-->
संपादकीय पान--चिंतन--२१ ऑक्टोबर २०१३--
---------------------------------
जग आणि बांगला देशातल्या निर्वासितांची समस्या
--------------------------
दोन दिवसांपूर्वी अलिबागमध्ये बांगला देशातील दोघा महिलांना अटक करण्यात आली. प्रामुख्याने त्या बारमध्ये काम करणार्‍या होत्या. त्याचबरोबर विदेशी नागरिक असूनही त्यांच्याकडे भारतातील रेशनकार्ड होते. त्यामुळे त्यांनी कुणालातरी पैसे खायला घालून हे रेशनकार्ड मिळविले हे स्पष्ट होते. संयुक्त राष्ट्र संघाने अलीकडेच प्रसिध्द केलेल्या ताज्या अहवालानुसार, बांगला देशातून स्थलांतरीत झालेले सुमारे ३२ लाख नागरिक आहेत आणि ते देशातल्या अनेक भागात राहात आहेत. त्यांची ही संख्या फार मोठी आहे आणि त्या सर्वांना आपल्यात सामिल करुन घेतल्यासारखेच आहे. अशा प्रकारे आशियाई खंडातील हे सर्वात मोठे स्थलातर आहे. हे स्थलांतर वाईट आहे हे आपण एकवेळ मान्य केले तरी त्यामागची पार्श्‍वभूमी आपण समजावून घेतली पाहिजे.
बांगलादेश हा सध्या आशियाई खंडातील आपल्या शेजारी असलेल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर राजकीय अस्थर्य आहे. एक तर तिकडे मोठ्या प्रमाणावर बेकारी आहे. त्यामुळे तेथे लाखो लोक भुकेकंगाल आहेत. परंतु कुणीही असे म्हणेल की भारताने त्यांची जबाबदारी का स्वीकारावी? आपल्याला आपल्या नागरिकांची चिंता काय कमी आहे, तर आपण त्यांची चिंता करायची? परंतु मानवी दृष्टीकोनाचा विचार करता आपण आपल्या शेजारील नागरिक जर तेथील अस्थिर परिस्थितीमुळे आपल्याकडे येणार असतील तर त्यांना उघड्यावर टाकणे हे अमानवी ठरेल. यापूर्वी श्रीलंका अस्थिर असताना तेथील लाखो लोक आपल्याकडे तामीळनाडूत आश्रयाला आले होते. त्यांना त्यावेळी आपण काही उघड्यावर सोडून देऊ शकणार नव्हतो तसेच या प्रश्‍नांचे आहे. बरे अडचण अशी होते की, येथे येऊनही हे लोक बेघर म्हणून राहातात किंवा कोणत्याही वाममार्गाला लागतात. अनेक तरुणींना वेश्याव्यवसाय करण्याशिवाय काही पर्याय राहात नाही. अशा वेळी आपल्याकडील समस्या वाढतात. काही जण अतिरेकी संघटनांशीही जोडले जातात. त्यामुळे आपण ही समस्या संयुक्त राष्ट्र संघाकडेही मांडली असून त्यावर कोणताही तोडगा दृष्टीप़थात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही समस्या वाढतच जाणार आहे. प्रामुख्याने बांगला देशातील सीमावर्ती भागात ही समस्या मोठे आव्हान ठरणार आहे.
भारतासारखा विकसनशील देश असो किंवा विकसीत अमेरिका असो. प्रत्येक देशाला वेगवेगळ्या तर्‍हेने निर्वासितांची समस्या ही त्रस्त करीतच आहे. अमेरिकेतही उपरे आणि भूमीपूत्र हा वाद काही नवीन नाही. सद्या मंदीच्या हेवकाव्याने त्रस्थ असलेल्या अमेरिकेतही आशिायाई देशातून आलेल्यांना उपरेच समजते आणि ही लोकसंख्या त्यांना नकोशी वाटते. जर्मनीतही तुर्कस्थानातून आलेल्या कामगारांचा मोठा प्रश्‍न आहे. ऑस्ट्रेलियातही उपरे म्हणून ठरलेले भारतीय त्यांना नकोसे वाटतात. तेथील भारतीय नागरिक हे चांगल्या प्रतिचे माक करोत परंतु तेथील नागरिकांच्या दृष्टीने ते उपरेच आहेत. अनेक शहरात त्यातून तणावही निर्माण झाले आहेत. त्यामुळे बांगला देशातील नागरिकांची समस्या आपल्याला जशी भेडसावते तशीच ती प्रत्येक देशाला तापदायक ठरते. फक्त प्रत्येक ठिकाणी त्याचा पाया वेगवेगळा असतो. कधी जातिय, कधी धार्मिक तर कधी वांशिक. बांगला देशातील नागरिकांची समस्या आपल्याला सोडविताना हे सर्व जागतिक संदर्भ लक्षात गेतले पाहिजेत. त्याचबरोबर मानवतेच्या दृष्टीकोनातून या समस्येकडे पाहिले गेले पाहिजे. अलिबागला बांगला देशी नागरिक सापडले, ते केवळ गुन्हेगारी करण्याच्या हेतूनेच आले असे नाही. त्यांना जगण्याचे आज साधन उपलब्ध नाही. त्यामुळे जीवनमरणाच्या समस्येतून त्यांना येथे आणले आहे, हे लक्षात घेऊनच या प्रश्‍नाकडे पाहिले जावे.
-------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel