-->
मतदान सैराट होण्यासाठी

मतदान सैराट होण्यासाठी

संपादकीय पान शनिवार दि. 21 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
मतदान सैराट होण्यासाठी
गेल्या काही निवडणुकीची आढावा घेतल्यास मतदानाची टक्केवारी फारशी काही वाढताना दिसत नाही. देशात सरासरी मतदान हे 60 ते 65 टक्क्यांच्या घरात होते. काही ठिकाणी तर हे प्रमाण 30 टक्क्यांवरही घसरते. अशा वेळी मतदार राजाने आपला हक्क बजावावा व लोकशाही वाढीस लागण्यासाठी मदत करावी असे निवडणूक आयोगास वाटणे स्वाभाविक आहे. मराठी तरुणांच्या मनावर गारूड करणार्‍या सैराट चित्रपटाने रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचविले आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी होत आहे. या जोडीची लोकप्रियता लक्षात घेत निवडणूक आयोगाने त्यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवडले आहे. येत्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे ते ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून हे दोघे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रचार व प्रसार करणार आहेत. आपल्याकडे गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानामध्ये तरुणांनी उत्साहाने भाग घेतला होता, मात्र तरुणांचा हा वाढता उत्साह असाच टिकला पाहिजे, यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. आर्चि व परश्याची ही जोडी तरुणांना मतदानाच्या बुथपर्यंत आणेेल असा विश्‍वास आयोगाला वाटतो. यापूर्वी गुजरात सरकारने मतदान सक्तीचे करण्याचा विचार केला होता. परंतु त्यापासून त्यांना परावृत्त व्हावे लागले. कारण हे शक्य नाही. त्यामुळे आता सरकारने मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विविध उपाय हाती घेण्याचे ठरविले आहे. आर्चि व परश्याचा हा प्रयोग यशस्वी होऊन मतदान सैराट होते का ते पहायचे.
-------------------------------------------

0 Response to "मतदान सैराट होण्यासाठी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel