वायू प्रदूषणाचे बळी
संपादकीय पान शनिवार दि. १० सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
वायू प्रदूषणाचे बळी
हवेच्या प्रदूषणामुळे भारतामध्ये २०१३ या एकाच वर्षात तब्बल १४ लाख जणांचे मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. जागतिक बँक आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्युऐशनने अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल पाहता आपल्याकडे हवेच्या प्रदूषणाने किती गंभीर परिणाम होतात ते पहायला मिळाले आहे. खराब हवेमुळे आणि हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन २०१३ या एकाच वर्षात जगभरात ५० लाख मृत्यु झाल्याचे म्हटले आहे. त्यापैकी जवळपास ६० टक्के मृत्यु हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात झाले आहेत. या देशांमध्ये भारतासह चीनचा समावेश आहे. चीनमध्ये २०१३ या एकाच वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे तब्बल १६ लाख मृत्यु झाले आहेत. अहवालातून भारत आणि चीनमध्ये मृत्युंची संख्या खूप मोठी असली तरीही प्रतिलाख लोकसंख्येच्या तुलनेत ही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे. या यादीत भारत सहाव्या तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे. जगात जॉर्जिया येथे प्रतिलाख लोकसंख्येमागे हवेच्या प्रदूषणामुळे होणार्या मृत्युंची संख्या २,११७ एवढी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर त्यानंतर कंबोडियाचा (१३०० मृत्यु) क्रमांक लागतो. या अहवालात जगातील एकूण १४२ वायू प्रदूषणाबाबत देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये दहा देशांमध्ये प्रतिलाख लोकसंख्येमागे १००० पेक्षा अधिक मृत्युंची संख्या असल्याचे म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होऊन फुफ्फुसाचा कर्करोग, हृदययासंबंधीचे आजार तसेच फुफ्फुसा संदर्भातील आजार उद्भवतात, परिणामी यातून मृत्यूही होतो. आपल्याकडे प्रामुख्याने तिसरे जग वायू प्रदूषणाच्या संगर्भात बेफिकीर असते. आपल्याला उद्योग हे हवे आहेत कारण ते अर्थातच रोजगार देतात, परंतु त्याचबरोबर वायू प्रदूषणाच्या संदर्भात खबरदारीही घेण्याची आवश्यकता आहे असेच हा अहवाल सांगतो.

0 Response to "वायू प्रदूषणाचे बळी"
टिप्पणी पोस्ट करा