणार्या कॉँग्रेस पक्षाला सत्ताभ्रष्ट करणे ही संघाची महत्वाची गरज होती. आता मात्र आपण सांगू तसेच सरकारने वाकावे आणि रांगावे या वेलिंगकर आणि त्यांच्या कलाने चालणार्या प्रदेशातील संघयंत्रणेच्या अट्टहासाला सरकार मान्य करणे शक्यच नव्हते. ती राजकीय हाराकिरी ठरली असती. या मुद्द्यावरची सरकारची भूमिका एका राजकीय अपरिहार्यतेतून आलेली आहे. भाजपामधील

0 Response to "संघातील बंडाळी!"
टिप्पणी पोस्ट करा